Sai Tamhankar Instagram
मनोरंजन

Sai Tamhankar: "एक स्वप्न पूर्ण झाले..", सईनं चाहत्यांना दिली गूडन्यूज! व्हिडिओ व्हायरल

सईनं आता तिच्या इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेयर केला आहे ज्यात तिने तिच्या चाहत्यांसोबत एक मोठी आनंदाची बातमी शेयर केली आहे.

Vaishali Patil

Sai Tamhankar Viral Video: मराठी मनोरंजन विश्वातील प्रसिद्ध आणि चर्चेतली अभिनेत्री म्हणुन सई ताम्हणकरचं नाव नेहमीच आघाडीवर असतं. सई नेहमी तिच्या वेगळेपणासाठी ओळखली जाते. तिनं मराठी मनोरंजनसृष्टीबरोबरच बॉलिवूडमध्येही धमाकेदार अभिनयानं प्रेक्षकांची मनं जिकंली आहे. ती नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते.

सई ही अभिनयाबरोबरच सोशल मिडियावरही सक्रिय असते. ती नेहमीच चाहत्यांच्या संपर्कात राहते. सईनं आता तिच्या इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेयर केला आहे ज्यात तिने तिच्या चाहत्यांसोबत एक मोठी आनंदाची बातमी शेयर केली आहे.

खर तर सईनं एक व्हिडिओ शेयर केला आहे ज्यात तिने तिच्या नवीन घरात गृहप्रवेश केला आहे. सई तिच्या स्वत: च्या हक्काच्या घरात रहायला गेली आहे. मात्र तिला यावेळी जितका आनंद नवीन घरात येण्याचा आहे तितकच वाईट तिला तिचं जूनं घर सोडण्यामुळे देखील वाटतयं.

या व्हिडिओत ती म्हणतेय की, 'तिला या घरातून जायचं नाही, तिला माहिती आहे ते घर मोठ मस्त आहे पण काही गोष्टी सुटत नाहीत, तसचं काहीस या घराबद्दल आहे. या घराने तिला खुप काही दिलयं ती ते नाही सोडू शकत..'

या व्हिडिओत सई तिच्या पुर्वीच्या घरातून सामान शिफ्ट करतेय. या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये तिने लिहिलयं, "द एलेव्हन्थ प्लेस. पुन्हा घाबरून आणि उत्साहाने, मी नवीन घरात पाऊल ठेवले, एक स्वप्न पूर्ण झाले, माझं पहिलं मुंबईतील घर, एक मैलाचा दगड गाठला, घरी बोलावण्याचं ठिकाण, जिथे आठवणी विणल्या जातील.

पण आनंदादरम्यानच एक कडवट आठवण, एके काळी जे माझे डोमेन होते त्याला मी निरोप देताना, ओळखीच्या भिंती आणि जुन्या घराला निरोप..ज्या आरामात मी एकेकाळी खुप आनंदी राहत होते. प्रत्येक खोलीतील आठवणी कुजबुजताय, हास्याचे क्षण, आवाज आणि भूतकाळातील गोष्टी.. भावनांचा सिम्फनी, एक गुंफणारा यमक.

पण मी पुढे या नवीन अध्यायाला सुरुवात करत असतांना विनम्र कृतज्ञतेने माझे हृदय भरुन आलयं. केलेल्या आठवणी आणि शिकलेल्या धड्यांसाठी, या नवीन घरात, नवीन स्वप्ने मी जमवेल.

म्हणून मी कृतज्ञतेने मिठी मारत त्याचा निरोप घेते,

जुन्याकडे, आम्ही एकदा शोधून काढलेल्या प्रवासापर्यंत,

आणि नम्र अपेक्षेने चमकत आहे, मी माझ्या नवीन घरात पाऊल ठेवतो, एक प्रकाशाचा किरण"

आता सईनं हा व्हिडिओ शेयर करताच अनेक कलाकारांनी तिला शुभेच्छा दिल्या आहेत तिचे अभिनंदन केले आहे. तिच्या चाहत्यांनीही तिच्यावर गर्व असल्याचं सांगत तिच्यावर शुभेच्छाचा वर्षाव केला आहे.

मीडिया रिपोर्टनुसार, सईने मागच्या वर्षी तिच्या वाढदिवशी मुंबईतील मालाडमध्ये 45 व्या मजल्यावर 3BHK आलिशान घर घेतलं आहे काही दिवसांपासून त्यात काम सुरु होते. आता सईनं त्यात गृहप्रवेश केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Success Story : जळगाव रेल्वे स्टेशनवर सापडलेली माला झाली 'महसूल सहायक', नोकरीच्या पहिल्याच दिवशी मिळणार अनोखी भेट

Nagpur News: महिला पोलिसांच्या चिमुकल्यांना मिळणार ‘चिमणीघर’ची माया; पोलिस आयुक्तांकडून उद्‍घाटन, बंद पडलेले ‘पाळणाघर’ पुन्हा सुरू

धक्कादायक घटना! 'सुरक्षारक्षकाचा पाच वर्षीय चिमुकलीवर अत्याचार'; बेलतरोडीतील सिंगापूर कॉलनीतील घटना, नागपूर जिल्ह्यात खळबळ

Cough Syrup: चिमुकल्यांच्या मृत्यूनंतर सरकारला अॅक्शन मोडमध्ये, औषधांच्या गुणवत्तेबद्दल आणि वापरावर मोठा निर्णय घेतला

Latest Marathi News Live Update: सरकारी जमिनीवर बांधलेल्या बेकायदेशीर बांधकामांवर प्रशासनाने तोडफोड मोहीम

SCROLL FOR NEXT