Saif Ali Khan 
मनोरंजन

Saif Ali Khan: "आम्ही मुलांना जन्म देतो त्यांना स्टारकिड तुम्ही बनवता"; सैफ अली खान थेटच बोलला!

Saif Ali Khan: स्टारकिड्सबाबत नुकताच एका मुलाखतीमध्ये सैफ आणि करिना यांना प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नाला सैफ आणि करिना यांनी दिलेल्या उत्तरानं अनेकांचे लक्ष वेधले आहे.

सकाळ डिजिटल टीम

Saif Ali Khan: अभिनेता सैफ अली खान (Saif Ali Khan) आणि अभिनेत्री करिना कपूर (Kareena Kapoor Khan) हे त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे नेहमीच चर्चेत असतात. सैफ आणि करिना यांना अनेक वेळा विविध कार्यक्रमांमध्ये स्पॉट केलं जातं. त्यांच्या फॅमिली हॉलिडे ट्रीपची देखील सोशल मीडियावर होत असतात. तैमूर आणि जेह या करिना आणि सैफच्या मुलं ही अनेकवेळा सोशल मीडियावरील चर्चेचा विषय ठरतात. तैमूर आणि जेह यांच्या सोशल मीडियावरील फोटोंना नेटकऱ्यांची पसंती मिळते. स्टारकिड्स आणि आडनाव याबाबत नुकताच एका मुलाखतीमध्ये सैफ आणि करिना यांना प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नाला सैफ आणि करिना यांनी दिलेल्या उत्तरानं अनेकांचे लक्ष वेधले आहे.

काय म्हणाला सैफ

तुमच्या आडनावाचा तुमच्या करिअरवर परिणाम होतो का? असा प्रश्न अनुपमा चोप्रा यांनी सैफ अली खान आणि करिनाला विचारला. या प्रश्नाचं उत्तर देताना सैफ म्हणाला, "ऑडियन्स हे स्टारकिड्समध्ये खूप इंटरेस्टेड असतात. स्टारकिड्सचे लोक सतत फोटो काढत असतात."

पुढे करिना म्हणाला, "तैमूर हा एकदा तायक्वांदोसाठी गेला होता. तिथे लोक त्याचे फोटो काढत होते, इंटरनेटवर त्याचे रील शेअर केले जात होते. आम्हाला असे अटेंशन नकोय. आम्ही स्टारकिड्स बनवत नाही. आम्ही मुलांना जन्म देतो. पण प्रेस, फोटोग्राफर्स आणि जनता त्या मुलांना 'स्टारकिड्स' बनवतात. जनतेला कदाचित निष्पापपणे फक्त स्टारकिड्स बघायचे असतात."

करिना म्हणाला, "फक्त प्रसिद्ध आडनाव असल्यानं तुम्ही टॅलेंटेड होऊ शकत नाही." आता करिना आणि सैफ यांच्या या वक्तव्याची चर्चा सध्या सोशल मीडियावर होत आहे.

सैफनं तैमूरबाबत सांगितलं, "तैमूरला अर्जेंटिनाचा लीड गिटारवादक किंवा फुटबॉलपटू व्हायचे आहे. त्याला अर्जेंटिनाला जायचे आहे जेणेकरून तो फुटबॉलपटू बनू शकेल."

करिना आणि सैफचे चित्रपट

सैफचा आदिपुरुष हा चित्रपट गेल्या वर्षी रिलीज झाला. तर करिनानं काही महिन्यांपूर्वी जाने जान या चित्रपटामधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. आता करिना आणि सैफ यांच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Ganeshotsav Traffic Rules: गणेशोत्सवात पुणे मध्यवर्ती भागातील हलक्या मालवाहू वाहनांना पहाटे २ ते सकाळी ११ पर्यंतच लोडिंग-अनलोडिंगची मुभा

Education Alert: शिक्षकांच्या आंदोलनामुळे शाळा बंद राहू नयेत; आरोग्य, बाल विकास, ग्रामपंचायत विभागाला सूचना

1980s AI Photo Trend: ChatGPT वरील एक फोटो पर्यावरणाला पडतोय महागात? व्हायरल AI फोटो 'ट्रेंड'मागचं धक्कादायक वास्तव

VARUN CHAKRAVARTHY: अफगाणिस्तानविरुद्ध भारताच्या विजयाला मोठं ग्रहण! वरुण चक्रवर्ती मालिकेतून बाहेर; एशियन गेम्सही मुकण्याची शक्यता

Road Accident: पोळ रांजणगावजवळ भीषण अपघात; अज्ञात वाहनाच्या धडकेत लासूरगावच्या २५ वर्षीय तरुणाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT