मनोरंजन

'तैमुरनंतर आता जहांगीर'; दुसऱ्या मुलाच्या नावामुळे सैफ- करीना ट्रोल

तैमुरनंतर आता दुसऱ्या मुलाच्या नावावरून वाद

प्रियांका कुलकर्णी

बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री करीना कपूर (Kareena kapoor) आणि सैफ अली खान (Saif ali khan) हे त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे नेहमी चर्चेत असतात. करीनाने २१ फेब्रुवारी रोजी चिमुकल्या पाहुण्याला जन्म दिला. नुकतंच सैफ आणि करीनाने त्याच्या दुसऱ्या मुलाचे नाव जाहीर केले. त्यांनी मुलाचे नाव जहांगीर असे ठेवले आहे. या नावामुळे आता करीना आणि सैफला अनेकजण सोशल मीडियावर ट्रोल करत आहेत. करीना आणि सैफचा पहिला मुलगा तैमुरच्या नावामुळे देखील करीना आणि सैफला अनेकांनी ट्रोल केले होत. आता दुसऱ्या मुलाचे नाव जहांगीर ठेवल्याने अनेक नेटकरी ट्विट करत करीना आणि सैफला ट्रोल करत आहेत.

'करीना कपूर आणि सैफ अली खानच्या मुलांची नाव- तैमुर, जहांगीर आणि तिसरा असेल औरंगजेब', असं एकाने म्हटलं. तर दुसऱ्याने लिहीलं, 'सैफ आणि करीना 21 व्या शतकातील मुघल राजवंश चालवत आहेत. आम्हाला वाटतं सैफ स्वत:ला बाबर समजत आहे.'

करीना आणि सैफला पाठिंबा

सोशल मीडियावर काहींनी करीना आणि सैफला पाठिंबा दिला आहे. एका नेटकऱ्याने ट्विट करत लिहिले, 'करीनाने तिच्या मुलाचे नाव जहांगिर ठेवले तर त्याबद्दल इतरांना काही फरक पडायला हवा का? मला अशा लोकांच्या मानसिकतेची किव येते. लोकांनी त्यांचा स्वत:चा विचार करावा'

सैफ व करीनाने २०१२ मध्ये लग्न केलं. 'टशन' या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान हे दोघं एकमेकांच्या प्रेमात पडले. २० डिसेंबर २०१६ रोजी तैमुरचा जन्म झाला. दुसऱ्या बाळाच्या जन्माआधी सैफ व करीना नवीन घरात राहायला गेले. गरोदरपणादरम्यान करीना चित्रपटाचे शूटिंग, जाहिरातींसाठी काम करत होती. याशिवाय गरोदरपणातील योगसाधनेचं महत्त्वसुद्धा ती सोशल मीडियावरील पोस्टद्वारे पटवून देत होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

प्रीती झिंटा आणि कुणाल खेमूचा ‘VIBE’ लवकरच होणार प्रदर्शित, अमेझॉन एमजीएम स्टुडिओजने केली घोषणा

Highway Accident: ‘मैत्रीचा हात कधी सोडणार नाही’… नियतीने दोघांनाही एकाच क्षणी हिरावले, जिवलग मित्रांची हृदयद्रावक अखेर

Latest Marathi News Live Update : हरियाणाचे मुख्यमंत्री नायब सिंग सैनी यांनी आज राज्य शिक्षण विभागाच्या बैठकीचे अध्यक्षस्थान भूषवले

Electricity Rate: महाराष्ट्रात उकाड्याने जीव त्रस्त, पण वीजबिलाच्या भीतीने पंखे बंद; वीजदरांनी सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले

Maharashtra Loan Waiver Update : शेतकरी कर्जमाफीचे पैसे लवकरच खात्यात जमा होणार, अधिकाऱ्यांच्या रजा-सुट्या रद्द; युद्ध पातळीवर काम करण्याच्या सूचना

SCROLL FOR NEXT