Sai Pallavi Break Silence On Secret Marriage On Viral PhotosTearful Reaction to Rumor  
मनोरंजन

Sai Pallavi On Marriage: "खरोखरच घृणास्पद कृत्य..."फोटो व्हायरल केल्याप्रकरणी साई पल्लवी भडकली

Vaishali Patil

Sai Pallavi Break Silence On Secret Marriage: साऊथ फिल्म इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री म्हणुन साई पल्लवीकडे पाहिले जाते. तिचे नाव आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये गणले जाते.

मात्र सध्या ती तिच्या लग्नाच्या बातम्यांमुळे चर्चेत आली. साईनं गुपचूप लग्न केलं असं सांगत तिचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आला होता.

या लग्नाच्या अफवा देखील सोशल मीडियावर खुप पसरल्या. मात्र आता या बातमीवर स्वत: साईनेच प्रतिक्रिया देत मौन सोडले आहे.

व्हायरल फोटोत सई एका व्यक्तीसोबत दिसत होती. दोघांनीही पांढऱ्या रंगाचे कपडे आणि पुष्पहार घातला आहे. तिचा हा फोटो समोर येताच सईने गुपचूप लग्न केल्याची चर्चा सुरू झाली. मात्र हा फोटो चित्रपटाच्या कार्यक्रमावेळीचा होता.

याबाबत साई पल्लवीने ट्विटरवर एक ट्विट शेयर करत अफवा पसरवणाऱ्यांचा चांगलाच समाचार घेतला आहे. साई या ट्विटमध्ये लिहिते की, "प्रामाणिकपणे, मला या अफवांची काहीच पर्वा नाही, मात्र जेव्हा कुटुंब आणि मित्रांचा प्रश्न येतो तेव्हा मी गप्प बसू शकत नाही."

"हा फोटो माझ्या चित्रपटाच्या पूजेचा आहे, जो मुद्दाम एडिट केला गेला आहे आणि चुकीच्या हेतूने व्हायरल करण्यात आला. जेव्हा मी स्वत: चित्रपटाची घोषणा केली आणि सत्य काय आहे ते सांगितले, तरीही अशा मूर्खपणाच्या गोष्टीबाबत बोलण्यात काय अर्थ आहे. मग मला या फालतू गोष्टींबद्दल स्पष्टीकरण द्यावे लागणे हे खरोखरच दुःखद आहे. हे कृत्य अत्यंत घृणास्पद आहे."

हा फोटो साई पल्लवीच्या SK21 या चित्रपटाचा आहे. आणि फोटोत तिच्यासोबत SK21चे दिग्दर्शक राजकुमार पेरियासामी दिसत आहे. निर्मात्यांनी या चित्रपटाच्या पूजा समारंभाचे आयोजन केले होते तेव्हा हा फोटो देखील त्यांनीच शेयर केला होता. मात्र तो तिच्या लग्नाचा फोटो आहे असं सांगत हा फोटो व्हायरल करण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

FSSAI च्या कारवाईचा दणका! Dabur नंतर Zandu सह ५ कंपन्यांवर कडक कारवाई; कारण काय?

Pimpalwandi News : पिंपळवंडी ग्रामस्थांचा पोलीस अधीक्षक गिल यांच्याकडे संतप्त सवाल; पिंपळवंडी येथील पोलीस आऊट पोस्ट दहा वर्षापासून बंद

Shubman Gill: "तो खेळाडू भारतासाठी दीर्घकाळ खेळेल!", श्रीलंकेविरुद्धच्या विजयानंतर गिलची मोठी भविष्यवाणी!

Marathi News Live Updates : 'आप' नेते सत्येंद्र जैन आणि इतर ४ आरोपींना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

Sangola News : सांगोल्यातील विविध पक्षातील कार्यकर्त्यांनी मुंबईत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या शिवसेनेत केला पक्षप्रवेश

SCROLL FOR NEXT