मनोरंजन

तैमुरच्या भावाचं नावही एका मुघल बादशाहाचं

बॉलीवूडचा नवाब सैफ अली खाननं जेव्हा अभिनेत्री करिनाशी लग्न केलं तेव्हा ते लग्न आणि ते दोघेही चर्चेत आले होते.

युगंधर ताजणे

बॉलीवूडचा नवाब सैफ अली खाननं जेव्हा अभिनेत्री करिनाशी लग्न केलं तेव्हा ते लग्न आणि ते दोघेही चर्चेत आले होते. त्यांना पहिलं अपत्य झालं त्याचं नाव त्यांनी तैमुर असं ठेवलं तेव्हाही त्यांच्यावर जोरदार टीका झाली होती. आणि आताही ते चर्चेत आले आहे. त्यांना काही महिन्यांपूर्वी मुलगा झाला. त्याचं टोपण नाव त्यांनी जेह असं ठेवलं. मात्र आता त्याचं खरं नाव काय, हे आता ते जाहीर करणार असून माध्यमांच्या हाती ते नावं आलं आहे. तैमुर प्रमाणेच त्यांनी आपल्या दुसऱ्या मुलाचं नाव देखील एका मुघल बादशाहाच्या नावावरुनच ठेवलं आहे. ज्यावरुन पुन्हा नव्यानं वादाला तोंड फुटण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

करिना आणि सैफनं त्यांच्या दुसऱ्या मुलाचं नाव हे जहांगीर असं ठेवलं आहे. अशी माहिती सुत्रांनी दिली आहे. दुसरीकडे करिनाच्या घरातील एका सदस्यानं ही माहिती दिल्याचेही सांगण्यात आले आहे. सैफ आणि करिना एका कार्यक्रमाच्या माध्यमातून त्यांच्या दुसऱ्या मुलाच्या नावाची घोषणा करणार असल्याचे कळते आहे. त्या दोघांनाही आपल्या दुसऱ्या मुलाचे नाव जहांगीर ठेवण्याबाबत काहीच आक्षेप नसल्याचे त्यांनी सांगितले आहे.

तैमुरचं टोपण नाव हे टिमटिम असे आहे. तर छोट्या भावाचे नाव जेह असं आहे. आणि ऑफिशियली ते जहांगीर असे ठेवण्यात येणार आहे. वास्तविक या नावांचा कोणत्याही धर्माशी संबंध नसल्याचे सांगण्यात आले आहे. तैमुरचं जेव्हा नाव ठेवण्यात आलं तेव्हा त्यावरुन मोठा वाद झाला होता. तो वाद अनेक दिवस माध्यमांमध्ये रंगला होता. सैफच्या परिवारातील सदस्यांनी सांगितलं की, तो ज्या धर्माचं प्रतिनिधित्व करतो त्यावरुन त्याला हवं ते नाव ठेवण्याचा अधिकार असल्याचं सांगण्यात आलं आहे.

मुघल बादशाह अकबर यांचा मुलगा सलीम यांचे नाव जहांगीर असे होते. हा एक पारसी शब्द आहे. ज्याचा अर्थ जगावर राज्य करणारा असा आहे. जहांगीर यांचे खरे नाव नूर -उद-दीन- मोहम्मद सलीम असे होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJP protest: आणखी एका भाजप नेत्याच्या मुलीचा 'सीजेपी'ला पाठिंबा! सत्तापक्षाला घरचा आहेर, धर्मेंद्र प्रधानांची उडवली खिल्ली

Vaibhav Sooryavanshi: झिम्बाब्वे मालिका गाजवल्यानंतर वैभव सूर्यवंशी पुन्हा मैदानात; जाणून घ्या कधी, कुठे आणि कोणत्या संघाकडून खेळणार पुढचा सामना

Latest Marathi News Live Update : मुसळधार पावसामुळे कोयना धरणाच्या पातळीत वाढ

Pune Flood Alert: पुण्यात अलर्ट! खडकवासला धरणातून मोठा विसर्ग; बाबा भिडे पूल पाण्याखाली, रस्ता बंद, युवकाची अग्निशामक दलाकडून सुटका

Nanded Water: नांदेडकरांसाठी दिलासादायक बातमी! विष्णुपुरी धरणाच्या पाणीसाठ्यात एका दिवसात 9 टक्क्यांची वाढ, धरणांना जीवदान

SCROLL FOR NEXT