shamika bhide and gaurav korgaonkar  file image
मनोरंजन

'सा रे ग म प लिटिल चॅम्प्स' मधील शमिकाची लव्ह स्टोरी

शमिकाचा पती गौरव संगीत संयोजक, संगीत दिग्दर्शक आणि वादक आहे.

राजसी वैद्य

सा रे ग म प लिटिल चॅम्प्समधून घराघरात पोहचणारी लोकप्रिय गायिका म्हणजे शमिका भिडे. शमिका नेहमी काही तरी नवीन आपल्यासाठी घेऊन येत असते आणि तिच्या साथीला असतो तो तिचा नवरा गौरव कोरगावकर. गौरव संगीत संयोजक, संगीत दिग्दर्शक आणि वादक आहे. पुण्यात त्याचा स्वतःचा स्टुडिओ आहे. त्याच्या स्टुडिओमध्ये अनेकदा शमिका रेकॉर्डिंगसाठी जायची आणि तिथं गौरव असायचा. गंमत म्हणजे, हा मुलगा नेहमी स्टुडिओमध्ये असतो, तो नक्की कोण आहे, तो इथं काय काम करतो हेच शमिकाला माहीत नव्हतं. त्यावेळी त्यांच्यात अगदी जुजबी बोलणं व्हायचं, पण गौरव आपल्या सर्वांप्रमाणंच शमिकाला ‘सा रे ग म प’ लिट्ल चॅम्प्सपासून ओळखत होता. पुढं रेकॉर्डिंग्सच्या निमित्तानं त्यांच्या भेटी होत गेल्या व त्यांच्यात मैत्री वाढली आणि पुढं या मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं. ४-५ वर्षं एकमेकांना नीट समजून घेतल्यावर दीड वर्षांपूर्वी ते विवाहबद्ध झाले.या दोघांच्या स्वभावात थोडासा फरक आहे, पण त्यांच्या आवडीनिवडी या जवळपास सारख्याच आहेत. गौरवनं सांगितलं, ‘‘शमिका खूप समजूतदार आहे. आम्ही दोघंही संगीत क्षेत्रात काम करतो. या क्षेत्रात काम करत असताना कशाच्याही वेळा निश्चित नसतात. घरी उशिरा येणं, कामानिमित्त बाहेरगावी जाणं हे आम्हाला करावं लागतं आणि हे ती खूप चांगलं समजून घेते. तिचे शोज किंवा रेकॉर्डिंग्स करताना ती मलाही काम करण्यासाठी माझी पूर्ण स्पेस देते. मला तिच्यातली आवडणारी गोष्ट म्हणजे तिचा मनमोकळेपणा. ती सगळ्यांमध्ये मिसळते, तिच्या स्वभावानं ती सगळ्यांना आपलसं करते. लग्नानंतरही आमच्या संपूर्ण कुटुंबातील प्रत्येकाशी तिनं खास नातं तयार केलं आहे. त्या मानानं मी थोडासा मितभाषी आहे. त्यामुळं तिच्यातला हा गुण मला आत्मसात करायला फार आवडंल.’’

शमिकाला गौरवचा शांत स्वभाव भावला. ती म्हणाली, ‘‘गौरव खूप मॅच्युअर, शांत मुलगा आहे. त्याची पेशन्स लेव्हल ही माझ्यापेक्षा जास्त आहे. कोणत्याही गोष्टीकडं तो सकारात्मक दृष्टिकोनातून बघत असतो. तो खूप समजूतदार आहे. मला त्याला जे सांगायचंय ते सांगताना मला फार विश्लेषण कधीही करावं लागत नाही. मला नक्की काय म्हणायचंय ते त्याला पटकन कळतं. गौरवसारखंच मलाही वेळी-अवेळी काम असतं. या सगळ्यांत मला त्याच्याकडून कोणतंही बंधन नाही. तो नेहमी मला माझ्या कामात सपोर्ट करत आला आहे. त्याच्या शांत स्वभावाचा माझ्यावर खूप प्रभाव पडला आहे. गौरव माझ्या आयुष्यात येण्यानं माझ्यातला चिडचिडेपणा बऱ्यापैकी कमी झाला आहे हे मला स्वतःला जाणवतंय.’’

शमिका आणि गौरव हे दोघंही खवैये आहेत. वेगवेगळे पदार्थ बनवून खायला त्यांना प्रचंड आवडतं. पास्ता ही गौरवची स्पेशलिटी आहे, तर पनीरचे सगळेच पदार्थ आणि नान शमिका उत्तम करते. प्रत्येकाच्याच लग्नात काही ना काही गमतीशीर प्रसंग घडत असतात. या दोघांनीही त्यांच्या लग्नातला एक मजेशीर प्रसंग शेअर केला. गौरव आणि शमिकाचं लग्न कोरोना काळाच्या आधी रत्नागिरी इथं पार पडलं. त्यामुळं त्यांच्या लग्नात पाहुण्यांसाठी मर्यादा नव्हती. सुमारे हजार-बाराशे मंडळी त्यांच्या लग्नात उपस्थित होती. लग्न लागल्यानंतर केला जाणारा विधी थोडासा लांबला. त्यामुळं त्या दोघांना रिसेप्शनसाठी तयार होण्यासाठी जायला वेळ लागला आणि पुढं तयार होऊन यायला जवळजवळ तास-दीड तास लागला. आता फोटोसाठी थांबलो तर घरी जायला उशीर होणार, या विचारानं २००-२५० मंडळी ते येण्याच्या आधीच निघून गेली आणि गौरव-शमिकाचं सगळ्यांना भेटायचं राहून गेलं. पण त्यावेळी जरी त्यांची सगळ्यांशी भेट झाली नसली, तरी आपल्या बिझी शेड्युलमधून वेळ काढून हे दोघंही सर्वांच्या संपर्कात राहत प्रत्येकाशी असलेलं नातं जपत, सर्व जबाबदाऱ्या पार पडत आपला संसार करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RJD Candidate Arrested : उमेदवारी अर्ज दाखल करताच 'राजद'च्या उमेदवारास झारखंड पोलिसांनी केली अटक!

Deglur Accident : बस व ट्रॅव्हल्स समोरासमोर अपघात २८ जण गंभीर जखमी, लेंडी पुला जवळील घटना; २ तास वाहतूक खोळंबंली

'२०२७ वनडे वर्ल्ड कप जिंकायचा असेल, तर आगरकर - गंभीरला पदावरून हटवा!', Navjot Singh Sidhu खरंच असं म्हणाले? स्वत:च केला खुलासा

Diwali Celebration : ऑपरेशन पहाट; सोलापूर पोलिसांनी पारधी कुटुंबांसोबत साजरी केली दीपावली, शासकीय योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन

Actor Asrani Passes Away : ज्येष्ठ अभिनेते असरानी यांचं निधन, ८४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, 'अंग्रेजों के जमाने का जेलर' काळाच्या पडद्याआड

SCROLL FOR NEXT