S S Rajamouli Movie Aamir Khan social media
S S Rajamouli Movie Aamir Khan social media  
मनोरंजन

SS Rajamouli : राजामौलींच्या चित्रपटात आमिर खानची वर्णी, दीपिका पदुकोणही दिसणार?

युगंधर ताजणे

S S Rajamouli Movie Aamir Khan social media : भारताला ऑस्कर मिळवून देण्यात महत्वाची भूमिका बजावणाऱ्या एस एस राजामौली यांचा दरारा आता वाढला आहे. केवळ टॉलीवूडच नाहीतर बॉलीवूडमध्ये देखील त्यांच्या नावाचे वलय वाढले आहे. जगप्रसिद्ध दिग्दर्शक जेम्स कॅमेरुन यांनी राजामौली यांना आपल्या सोबत काम करण्याची ऑफर दिली होती. आता राजामौली एका खास कारणामुळे चर्चेत आले आहे. S S Rajamouli Movie Aamir Khan social media

आरआऱआर या चित्रपटातील नाटू नाटू गाण्याला ऑस्कर मिळाला होता. त्यानंतर राजमौली यांचे नाव मोठ्या आदरानं घेतले जात आहे. जगाच्या पाठीवर त्यांच्या नावाचा गौरव होताना दिसून आला आहे. राजामौली यांच्या चित्रपटामध्ये काम करण्याचे स्वप्न हे बॉलीवूडमधील कित्येक अभिनेते आणि अभिनेत्रींचे असते. आतापर्यत ज्यांनी राजामौली यांच्यासोबत काम केले आहे त्यांना अमाप लोकप्रियता मिळाली आहे. यामध्ये प्रभास (बाहूबली) रामचरण आणि ज्युनिअर एनटीआर (आरआऱआऱ) यांच्या नावाचा उल्लेख करावा लागेल.

Also Read - Shivrajyabhishek Sohala : परकीय जलचरांना वेसण घालणारे एकमेव भारतीय राजे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज !

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आता राजामौली यांच्या चित्रपटामध्ये बॉलीवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान दिसणार आहे. याशिवाय बॉलीवूडची आघाडीची अभिनेत्री दीपिका पदुकोणही झळकणार असल्याची माहिती आहे. कॅरी ऑन जट्टा ३ या चित्रपटाच्या ट्रेलर प्रसंगी आमिर खानचं ते सिक्रेट रिव्हिल झालं आहे. यावेळी आमिर खाननं क्षेत्रीय भाषांमधील त्याच्या अभिरुचीविषयी प्रतिक्रिया दिली आहे. जर आपल्याला चांगली पटकथा मिळाली तर आपण नक्कीच त्या भाषांमधील चित्रपटांमध्ये काम करु असे त्यानं सांगितले आहे.

चांगली स्क्रिप्ट असल्यास कोणत्याही भाषेतील चित्रपटात आपण काम करायला तयार आहोत असे लाल सिंग चढ्ढाच्या अभिनेत्यानं सांगितलं आहे. आमिरला त्याच्या मागील लाल सिंग चढ्ढा चित्रपटानं खूपच मानसिक त्रास दिला होता. त्यामुळे आमिर आता चांगल्या चित्रपटाच्या शोधात आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आमिर खान हा त्याचा पुढचा चित्रपट एस एस राजामौली यांच्यासोबत करणार आहे.

सोशल मीडियावर एकीकडे ओम राऊतच्या आदिपुरुषची चर्चा रंगली असताना आता राजामौली यांच्या आगामी चित्रपटाविषयी बोलले जात आहे. राजामौली यांनी त्यांच्या पुढील चित्रपटाची तयारी सुरु केली असून त्यासाठी त्यांनी कास्टिंग वर काम सुरु केले आहे. यात आमिर खानचे नाव पुढे आले आहे. तो खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे.तर या चित्रपटामध्ये दीपिकाही दिसणार असल्याची चर्चा आहे.

जेव्हा राजामौली यांचा आरआऱआऱ प्रदर्शित झाला होता त्यानंतर काही दिवसांनी त्यांनी आपल्या नव्या चित्रपटाविषयी सांगितले होते. त्यात दक्षिणेकडील प्रसिद्ध अभिनेता महेश बाबू दिसणार असून तो पहिल्यांदाच राजामौली यांच्या चित्रपटात काम करणार आहे. चित्रपटाच्या पटकथेचे काम पूर्ण झाले असून राजामौली यांनी काही लोकेशन्स देखील फायनल केले आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Yamini Jadhav: यामिनी जाधव यांना शिवसेनेकडून दक्षिण मुंबईमधून उमेदवारी

Amit Shah Fake Video Case : अमित शाह फेक व्हिडीओ प्रकरणात मोठी कारवाई, दोघांना अटक; आप अन् काँग्रेसशी लिंक?

Mumbai Indians: 'मुंबई संघात फूट पडलीये म्हणूनच...', ऑस्ट्रेलियाचा वर्ल्ड कप विजेता कर्णधार स्पष्टच बोलला

The Great Indian Kapil Show: अन् दोन्ही भावांच्या डोळ्यात पाणी आलं; 'या' कारणामुळे कपिल शर्मा शोमध्ये सनी आणि बॉबी देओल झाले भावूक

Nashik Fraud Crime : आर्किटेक्टला साडेपाच लाखांना घातला गंडा! संशयित युवतीविरोधात फसवणूकीचा गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT