Saif Ali Khan-Kareena esakal
मनोरंजन

Saif Ali Khan-Kareena: 'आमच्या मुलांना सोडा राव'! सैफ वैतागला

सैफ अली खान आणि करिना कपूरची मुलं ही नेहमीच चर्चेत असतात. त्यांना मिळणारं ग्लॅमर याची चमक काही वेगळीच असते.

सकाळ डिजिटल टीम

Saif Ali Khan Kareena Kapoor News: सैफ अली खान आणि करिना कपूरची मुलं ही नेहमीच चर्चेत असतात. त्यांना मिळणारं ग्लॅमर याची चमक काही वेगळीच असते. गेल्या काही दिवसांपासून दिवाळीच्या निमित्तानं सैफच्या घराबाहेर पापराझ्झींची गर्दी वाढली आहे. त्याला कंटाळून बाहेर देशी जाण्याचा निर्णय घेतल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. दरम्यान एका मुलाखतीमध्ये सैफनं फोटोग्राफर्सला एक आवाहन केलं आहे.

सैफ आणि करिना यांचे प्रेमप्रकरण, त्यांचे लग्न आणि मग त्यांची मुलं, त्यांची नावं हे सारं सोशल मीडियावर चर्चेत आलं होतं. त्यावरुन सैफला ट्रोलही करण्यात आले. त्यात करिनाच्या नावाचाही समावेश करावा लागेल. वास्तविक हे कपल त्यांच्या मुलांच्या नावासाठी नेटकऱ्यांच्या रडारवर होते. सुरुवातीला त्यांचा मोठा मुलगा तैमूर. आणि दुसरा जहांगीर. यामुळे नेटकऱ्यांनी सैफ आणि करिनाला वाट्टेल त्या शब्दांत सुनावले होते.

एवढं असलं तरी सैफ आणि करिनाच्या मुलांचे फोटो घेण्यासाठी पापाराझ्झी नेहमीच गर्दी करत असतात. बॉलीवूड हंगामाला दिलेल्या एका मुलाखतीमध्ये सैफनं फोटोग्राफर्सला विनंती केली आहे. ती म्हणजे आमच्या मुलांचा पाठलाग पापाराझ्झींनी सोडावा. स्टारकिड म्हटल्यावर काय असते हे आम्हाला माहिती आहे. त्यामुळे फोटोग्राफर्सला आमची विनंती आहे की, त्यांनी थोडं भान ठेवावं. बॉलीवूडमधील स्टारकिडमध्ये सर्वाधिक अटेंशन हे सैफच्या मुलांना मिळत असते.

माझ्या मुलांना जी प्रसिद्धी मिळते किंवा त्यांच्या नावाची जी चर्चा होत असते त्यामुळे मलाच अनेकदा त्रास होतो. त्याचा अतिरेक झाल्यानं काय करावं. असाही प्रश्न पडतो.लोकांना अनेक गोष्टी सोप्या वाटतात. मात्र तसे नाही. अशी खंत सैफनं यावेळी व्यक्त केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol Diesel Price: सणासुदीत पेट्रोल-डिझेल महागलं! जिओ-बीपीच्या दरवाढीनंतर सरकारी पंपांवर किती भाव? महाराष्ट्रातील नवे दर पाहा

Kochi Mini Cooper Accident : आईने वाढदिवसाला गिफ्ट केली ड्रीम कार, पोराने दारू पिऊन तिघांना चिरडले; म्हणाला- "पप्पा सगळं मॅनेज करतील"

Maharashtra Drought: ग्रामीण भागाला आधाराची गरज: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे प्रतिपादन; केंद्रीय पथकाची दुष्काळ पाहणी पूर्ण

Latest Marathi News Live Update : सोमेश्वर साखर कारखान्याच्या निवडणुकीची आज मतमोजणी; ८३ उमेदवारांचे भवितव्य ठरणार

Beed News: जरांगे यांच्या विरोधकाला बीडच्या पालीत मारहाण

SCROLL FOR NEXT