Saif ali khan and Sara Ali Khan together for the first time chor police SAKAL
मनोरंजन

Saif With Sara: बाप चोर, मुलगी पोलीस.. सैफ आणि सारा बापलेक पहिल्यांदा एकत्र, जाणून घ्या

सैफ आणि सारा दोघेही एका प्रोजेक्टमध्ये एकत्र दिसणार आहेत.

Devendra Jadhav

Sara Ali Khan and Saif Ali Khan working 1st Time News: सारा अली खानच्या करियरची गाडी सुसाट सुरु आहे. साराचा काहीच दिवसांपूर्वी जरा हटके जरा बचके सिनेमातून प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. साराचा हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर बऱ्यापैकी सुपरहिट झाला.

तर दुसरीकडे साराचे वडील आणि अभिनेता सैफ अली खानचा आदिपुरुष सिनेमा सध्या चांगलाच चर्चेत आहे.

सैफ अली खानने सिनेमात रावणाची भूमिका साकारलीय. आता हि बापलेकाची जोडी पहिल्यांदा एकत्र काम करणार आहे.

(Saif ali khan and Sara Ali Khan together for the first time chor police)

सैफ आणि सारा दोघेही एका प्रोजेक्टमध्ये एकत्र दिसणार आहेत. या प्रोजेक्टचे शूटिंग नुकतेच झाले असून दोघांची झलकही समोर आली आहे.

मात्र, हा प्रोजेक्ट काय आहे, याबाबत कोणतीही विशेष माहिती मिळालेली नाही. इंटरनेटवर समोर आलेल्या या झलकमध्ये सैफ अली खान एका कैद्याच्या भूमिकेत तर सारा अली खान पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसत आहे.

या फोटोमुळे लोकांची उत्सुकता वाढली आहे. हा नेमका कोणता प्रोजेक्ट असणार आहे ज्यामध्ये हे दोघे बाप लेक हटके स्टाईलमध्ये दिसणार आहे, हे जाणून घेण्याची लोकांना उत्सुकता आहे.

मीडिया रिपोर्टनुसार, 'जो कोणी सेटवर होता त्याने ही जोडी बाप लेकीची जोडी पाहिली, ते या दोघांचे बाँडिंग पाहून खूप प्रभावित झाले.' सूत्राने असेही सांगितले की सैफ आणि साराने शूट दरम्यान संपूर्ण वातावरण आरामदायक आणि आनंदी केले.

गंमत म्हणजे जेव्हा सैफ आणि सारा फिल्मसिटीमध्ये शूटिंग करत होते, तेव्हा इब्राहिम अली खानही तिथे उपस्थित होता. आता या प्रोजेक्टमध्ये इब्राहिमही त्यांच्यासोबत असणार का, याची उत्सुकता लोकांना लागली आहे.

यादरम्यान साराने सैफ अली खानसोबतचा एक फोटोही शेअर केला आहे, ज्यामध्ये इब्राहिमही तिच्यासोबत दिसत आहे. साराने हा फोटो शेअर करत लिहिले - हे फक्त जीन्समध्ये आहे. या फोटोत तिघेही कॅज्युअल दिसत आहेत. आता सैफ आणि सारा या दोघांचा एकत्र सिनेमा येणार, की एखादी जाहीरात येणार हे मात्र अद्याप गुलदस्त्यात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT