shrisant 
मनोरंजन

माजी क्रिकेटपटू एस.श्रीसंतच्या चाहत्यांसाठी खुशखबर..

सकाळवृत्तसेवा

मुंबई- सध्या लॉकडाऊनमुळे घरातंच सगळे जण वेळ घालवत आहेत. सेलिब्रिटी देखील चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी सोशल साईटच्या माध्यामातून त्यांच्याशी संवाद साधत आहेत. नुकताच माजी क्रिकेटपटू श्रीसंतने त्याच्या चाहत्यांसोबत सोशल मिडियाच्या माध्यमातून संवाद साधला. आणि या संवादादरम्यान त्याने त्याच्या चाहत्यांना एक खुशखबर दिली आहे. होय. भारतीय संघाचा माजी क्रिकेटपटु एस श्रीसंतच्या चाहत्यांसाठी एक चांगलीच खुशखबर आहे. श्रीसंतची क्रिकेट मधली कारकीर्द वादग्रस्त राहिली हे सगळ्यांनाच माहिती आहे त्यामुळेच आता क्रिकेट सोडून श्रीसंत नवीन क्षेत्रात त्याच नशीब आजमवण्यासाठी सज्ज झालाय.

क्रिकेटमधील वादग्रस्त कारकिर्दीसाठी श्रीसंत चर्चेत राहिला होता. म्हणूनंच मध्यंतरी त्याने सिनेसृष्टीत आपलं स्थान निर्माण करण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरु केले होते. मात्र आता पुन्हा एकदा श्रीसंतने त्याचा मोर्चा सिनसृष्टीकडे वळवला आहे. याबाबत स्वतः श्रीसंतने त्याच्या चाहत्यांना माहिती दिली आहे. श्रीसंतने हेलो ऍपच्या माध्यमातून चाहत्यांशी संवाद साधत त्यांना ही खुशखबर दिली. 

श्रीसंतने सांगितलं की, आत्तापर्यंत मी ज्या भूमिका केल्या आहेत त्यात ही भूमिका उत्तम असणार आहे. या चित्रपटाविषयी चाहत्यांनी विचारलं असता त्याने चित्रपटाच्या नावाचीही घोषणा केली. 'मुंबईचा वडापाव' असं या सिनेमाचं नाव असणारआहे. हा सिनेमा मराठी असून याचं शूटींग मुंबई, पुणे, नाशिक याठिकाणी होणार असल्याचं कळतंय. श्रीसंतच्या या सिनेमात मल्याळम आणि मराठी सिनेसृष्टीतील काही प्रसिद्ध कलाकारांचा समावेश असेल. श्रीसंतने त्याच्या या सिनेमाची घोषणा केल्यामुळे त्याचे चाहते याविषयी अधिक जाणून घेण्यासाठी जास्त उत्सुक आहेत. 

याधी श्रीसंतने 'अक्सर २' या सिनेमातून २०१७मध्ये बॉलीवूडमध्ये पदार्पण केलं होतं. त्यानंतर तो मागच्याच वर्षी बिग बॉस या प्रसिद्ध हिंदी रिएलिटी शोमध्ये दिसून आला होता. मात्र श्रीसंत या रिऍलिटी शोमध्येही सततच्या वादामुळे चर्चेत राहिला. या शो मध्येही तो त्याच्या रागावर ताबा मिळवू शकत नव्हता हे अनेकदा पाहायला मिळालं होतं. याचकारणामुळे त्याची क्रिकेटची कारकिर्दही वादात होती.

s sreesanth announce that he is all set to debut in movie named mumbaicha vadapav  
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Overhead Cable : ओव्हरहेड केबल धोरणाला स्थायीची मान्यता; अनधिकृत केबल वर्षभरासाठी होणार नियमित

'ऑपरेशन टायगर'चा दुसरा भाग खरंच येणार? मंत्री प्रताप सरनाईक यांचा दावा की मिश्किल टिपण्णी? कैलास पाटलांबद्दल काय म्हणाले?

RBI चा मोठा निर्णय! 'ही' सुविधा वेळेआधी होणार बंद; ग्राहकांसाठी काय बदलणार? जाणून घ्या...

Ajinkya Rahane Exclusive : अजिंक्यचे भारताकडून खेळण्याचे स्वप्न पूर्ण होईल की नाही, याची भीती होती.. पण तो खचला नाही! राधिकाचे डोळे भरून आले, रहाणेने सावरले...

Devendra Fadnavis: महाराष्ट्रातील ३६,२११ कंपन्या बंद झाल्या? चर्चेवर देवेंद्र फडणवीसांचा खुलासा; शरद पवारांना सांगितलं सत्य

SCROLL FOR NEXT