saif ali khan viral video on angry on media while they click photos of saif and jeh ali khan  SAKAL
मनोरंजन

Saif Ali Khan: लहान मुलं आहेत अन् तुम्ही... सैफ अली खानचा राग अनावर, व्हिडीओ व्हायरल

सैफ अली खानचा एक व्हिडीओ व्हायरल झालाय

Devendra Jadhav

Saif Ali Khan News: सैफ अली खान आणि करीना कपूर खान हे सोशल मीडियावर चर्चेतील कपल. अनेकदा सोशल मीडियावर सैफ - करीना आणि त्याच्या कुटुंबाची चर्चा असते. सैफ - करीना आणि त्यांची मुलं तैमूर, जेह यांचे फोटो काढण्यासाठी मीडिया उत्सुक असते.

पण नुकताच एक किस्सा घडलाय त्यामुळे सैफ अली खान पापाराझीवर भडकला आहे. काय घडलंय नेमकं बघूया...

खरं तर, पापाराझींचा एक ग्रुप कायमच सैफ - करीनाच्या घराबाहेर त्यांचे फोटो काढण्यासाठी सज्ज असतो. मात्र नुकताच एक किस्सा घडलाय ज्यामुळे सैफ पापराझींवर भडकला आहे.

अलीकडे, मीडिया जेहच्या फुटबॉल सामन्यासाठी गेली होती. सामना संपल्यावर सैफ बाहेर आला आणि मीडियाला पाहताच नाराज झाला. समोर आलेल्या एका व्हिडिओमध्ये सैफ जेहसोबतचा सामना संपल्यानंतर बाहेर येत होता. तोच प्रसारमाध्यमांनी फोटो काढण्यास सुरुवात केली.

सैफला हे पाहिल्यावर चांगलाच राग आला. "एका छोट्या फुटबॉल सामन्याचा तुम्ही फिल्म इव्हेंट करु नका.", असं म्हणत त्याचा राग अनावर झाला.

याशिवाय सैफने त्यांना आठवण करून दिली की, ही त्यांच्या मुलाची खाजगी वेळ आहे आणि मीडियाने त्याचा आदर केला पाहिजे.

दुसरीकडे, करीना कपूर खान मीडियाला पाहून खूश झाली आणि जेहसोबत तिच्या कारमधून निघून गेली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अमरावती शिक्षकमध्ये महायुतीतच मोठी बंडखोरी, भाजपच्या तीन नेत्यांचे अर्ज; रवी राणांचाही पक्ष रिंगणात

Harmanpreet Kaur : हरमनप्रीत कौरने तडकाफडकी कर्णधारपद सोडलं! म्हणाली, संघासाठी रक्ताचे पाणी केले, पण...; आता नवी कॅप्टन कोण?

High Court : नागरिकांना वगळले जात असेल तर SIR चा उपयोग काय? उच्च न्यायालयाचा निवडणूक आयोगाला कडक प्रश्न

Marathi News Live Updates:जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणुकीत पडळकर, विशाल पाटील आणि सत्यजित देशमुखांना दिलासा; अर्ज वैध, काही अर्ज अवैध ठरल्याने राजकीय घडामोडींना वेग

एका ओव्हरमध्ये ६ षटकार ठोकायचेत! वैभव सूर्यवंशीने सांगितली भविष्यातील ६ मोठ्या स्वप्नांची यादी; नंबर-१ पाहून चाहतेही चक्रावले

SCROLL FOR NEXT