mrunmayee deshpande,sa re ga ma pa little champs file image
मनोरंजन

'सारेगमप'चे परिक्षक ओव्हर अ‍ॅक्टिंगमुळे ट्रोल; मृण्मयीचं सडेतोड उत्तर

परिक्षकांना ट्रोल करणाऱ्या ट्रोलर्सला आता शोची सूत्रसंचालिका मृण्मयी देशपांडेने सडेतोड उत्तर दिले आहे.

प्रियांका कुलकर्णी

सध्या 'सा रे ग म प लिटिल चॅम्प्स' या शोमधील कार्तिकी गायकवाड (Kartiki Gaikwad), इतर स्पर्धक रोहित राऊत (Rohit Raut), मुग्धा वैशंपायन (Mugdha Vaishampayan), प्रथमेश लघाटे (Prathamesh Laghate) आणि आर्या आंबेकर या परिक्षकांना शोमधील त्यांच्या ओव्हर अ‍ॅक्टिंगमुळे सोशल मीडियावर ट्रोल केले जात आहे. परिक्षकांना ट्रोल करणाऱ्या ट्रोलर्सला आता 'शो'ची सूत्रसंचालिका मृण्मयी देशपांडेने (mrunmayee deshpande) सडेतोड उत्तर दिले आहे.(sa re ga ma pa little champs trolled for their over acting actress mrunmayee deshpande give answer)

मृण्मयी सोशल मीडियावर नेहमी तिच्या चाहत्यांसोबत संवाद साधते. नुकताच मृण्मयीला एका ट्रोलरने 'सारेगमप'च्या परिक्षकांना ट्रोल करत कमेंट केली, 'समोर असलेले जज आणि अँकर खूपच आरडा ओरडा करतात.' यावर मृण्मयीने दिलेल्या उत्तराने सर्वांचे लक्ष वेधले. मृण्मयीने कमेंट केली, 'तुम्ही या मुलांचं गाणं ऐकून काय केलं असतं? हाताची घडी घालून शांत बसला असतात का?'. मृण्मयीने या ट्रोलरला दिलेल्या या सडेतोड उत्तराचे अनेकजण समर्थन करत आहेत.

mrunmayee deshpande answer

'सारेगमप लिटिल चॅम्प्स' चे परिक्षकांना ओव्हर अ‍ॅक्टिंगमुळे ट्रोल केले जात होते

कार्तिकी गायकवाडची तुलना हिंदी गायिका नेहा क्ककरसोबत केली जात आहे. शोमध्ये कार्तिकी सतत रडते किंवा भावनिक होते. हिंदी शो इंडियन आयडॉलमध्ये देखील नेहाला अशाच कारणामुळे ट्रोल केले जाते होते. त्यामुळे सध्या सोशल मीडियावर नेहा आणि कार्तिकीचे मीम्स व्हायरल होताना दिसत आहेत. या शोमधील मेंटॉर प्रथमेश लघाटेला 'महेश काळे यांची कॉपी करत आहे' असे म्हणत अनेक नेटकऱ्यांनी ट्रोल केले आहे. तसेच आर्या आंबेकर आणि रोहित राऊतच्या परिक्षणावरील अनेक मीम्स सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुणे, मुंबई अन् नागपूरनंतर आता कोल्हापूरमध्येही होणार आंतरराष्ट्रीय Cricket Stadium; राज्य मंत्रिमंडळाकडून प्रस्तावाला मंजूरी

पटसंख्येची अट शिथिल करा! शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे समायोजन थांबवा, मुख्याध्यापक संघाची शिक्षणमंत्र्यांकडे मागणी, शिक्षणमंत्री काय म्हणाले? वाचा...

Promise Day 2026: प्रॉमिस डेनिमित्त काहीतरी खास हवंय? ‘हे’ वचन दिलंत तर नात्यात येईल नवी गोडी

Bangladesh Hindu Killing : बांगलादेशात निवडणुकीपूर्वी आणखी एका हिंदूची हत्या! ; व्यावसायिकाला दुकानात कोंडून मारले

T20 World Cup: भारतीय खेळाडू Bat Tempering करण्याचा दावा करणाऱ्या क्रिकेटपटूचा यू-टर्न; म्हणाला, 'मला तर असं काही....'

SCROLL FOR NEXT