Saif Ali Khan Birthday special Know Unknown Facts  esakal
मनोरंजन

Saif Ali Khan Birthday : चित्रपटात काम करण्याची गरजच काय? तो 'पिढीजात नवाब'!

रहना है तेरे दिल में, दिल चाहता है, ओंकारा, कॉकटेल, तान्हाजी, आदिपुरुष सारख्या चित्रपटांतून सैफनं त्याच्या अभिनयातील वेगळेपण दाखवून दिले.

युगंधर ताजणे

Saif Ali Khan Birthday special Know Unknown Facts : बॉलीवूडमध्ये आपल्या अभिनयानं नेहमीच प्रेक्षकांच्या कौतूकाचा विषय राहिलेल्या सैफ अली खानची गोष्टच वेगळी आहे. त्यानं आजवर वेगवेगळ्या भूमिका करुन प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. तो बाकीच्या सेलिब्रेटींच्या तुलनेत सोशल मीडियावर फारसा अॅक्टिव्ह नसतो. तरीही त्याचा फॅनबेस मोठा आहे.

रहना है तेरे दिल में, दिल चाहता है, ओंकारा, कॉकटेल, तान्हाजी, आदिपुरुष सारख्या चित्रपटांतून सैफनं त्याच्या अभिनयातील वेगळेपण दाखवून दिले. या भूमिकांमुळे तो मोठ्या प्रमाणावर लोकप्रियही झाला. सैफ जेवढा लोकप्रिय आहे तेवढाच तो अनेक कारणांमुळे वादाच्या भोवऱ्यातही सापडल्याचे दिसून आले आहे. त्याचे करिना सोबतचे लग्न, मुलांची नावं यामुळे सैफ अली खान ट्रोल होत राहिला आहे.

Also Read - Adhik Shravan Maas : अधिक श्रावण मास चित्तशुद्धीचा पर्वकाळ

आज सैफ अली खानचा जन्मदिवस आहे. त्याच्या वाढदिवसानिमित्तानं त्याच्यावर चाहत्यांनी कौतूकाचा वर्षाव केला आहे. दोन महिन्यांपूर्वी प्रसिद्ध दिग्दर्शक ओम राऊतचा आदिपुरुष प्रदर्शित झाला होता. तो चित्रपट फारसा हिट झाला नाही. मात्र त्यातील सैफ अली खाननं साकारलेली रावणाची भूमिका प्रेक्षकांना कमालीची आवडली होती. यापूर्वी देखील सैफनं ज्या खलनायकी भूमिका साकारल्या त्या यशस्वी झाल्याचे दिसून येते.

भलेही सैफला चित्रपटांचे संस्कार घरातून मिळाले असेल, परंतू त्यानं मोठ्या संघर्षानं त्याची वेगळी ओळख बॉलीवूडमध्ये तयार केली. आज तो बॉलीवूडच्या आघाडीच्या अभिनेत्यांपैकी एक आहे. सैफला बॉलीवूडमधील छोटा नवाब म्हणूनही ओळखले जाते. १६ ऑगस्ट १९७० रोजी सैफचा जन्म झाला. मुळातच तो एका नवाबी घरात जन्माला आला. त्यामुळे बॉलीवूडमध्ये त्याचा इतका श्रीमंत अभिनेता दुसरा कुणी नाही.

यश चोप्रा यांच्या परंपरा नावाच्या चित्रपटापासून सैफनं त्याच्या बॉलीवूडच्या करिअरला सुरुवात केली होती. मात्र दिल्लगी आणि मैं खिलाडी तू अनाडी पासून त्याचे नाव झाले. सैफचं कुटूंब हिंदी चित्रपटसृष्टीशी संबंधित आहे. त्याची आई शर्मिला टागोर या प्रसिद्ध अभिनेत्री आहेत. त्याची बहिण सोहा अली खान ही देखील लोकप्रिय अभिनेत्री राहिली आहे.

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सैफ रियल लाईफमध्ये देखील नवाबी थाटात राहणारा अभिनेता आहे. त्याच्याकडे वडीलोपार्जित संपत्ती मोठी आहे. त्यामुळे अनेकजण त्याच्याविषयी बोलताना सैफला अभिनय क्षेत्रात काम करण्याची गरजच नाही. त्याच्याकडे एवढी प्रॉपर्टी आहे की, त्याच्या कुटूंबातील दहा पिढ्या आरामात राहू शकतील. मात्र सैफ हा नेहमीच नम्रपणानं वागत आला आहे.

सैफच्या एकुण प्रॉपर्टी विषयी सांगायचे झाल्या, त्याची एकुण संपत्ती ही १५ कोटी डॉलर अर्थात १ हजार १२० कोटी रुपये असल्याचे सांगितले जाते. सैफला महागड्या कार्सचा शौक आहे. मीडिया रिपोर्टसनं दिलेल्या माहितीनुसार काही वर्षांपूर्वी सैफच्या संपत्तीमध्ये ७० टक्के वाढ झाल्याचे सांगण्यात येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PMO and Raj Bhavan renamed : मोदी सरकारचा मोठा निर्णय! ‘पीएमओ’ अन् ‘राजभवन’ नावात केला बदल

Pune News : ‘बदनामी करणाऱ्या महिलेवर पोलिसांनी कारवाई करावी’; सूत्रधाराचाही शोध घेणार- आमदार चित्रा वाघ

Beed Crime: गेवराईत राडा! अमरसिंह पंडितांचे स्वीय सहाय्यक अमृत डावकरांवर हल्ला

Video : भल्यामोठ्या नंदीवर बसून प्राजक्ता-शंभूराजची रिसेप्शनला ग्रँड एंट्री ! थाटात झालं स्वागत

Latest Marathi News Live Update : ही सर्व पद्धत योग्य वाटत नाही- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

SCROLL FOR NEXT