Sachin Sawant on The Kashmiri Files  e sakal
मनोरंजन

The Kashmir Files : काश्मिरी पंडितांबद्दल कणव नाहीतर..., सावंतांची टीका

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : द काश्मीर फाईल्स (The Kashmir Files) हा चित्रपट नुकताच रिलीझ झाला आहे. पण, या चित्रपटावरून सोशल मीडियावर वाद रंगलेला पाहायला मिळतोय. या चित्रपटातून एका ठराविक धर्मावर टीका करण्यात आल्याचा आरोप होतोय. तसेच हिंदूत्ववादी संघटनाकडून हा चित्रपट पाहण्याचे आवाहन केले जात आहे. त्यावरून आता काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत (Sachin Sawant) यांनी टीका केली आहे.

''द कश्मीर फाइल्स (The Kashmir Files) हा चित्रपट बनवण्याचा उद्देश काश्मिरी पंडितांबद्दल कणव नाही तर राजकीय आहे. ऐतिहासिक घटनांची मोडतोड व चित्रपट बनवणारे भाजपासंबंधित असणे हा योगायोग नाही. पंडितांनी काश्मीरमध्ये परत कधी जायचे? हे मोदी सरकारला विचारावे. देशविरोधी सरकार जुन्या जखमा कोरून त्या भळभळत राहतील हे पाहते'', अशी टीका सावंतांनी भाजपवर केली आहे.

तेव्हा केंद्रात कोणाचं सरकार होतं? -

द्वेषातून सत्तेसाठी मतांचे पीक मिळवण्याचा उद्देश असतो. देशभक्त सरकार नागरिकांमध्ये प्रेम निर्माण करते. जुने व्रण विसरायला लावते. एकतेने देश मजबूत होतो. पण, हे सरकार उलट आहे. "जय श्रीराम" घोषणा द्या. पण श्रीरामाने रावणाचा द्वेष केला नाही व कैकयीला क्षमा केली हे पाहा. श्रीरामाने दाखवलेला मार्ग हा नव्हे! आणि जर आठवणच ठेवायची तर ही जरुर ठेवा, की पंडितांचे अत्याचारांमुळे जबरदस्तीने काश्मीरमधून विस्थापन झाले. त्यावेळी केंद्रात भाजपा समर्थित व्ही. पी. सिंग सरकार होते. जम्मू आणि काश्मीरमध्ये राष्ट्रपती राजवट होती व तेथील राज्यपाल जगमोहन पुढे भाजपाचे चार वेळा खासदार व केंद्रीय मंत्री झाले, असा जोरदार निशाणा सचिन सावंत यांनी भाजप सरकारवर साधला.

द काश्मिर फाईल्स हा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी त्याच्यावरुन वेगवेगळया प्रकारच्या प्रतिक्रिया सोशल मीडियावरुन व्हायरल झाल्या होत्या. सेन्सॉर बोर्डानं देखील निर्माते आणि दिग्दर्शक यांना या चित्रपटातील अनेक प्रसंगांना कात्री लावण्यास सांगितले होते. त्यामुळे दिग्दर्शकांनी त्यावरुन नाराजी व्यक्त केली होती. गेल्या काही दिवसांपूर्वी कपिल शर्माच्या शो मध्ये या चित्रपटाच्या प्रमोशनवरुन मोठा वाद निर्माण झाला होता. त्यावरुन मोठी आरोप प्रत्यारोपांची राळ उडाली होती. मात्र जेव्हा हा चित्रपट प्रदर्शित झाला तेव्हापासून बॉक्स ऑफिसवर त्यानं विक्रमी कमाई केल्याचे दिसून आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran-America War: वडिलांच्या हत्येचा बदला घेणार! मोज्तबा खामेनेई यांची शपथ; युद्ध भडकणार?

Supriya Sule: 'लाडकी बहीण' योजनेत भाऊ कसा?; सुप्रिया सुळे यांचा महायुती सरकारवर जोरदार हल्लाबोल; कर्जमाफीची फक्त घोषणाबाजी!

Maratha Reservation: अंतरवाली सराटी लाठीमार प्रकरण; मराठा आंदोलकांवरील ३९ गुन्हे मागे, १० प्रस्ताव न्यायालयात प्रलंबित

Gangapur Accident: गंगापूर-वैजापूर रस्त्यावर भीषण अपघात! एसटी-दुचाकीची समोरासमोर धडक; शिर्डीच्या तरुणाचा जागीच मृत्यू

India vs England 5th T20 : पाचव्या टी-२० सामन्यातही भारताचा लाजिरवाणा खेळ; इंग्लंडने दिले २५८ धावांचे आव्हान, बटलर-हॅरी ब्रूकची तुफानी खेळी

SCROLL FOR NEXT