Ibrahim Ali Khan Sakal
मनोरंजन

Ibrahim Ali Khan: सैफचा मुलगा इब्राहिमच्या डेब्यू चित्रपटाच्या टायटलचा खुलासा, या तारखेपासून शूटिंग होणार सुरू

सैफ अली खानचा मुलगा इब्राहिमच्या चित्रपटाबाबतचे लेटेस्ट अपडेट समोर आले आहे.

सकाळ डिजिटल टीम

सैफ अली खानचा मुलगा इब्राहिम अली खान गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. अलीकडेच बातमी आली होती की इब्राहिमने देखील वडील सैफप्रमाणेच चित्रपटात करिअर करण्याचा निर्णय घेतला आहे आणि तो लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे.

निर्माता करण जोहर त्याच्या पहिल्या चित्रपटाची निर्मिती करणार आहे. आता इब्राहिमच्या या चित्रपटाबाबतचे लेटेस्ट अपडेट समोर आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, इब्राहिम अली खानच्या पहिल्या चित्रपटाचे नाव सरजमीन असेल. हा एक इमोशनल-थ्रिलर चित्रपट असेल, ज्यामध्ये इब्राहिम महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. 24 फेब्रुवारीच्या आसपास हा चित्रपट फ्लोरवर जाऊ शकतो.

चित्रपटाच्या प्री-प्रॉडक्शनचे काम सुरू झाले असून निर्माते चित्रपटाच्या शूटिंगची तयारी करत आहेत.

इब्राहिम अली खानच्या या चित्रपटात काजोलही दिसणार असून, ती पृथ्वीराजसोबत दिसणार आहे. इब्राहिम आणि त्याची बहीण सारा अली खान यांचे फोटो आणि व्हिडिओ अनेकदा सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. दोघांमध्ये खूप प्रेम आहे. दोघेही अनेकदा एकत्र मस्ती करताना दिसले आहेत.

सारा अली खानने केदारनाथ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते, ज्यामध्ये ती दिवंगत स्टार सुशांत सिंग राजपूतसोबत होती. यानंतर साराने रणवीर सिंगसोबत सिम्बा या चित्रपटात काम केले, जो बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला.

सारा आणि इब्राहिम अली खान ही सैफची पहिली पत्नी अमृता सिंगची मुले आहेत. अमृताशी घटस्फोट घेतल्यानंतर सैफने 2012 मध्ये करीना कपूरसोबत लग्न केले.

सध्या सैफ अली खान त्याच्या आदिपुरुष या नवीन चित्रपटाच्या रिलीजची वाट पाहत आहे, ज्यामध्ये तो प्रभास, सनी सिंग आणि क्रिती सेननसोबत दिसणार आहे. हा चित्रपट यावर्षी जून महिन्यात थिएटरमध्ये दाखल होणार आहे. त्याचे दिग्दर्शक ओम राऊत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT