Sai Tamhankar Esakal
मनोरंजन

Sai Tamhankar Birthday: डेटिंग..लग्न अन् घटस्फोट आता पुन्हा डेटिंग! सईचं वैयक्तिक आयुष्यही फिल्मीच!

Vaishali Patil

Sai Tamhankar Birthday: मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणुन सई ताम्हणकरचं नाव नेहमीच आघाडीवर आहे. ती तिच्या वेगळेपणासाठी ओळखली जाते. आता तिची सिमा केवळ मराठी मनोरंजन विश्वापर्यंतच मर्यादित नसून आता ती बॉलिवूडमध्येही तिचे स्थान निर्माण करत आहे. मिमी या चित्रपटातुन तिने बॉलिवूडमध्येही धमाकेदार अभिनयानं प्रेक्षकांची मनं जिकंली आहे.

नेहमी वेगवेगळ्या भूमिका साकारुन सईने चाहत्यांच्या मनात आपली जागा निर्माण केली आहे. सई चित्रपटात जितकी बिनधास्त दिसते तशीच ती तिच्या खऱ्या आयुष्यातही आहे. ती नेहमी तिच्या खासगी आयुष्याबाबत उघडपणे बोलताना दिसते.

सई ही तिच्या चित्रपटाबरोबरच अनेक कारणाने चर्चेत राहिली आहे. त्यातच तिच्या लव्ह लाईफ चर्चा तर नेहमीच होच असते. आज सई तिचा वाढदिवस साजरा करत आहे.


सांगलीमध्ये जन्मलेली सईला दुनियादारी या चित्रपटान खास ओळखल मिळवुन दिली. त्यानंतर सई मनोरंजन विश्वातलं चर्चेतल नाव बनली.

सईने अमेय गोसावीला डेट केल्यानंतर 15 डिसेंबर 2013 रोजी त्याच्यासोबत लग्नगाठ बांधली. अमेयबद्ल बोलायचं झालं तर तो देखील याच इंडस्ट्रीशी निगडित आहे. त्याची लोडिंग पिक्चर्स ही कंपनी आहे. सई अन् अमेयनं तीन वर्ष एकमेंकाना डेट केलं आणि त्यानंतर लव्ह मॅरिज केलं. मात्र त्याच्यतील प्रेम हे जास्त काळ टिकलं नाही.

सई आणि अमेयचं लग्न केवळ दोनच वर्ष टिकलं. 2015 मध्ये सईने अमेयला घटस्फोट दिला. मात्र सई आणि अमेय यांच्यात घटस्फोटानंतरही मैत्रीचं नात आहे. ती बऱ्याच तिच्या नात्याबद्दल अनेक मुलाखतीत बोलली आहे.

सईनं तिच्या खांद्यावरील दोन तारखांचा टॅटू गोंदवला आहे. त्यातच एक तारीख तिच्या लग्नाची आहे. तर दुसरी तारीख ही अमेयने प्रपोज केलेल्या दिवसाची आहे. हे सईनं स्वत: एका मुलाखतीत सांगितलं होत.

आता सई तिच्या आयुष्यात पुढे सरकली आहे. सध्या ती एका व्यक्तीला डेट करत असल्याच्या बऱ्याच चर्चा सुरु आहे. सई आता अनिश जोगला डेट करत आहे. सई व अनिश दोघेही काही दिवसांपुर्वीच स्पेनमध्ये व्हेकेशन एंजॉय करताना दिसले होते.

अनिशने दोघांचाही एक फोटो शेअर केला त्यानंतर त्याच्या डेटिंगच्या चर्चा अधिकच रंगल्या. अनिश जोग हा चित्रपट निर्माता आहे.

सई त्याला बऱ्याच वर्षांपासून ओळखते. सई आणि अनिशने अनेक चित्रपट एकत्र केले आहे. त्यामुळे आता सई आणि अनिश लवकरच लग्नबंधनात अडकतील अशी आशा सईच्या चाहत्यांना आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT