ruturaj gaikwad wedding sayali sanjeev wishes him  SAKAL
मनोरंजन

Ruturaj Gaikwad Wedding: सायली संजीवने दिल्या ऋतुराजला लग्नाच्या शुभेच्छा.. मोजक्या शब्दात विषय संपवला

गेली अनेक वर्ष ऋतुराज अभिनेत्री सायली संजीव सोबत रिलेशनशीप मध्ये असल्याचं बोललं जात होतं

Devendra Jadhav

Sayali Sanjeev Wishes on Ruturaj Gaikwad Wedding News: ऋतुराज गायकवाडचं काल लग्न झालं.

आयपीएल 2023 च्या मोसमात चेन्नई सुपर किंग्जला चॅम्पियन बनवण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावणारा ऋतुराज गायकवाड लग्नगाठीत अडकला आहे.

काल ३ जूनला रात्री उशिरा ऋतुराजचे लग्नाचे फोटो व्हायरल झाले. ऋतुराज आणि उत्कर्षा पवार यांचा महाबळेश्वरमध्ये विवाह पार पडला.

गेली अनेक वर्ष ऋतुराज अभिनेत्री सायली संजीव सोबत रिलेशनशीप मध्ये असल्याचं बोललं जात होतं. आता सायलीने ऋतुराजला लग्नाच्या मोजक्या शब्दात शुभेच्छा दिल्यात.

(ruturaj gaikwad wedding sayali sanjeev wishes him )

सायलीने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर ऋतुराज आणि उत्कर्षा यांच्या लग्नाचा एक फोटो पोस्ट केलाय.

आणि शुभेच्छा देताना लिहिलंय... तुमच्यासाठी मी खूप आनंदी आहे. मनापासून अभिनंदन अशी पोस्ट करत सायलीने ऋतुराज आणि उत्कर्षाला शुभेच्छा दिल्यात.

एकंदर गेली अनेक वर्ष सायली आणि ऋतुराज रिलेशनशिपमध्ये असल्याचं बोललं जात होतं. पण आता ऋतुराजचं लग्न झाल्याने या चर्चांना पूर्णविराम मिळालाय.

जेव्हा ऋतुराजने पहिल्यांदा चेन्नई सुपर किंगच्या IPL विजयानंतर होणारी बायको म्हणजेच उत्कर्षा सोबतचा फोटो पोस्ट केला होता तेव्हा तो फोटो चर्चेत आला होता. त्याचं कारण म्हणजे ऋतुराजच्या या फोटोवर सायली संजीवने केलेल्या प्रतिक्रियेमुळे.

सायलीने ऋतुराजला आणि त्याची होणारी पत्नी उत्कर्षाला खुप शुभेच्छा दिल्या होत्या. 'तुम्हा दोघांना मनापासून शुभेच्छा', अशी कमेंट सायली संजीवने या पोस्टला केली. या कमेंट तिने या दोघांना टॅग केलं आहे.

sayali sanjeev

याआधी ऋतुराज आणि सायली संजीव यांच्या लिंक अपच्या बातम्याही समोर आल्या होत्या. मे २०२१ मध्ये सायली संजीवसोबतच्या इन्स्टाग्राम चॅटमुळे दोघांचं अफेयर असल्याच्या अफवा पसरल्या होत्या.

त्यामुळे दोघांच्या अफेयरमुळे खुप चर्चाही झाली होती, मात्र नंचर सायलीने या आम्ही केवळ चांगले मित्र आहोत असं म्हणत या बातमीचे खंडण केले होते.

आता ऋतुराजने उत्कर्षा पवार सोबत लग्न केल्याने सायली आणि त्याच्यात फक्त मैत्री होती, त्यापलीकडे काही नाही यावर शिक्कामोर्तब झालाय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

दिल्लीहून चेन्नईला जाणाऱ्या विमानाला आग!, प्रवाशी म्हणाले, 'असं वाटलं आज शेवटचा दिवस...', इंडिगो विमानात असं काय घडलं?

IND vs WI, 3rd T20I: अभिषेक शर्माचे वादळी अर्धशतक अन् भारताच्या ऑलआऊट होऊनही २०० धावा पार; विंडीजसमोर किती धावांचं लक्ष्य?

MBBS Admission 2026: एमबीबीएस बीडीएस प्रवेश २०२६: प्रवेश निश्चित करण्यासाठी १४ ऑक्टोबरपर्यंत मुदत, ११ हजार ३४० विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

Parner Congress: पारनेर काँग्रेसमध्ये राजीनामासत्र! तालुकाध्यक्ष संभाजी रोहोकलेंसह संपूर्ण कार्यकारिणीचा राजीनामा, नेमकं काय कारण?

SCROLL FOR NEXT