Saas Bahu Aur Flamingo Trailer  
मनोरंजन

Saas Bahu Aur Flamingo Trailer : 'नाजूक काळजाच्या लोकांसाठी नाही'! दिग्दर्शकच म्हणतो, जबाबदारीवर पाहा..

या वेबसीरिजचा ट्रेलर व्हायरल झाला असून दिग्दर्शकानं तो ट्रेलर पाहताना ज्यानं त्यानं आपल्या जबाबदारीवर तो पाहावा असे म्हटले आहे.

युगंधर ताजणे

Saas Bahu Aur Flamingo Trailer :आपल्या कलाकृतीला प्रेक्षकांसमोर आणून त्याविषयीचे प्रमोशन करण्याचा दिग्दर्शकाचा नेहमीच प्रयत्न असतो. जेणेकरुन प्रेक्षकांनी ट्रेलर, टीझरमधून त्या कलाकृतीविषयी जाणून घेत ती कलाकृती प्रदर्शित झाल्यानंतर त्याचा आनंद घ्यावा, हा त्यामागील प्राथमिक उद्देश असतो. सास बहू और फ्लेमिंगोची गोष्ट जरा वेगळी आहे.

बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री डिंपल कपाडिया या नेहमीच वेगवेगळ्या कारणामुळे चर्चेत राहिल्या आहे. वयाची साठी ओलांडल्यानंतरही डिंपल कपाडिया यांच्या नावाची जादू प्रेक्षकांच्या मनावर कायम आहे. सास बहू और फ्लेमिंगोमध्ये त्यांची भूमिका ही कमालीची रंगतदार झाल्याचे दिसून आले आहे. या वेबसीरिजचा ट्रेलर व्हायरल झाला असून दिग्दर्शकानं तो ट्रेलर पाहताना ज्यानं त्यानं आपल्या जबाबदारीवर तो पाहावा असे म्हटले आहे.

Also Read - पाठ्यपुस्तकांत वह्यांची घुसखोरी

दिग्दर्शकानं असे सांगितल्यामुळे नेटकऱ्यांची उत्सुकता आणखी वाढल्याचे दिसून आले आहे. त्यावर नेटकऱ्यांनी कौतूकाचा वर्षाव केला आहे. क्योंकी सास भी कभी बहू थी गाण्यानं ट्रेलरला सुरुवात होते.त्यानंतर होणारा गोळीबार, क्रौर्य, रक्तपात हे सगळं काही सुन्न करणारं आहे. त्यामुळेच की काय दिग्दर्शकानं सुरुवातीलाच नाजूक काळजाच्या प्रेक्षकांनी या ट्रेलरच्या वाट्याला जाऊ नये. असे का सांगितले हे कळते. सास बहू और फ्लेमिंगो ही सीरिज ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे.

Saas Bahu Aur Flamingo Trailer

डिंपल कपाडिया या चित्रपटाच्या माध्यमातून पहिल्यांदाच ओटीटीवर येणार आहेत. सास बहू और फ्लेमिंगोचे दिग्दर्शन होमी अदजानिया यांनी केले असून त्याचा ट्रेलर डिझ्नी हॉट स्टारवर प्रदर्शित करण्यात आला आहे. यापूर्वी होमी अदजानिया यांनी बीईंग सायरस, कॉकटेल सारखे चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे. या सीरिजमध्ये डिंपल कपाडिया मुख्य भूमिकेत असणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PORTUGAL VS UZBEKISTAN: ख्रिस्तियानो रोनाल्डोचे विक्रम, विक्रम, विक्रम... पोर्तुगालचा ५-० असा दणदणीत विजय, Fifa World Cup च्या बाद फेरीच्या दिशेने कूच

Cristiano Ronaldo Record: ६० वर्ष एकाच व्यक्तीच्या नावे होता विक्रम, रोनाल्डोने ३३ मिनिटांत मोडला! गोलरक्षकाला गंडवलं Video तुफान Viral.. मेस्सीही मागे पडला

Cristiano Ronaldo Record: "नाद करा, पण आमचा कुठं..." ख्रिस्तियानो रोनाल्डो आला अन् मैदान गाजवलं; रेकॉर्ड ब्रेकिंग गोल्स Video Viral

Cristiano Ronaldo Create History: अविश्वसनीय! रोनाल्डोचा विश्वविक्रम; World Cup मध्ये असा पराक्रम करणारा जगातील पहिलाच, मेस्सीचाही विक्रम मोडला, Video

Tanker Mafia : नागरिकांची आर्थिक पिळवणूक! टँकरमाफियांना महापालिकेची फूस; अवाच्या सवा दराने पाण्याची विक्री

SCROLL FOR NEXT