Sai Tamhankar Post For Boyfriend Anish Jog Esakal
मनोरंजन

Sai Tamhankar: 'तुझ्यासारखे लोक...', बॉयफ्रेंडच्या बर्थडेला सईची खास पोस्ट

Vaishali Patil

Sai Tamhankar Post For Boyfriend Anish Jog: मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणुन सई ताम्हणकरचं नाव नेहमीच आघाडीवर आहे. ती तिच्या वेगळेपणासाठी ओळखली जाते. आता ती केवळ मराठी मनोरंजन विश्वापर्यंतच नव्हे तर बॉलिवूडमध्येही तिने आपल्या अभिनयाची छाप सोडली आहे.

सई ही अभिनयाबरोबरच सोशल मिडियावरही सक्रिय असते. ती नेहमीच चाहत्यांच्या संपर्कात राहते. नेहमी काही ना काही पोस्ट करते. ती सई सध्या स्पेनमध्ये व्हॅकेशन एण्जॉय करताना दिसत आहे. तिने या ट्रिपचे फोटोही शेयर केले होते. जे सोशल मिडियावर बरेच व्हायरल होत आहे.

आज चित्रपट निर्माता अनिश जोगचा वाढदिवस आहे. सई ही अनिशला डेट करत असल्याच्या चर्चा बऱ्याच दिवसापासून सुरु होती. आता त्यातच सईने त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहे.

त्याच्या वाढदिवसानिमित्त सईने पोस्ट शेअर केली आहे. अनिश सोबतचा व्हिडिओ शेयर करत तिने अनिशाला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. या पोस्टबरोबर तिने खास कॅप्शन दिले आहे. ज्याने सर्वांचे लक्ष वेधले आहे.

या पोस्टच्या कॅप्शनमध्ये ती म्हणते की, 'हॅप्पी बर्थडे माय जेम! भरभरून जग, खूश रहा. त्यांनी तुझ्यासारखे लोक निर्माण करणं थाबवल, तू माझ्या आयुष्यात आहेस, याचा मला आनंद आहे,'

सईच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनवेळीचा हा फोटो आहे.

तर अनिशनेही सईच्या या पोस्टला कमेंट केली आहे. अनिशने तिच्या पोस्टला कमेंट करत लिहिलयं की, ‘थँक्स माय लव्ह’. अनेक कलाकारांनी सईच्या या पोस्टला कमेंट करत अनिशला शुभेच्छा दिल्या आहेत.

सई अनिशला बऱ्याच वर्षांपासून ओळखते. सई आणि अनिशने अनेक चित्रपट एकत्र केले आहे. त्यामुळे आता सई आणि अनिश लवकरच लग्नबंधनात अडकतील अशी आशा सईच्या चाहत्यांना आहे.

तर अनिशबद्दल बोलायचं झालं तर त्याने 'बायकोला हवं तरी काय' या वेब सीरिजच्या सहा भागांची निर्मिती केली आहे. याशिवाय धुरळा , गर्लफ्रेंड, मुरंबा , व्हायझेड टाइम प्लिज हे सिनेमे त्याने केले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJI SuryaKant: लंडनमध्ये सूर्यकांत यांना विचारला असा प्रश्न की कार्यक्रमच थांबला; भारतीय उच्चायुक्तालयाची तीव्र प्रतिक्रिया

मॉन्सून गोव्यात दाखल, दोन दिवसांत महाराष्ट्रात; १० जूनपर्यंत कोकण, मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा अंदाज

Shaktipeeth Highway Survey : शक्तिपीठ महामार्गाचा अंतिम आराखडा अद्याप नाही; सर्वेक्षणास सहकार्य करा, शंभूराज देसाईंच्या शेतकऱ्यांना सूचना

Horoscope : आज बनतोय रुचक आणि भद्र राजयोगाचा संयोग ! मेषसहित तीन राशींचा दिवस जाणार सोन्याचा

मुलाच्या निधनाने तुटून गेले होते नाना पाटेकर; नक्की काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT