Prajakta Mali Birthday : Sai Tamhankar Birthday Wish Prajakta Mali  Esakal
मनोरंजन

Prajakta Mali Birthday : 'आज बिल्डिंगमध्ये फरसाण...' सईनं दिल्या प्राजूला वाढदिवसाच्या शुभेच्छा

Vaishali Patil

Sai Tamhankar Birthday Wish To Prajakta Mali: मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे प्राजक्ता माळी. प्राजक्ता आज तिचा 34 वा वाढदिवस साजरा करत आहे.

तिच्या वाढदिवसानिमित्त ती सोशल मीडियावर चर्चेत आहे. अनेक कलाकारांनी आणि तिच्या चाहत्यांनी तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ च्या सगळ्या टिमनं तिला वाढदिवसाच्या हटके शुभेच्छा दिल्या आहेत. त्यातच मराठमोळी अभिनेत्री सई ताम्हणकर हिने देखील प्राजक्ताला शुभेच्छा दिल्यात.

सई आणि प्राजक्ता या चांगल्या मैत्रिणी आहेत. दोघीही 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' कार्यक्रमात एकत्र दिसतात. सई परीक्षकाची जबाबदारी सांभाळते, तर प्राजक्ताही सूत्रसंचालन करते.

आता सई कुणाला वाढदिवसाच्या शुभेच्छा या साध्या पद्धतिने देतच नाही असचं काही तिनं प्राजक्ताच्या बर्थडे वेळीही केलं आहे.

सईने तिचा आणि प्राजक्ताचा एक छान असा पारंपरिक लूकमधला फोटो सोशल मिडियावर शेयर केला आहे. या फोटोत दोघी खुपच सुंदर दिसताय. या फोटोवर सईनं लिहिलं की, "वाढदिवसाच्या खूप खपू शुभेच्छा प्राजू! आज बिल्डिंगमध्ये फरसाण वाटते तुझ्यावतीने… लव्ह यू प्राजक्ता".

सईच्या या स्टोरीची चर्चा आहे. तर प्राजक्तानं देखील ती स्टोरी रिशेयर करत सईचे आभार मानले आहे. सध्या सई आणि प्राजक्ता दोन्ही देखील ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे.

प्राजक्ता ही मराठी मनोरंजन विश्वातलं चर्चेतलं नाव आहे. प्राजक्ताने आपल्या चित्रपटातून प्रेक्षकांची मनं जिंकली. ती वेगवेगळ्या धाटणीच्या चित्रपटातुन प्रेक्षकांच्या भेटीला येत असते.

तिने 'पावनखिंड', 'पांडू', 'वाय' , 'लाकडाऊन' ती सतत प्रकाशझोतात असते. नुकतच तिने प्राजक्तराज हा तिचा ज्वेलरी ब्रॅण्डही सुरु केला आहे. त्याचबरोबर तिने प्राजक्ताकुंज नावाचा फार्महाऊसही घेतला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

VIDEO : उत्तरप्रदेशात मराठी तरुणाला भोजपुरीत बोलण्यासाठी दमदाटी, भाषा येत नाही म्हटल्यावर....पाहा व्हिडीओ

Latest Maharashtra News Live Updates: नांदगावच्या दाम्पत्याला मिळाला पूजेचा मान, ग्रामस्थ आनंदीत

VIRAL VIDEO: दुध विक्रेता चक्क दुधात थुंकला, घटनेचा सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल

Ashadhi Ekadashi : नाशिकच्या विठ्ठल मंदिरांत आषाढीला भक्तीचा झगमगाट

Crime News: हॉर्न वाजविल्याच्या किरकोळ कारणाने दोन गटांत हाणामारी; सूतगिरणी चौकातील घटना

SCROLL FOR NEXT