Saif Ali khan reaction on love aaj kal trailer
Saif Ali khan reaction on love aaj kal trailer  
मनोरंजन

सारा-कार्तिकच्या 'लव्ह आज कल' वर डॅडी सैफ नाराज, म्हणाला...

वृत्तसंस्था

मुंबई : 'लव्ह आज कल' चित्रपटाचे पोस्टर रिलीज झाल्यापासून त्याचा ट्रेलर कसा असेल याकडे सगळ्या इम्तियाजप्रेमींचं लक्ष लागलं होतं, आणि इम्तियाज अलीने पुन्हा एकदा आपल्या चाहत्यांची अपेक्षा पूर्ण केली आहे. 'लव्ह आज कल'चा ट्रेलर म्हणजे कार्तिक आर्यन, सारा अली खान आणि इम्तियाज अली यांनी केलेली जादू आहे. यामधली अभिनेत्री सारा अली खानचा सुपर बोल्ड अंदाज यामध्ये दिसला. तिच्या या बोल्ड अंदाजावर पापा सैफने प्रतिक्रिया दिली आहे. जाणून घ्या नक्की सैफ काय म्हणाला आहे सिनेमाच्या ट्रेलरवर.

इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या मुलाखतीमध्ये सैफला 'लव्ह आज कल' च्या ट्रेलरविषयी आणि साराविषयी विचारण्यात आले. यामध्ये कार्तिक आणि साराने बोल्ड सिन्सही दिले आहेत. सैफ म्हणाला, '' सारा आणि कार्तिकला मी सिनेमासाठी शुभेच्छा देतो पण, मला माझ्या चित्रपटाचा ट्रेलर जास्त आवडला होता''. 

यावरुन असे लक्षात येते की, सैफला चित्रपटाचा ट्रेलर फारसा रुचलेला नाही. सिनेमाची विशेष बाब म्हणजे पहिल्या 'लव्ह आज कल' च्या पहिल्या भागामध्ये साराचे बाबा म्हणजेच स्वत: सैफ होता. दुसऱ्या भागामध्ये सारा दिसणार आहे. सैफसोबत पहिल्या भागामध्ये मुख्य भूमिकेत दीपिका पदुकोन आणि गिसेली माँटेरो दिसले होते. पहिला भाग सुपरहिट ठरला होता. आता हे बघावं लागेल सैफची मुलगी सारा आणि कार्तिक या जादू दाखवतात. 

आताच्या परिस्थितीतली लव्हस्टोरी आणि जुन्या काळातली लव्ह स्टोरी यांचा मेळ याही चित्रपटात इम्तियाज अलीने घातला आहे. वीरचं झोईवर असलेलं आपार प्रेम, सारखा तो तिच्या मागे असणं, तिला सगळ्याच परिस्थितीत सांभाळू पाहणारा वीर एका वळणावर झोईला त्रासदायक वाटू लागतो. मात्र तो दूर गेल्यानंतर झोईला कळलेली त्याची किंमत आणि पुन्हा एकत्र आलेले झोई वीर यांची प्रेमकहाणी या चित्रपटात बघायला मिळेल. कार्तिक, सारा, आरूषी शर्मा, रणदीप हुडा हे या ट्रेलरमध्ये दमदार अभिनय करताना दिसतात. ट्रेलमधली गाणी ऐकून याआधीच्या 'लव्ह आज कल'ची आठवण आल्याशिवाय राहणार नाही.

दिग्दर्शक इम्तियाज अलीचा 'लव्ह आज कल' 14 फेब्रुवारीला म्हणजेच 'व्हॅलेंटाईन डे'ला आपल्या भेटीला येतोय. सारा अली खान आणि कार्तिक आर्यन या चित्रपटात मुख्य भूमिकेत असतील. 2009मध्ये आलेला सैफ अली खान आणि दीपिका पदुकोनचा पहिला 'लव्ह आज कल' आजही प्रेक्षकांचा आवडता आहे. त्यात इम्तियाज अली पुन्हा एकदा एक रेट्रो आणि सद्यस्थितीवर भाष्य करणारी लव्हस्टोरी घेऊन येत असल्याने त्याचे चाहते खूश आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shah Fake Video Case : झारखंड काँग्रेसचं एक्स अकाऊंट सस्पेंड; अमित शाह व्हिडीओ प्रकरणात मोठी कारवाई

Google Error : गुगल डाऊन! जगभरातील युजर्स त्रस्त; अमेरिकेतून 1400 तक्रारी

Yogi Adityanath : काँग्रेस सत्तेत आल्यास हिंदूंची विभागणी होईल - योगी आदित्यनाथ

IPL 2024, CSK vs PBKS: चेन्नईला पंजाबच्या गोलंदाजांनी रोखलं अन् फलंदाजांनी ठोकलं; ऋतुराजसेनेचा बालेकिल्ल्यात दुसरा पराभव

Loksabha election 2024 : जेडीयूचे माजी प्रदेशाध्यक्ष शशांक राव यांचा भाजपात प्रवेश; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती

SCROLL FOR NEXT