Saif Ali Khan & Kareena Kapoor Khan Esakal
मनोरंजन

Saif-Kareena Love story:'कुठे सुरू झाली सैफ-करीनाची लव्हस्टोरी? 'टशन' च्या सेटवर नाही तर.., एका फोटोनं खोलली पोल

सोशल मीडियावर सैफ-करीनाचा एक फोटो व्हायरल झाल्यावर सेलिब्रिटी फोटोग्राफर डब्बू रतनानीनं सैफ-करीनाच्या लव्हस्टोरीविषयी मोठा खुलासा केला आहे.

प्रणाली मोरे

Saif-Kareena Love story: बॉलीवूड इंडस्ट्रीमंध्ये अशा अनेक जोड्या आहेत ज्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील लव्हस्टोरी खूप प्रसिद्ध होतात. लोकांना अनेकदा आपल्या आवडत्या कलाकारांच्या लव्ह स्टोरी ऐकायला आवडतात. अशामध्ये आम्ही तुम्हाला सांगायला जाणार आहोत सैफ अली खान आणि करीना कपूर यांच्या प्रेमकहाणीला नेमकी सुरुवात कशी झाली.

सैफ-करीनाचे प्रेमाचे किस्से तसे प्रसिद्ध आहेतच पण अनेकदा ऐकायला मिळालंय किंवा वाचायला मिळालं आहे की या दोघांची पहिली भेट सिनेमाच्या सेटवर झाली होती.(Saif-Kareena Love story begin one photo reveal all truth)

असं म्हटलं जातं की 'टशन' सिनेमाच्या सेटवर या दोघांमध्ये जवळीक वाढली होती. पण असं असलं तरी सैफ आणि करीनाच्या पहिल्या भेटीसंदर्भात लोकांमध्ये कन्फ्यूजन वाढताना दिसत आहे.

काही दिवसांपूर्वीच प्रसिद्ध फोटोग्राफर डब्बू रतनानीनं याचा खुलासा केला आहे. त्याचे म्हणणे आहे की सैफ आणि करीनाची लव्हस्टोरी ही त्याच्या स्टुडिओपासून सुरू झाली होती. डब्बू रतनानीनं चाहत्यांसोबतच्या 'आस्क मी एनिथिंग' सेशन दरम्यान याचा खुलासा केला आहे.

जिथे एका सोशल मीडिया युजरनं सैफ आणि करीनाचा एक जुना फोटो शेअर करत प्रश्न केला की यामागे काय कहाणी आहे. सैफ-करीनाच्या या फोटोला डब्बू रतनानीनं २००५ मध्ये क्लिक केलं होतं.

नेटकऱ्याच्या प्रश्नाला उत्तर देताना फोटोग्राफरनं सांगितलं की हे पहिल्यांदा त्याच्याच स्टुडिओत भेटले होते. आणि इथूनच दोघांची लव्हस्टोरी सुरू झाली. शेअर केलेला फोटो ब्लॅक अॅन्ड व्हाइट आहे. ज्यात सैफ आणि करीना पोझ देताना दिसत आहेत.

Kareena Kapoor & Saif Ali Khan

इथेच सैफला करिना पहिल्या भेटीत आवडली होती. ज्यानंतर अनेक वर्ष दोघांनी डेट केलं आणि मग अखेर २०१२ मध्ये त्यांनी लग्नगाठ बांधली. करीना आणि सैफ यांनी एकत्रितपणे ५ सिनेमे केले आहेत. या कपलसोबतच यांचे चाहते त्यांच्या मुलांवरही प्रेमाचा वर्षाव करताना दिसतात. तैमूरला घेऊन चाहत्यांमध्ये भलतीच क्रेझ पहायला मिळते. करीनाची दोन्ही मुलं नेहमीच चर्चेत पहायला मिळतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Weather : ऑक्टोबर हिटचा तडाखा कायम, मात्र काही जिल्ह्यांत पावसाचा येलो अलर्ट; जाणून घ्या IMD चा अंदाज

Maharashtra Water Crisis: राज्यात पाणीकपात लागू! १६ ऑक्टोबरपासून १० टक्के कपात; जाणून घ्या सरकारचे नवे नियम

आजचे राशिभविष्य - 06 सप्टेंबर 2026

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 06 सप्टेंबर 2026

Leopard : दुष्काळात तेरावा महिना, भेंडाळा शिवारात बिबट्याच्या हल्ल्याचे सत्र सुरूच; पिंजरा लावण्याची मागणी

SCROLL FOR NEXT