saif ali khan and nawazuddin siddiqui starrer sacred games 2 release date is postponed 
मनोरंजन

'सेक्रेड गेम्स 2' पाहायला प्रेक्षकांना करावी लागेल आणखी प्रतिक्षा

सकाळ वृत्तसेवा

सैफ अली खान आणि नवाजुद्दीन सिद्दीकी स्टारर वेबसिरिज 'सेक्रेड गेम्स'च्या पहिल्या भागाला भरभरुन यश मिळाल्यानंतर गणेश गायतोंडेंची पुन्हा कधी एंट्री होतेय, याची वाट वेबसिरिजचे वेड असणारे बघत आहेत. गेल्या मे महिन्यात 'सेक्रेड गेम्स 2' प्रदर्शित होणार असल्याचे वेबसिरिजच्या निर्मात्यांकडून सोशल मिडीयावर सांगिण्यात आले होते. पण एक महिना उलटला तरी ही वेबसिरिज काही प्रदर्शित झाली नाही.

आता वेबसिरिजच्या टीमकडून प्रेक्षकांना आणखी थोडी वाट बघावी लागणार असल्याचे कळते आहे. या सिरिजच्या दुसऱ्या भागाचा प्रोमो प्रदर्शित झाला आहे. या भागात सैफ आणि नवाजुद्दीन सोबतच कल्कि कोचलीन, रणवीर शोरे आणि पंकज त्रिपाठी दिसतील. 

'सेक्रेड गेम्स 2' आता ऑगस्ट महिन्यात प्रदर्शित होईल. मिड-डे च्या रिपोर्टनुसार ही वेबसिरिज 28 जूनला प्रदर्शित होणार होती. पण दुसऱ्या एका वेबसिरिजच्या प्रदर्शनामुळे ऑगस्ट महिन्यापर्यंत 'सेक्रेड गेम्स 2'ची प्रदर्शनाची तारीख लांबविण्यात आली आहे. सैफ अली खान सध्या होम प्रोडक्शनचा चित्रपट 'जवानी जानेमन'ची शूटींग करत आहे तर नवाजुद्दीन 'बोले चूडिया' या चित्रपटाच्या शूटींगमध्ये व्यस्त आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asian Games: नीरज नव्हता, पण तरी यशवीर-रोहितने भालाफेकीत जिंकली मेडल्स; गुलवीरलाही ऐतिहासिक रौप्य

Maharashtra Rain Forecast : राज्यात पावसाचा जोर वाढणार? हवामान विभागाकडून पुढील 5 दिवसांसाठी मोठे भाकीत; कोकण, मध्य महाराष्ट्रसह घाटमाथ्यावर बरसणार पाऊस

Ujjain Shahi Masjid: मुस्लीम पक्षाची याचिका फेटाळली! उज्जैनची शाही मशीद पाडण्यास स्थगिती देण्यासाठी उच्च न्यायालयाचा नकार

Latest Marathi News Live Update: शेतातील सुपीक मातीची चोरी, तक्रार दाखल

‘राइज अँड फॉल 2’मध्ये मोठा राडा! शहजाद पूनावालांशी सिवेत तोमरचं जोरदार भांडण; धक्का दिला, कपडेही फाडले, धक्कादायक व्हिडिओ समोर

SCROLL FOR NEXT