sairat fame actress rinku rajguru participate in bus bai bus show on zee marathi host by subodh bhave sakal
मनोरंजन

Rinku Rajguru: मी नको म्हणत होते पण त्यांनी.. 'सैराट'बाबत रिंकूचा मोठा खुलासा

'विहिरीत उडी मारतेस की देऊ ढकलून' रिंकूने सांगितला 'सैराट'चा तो किस्सा..

नीलेश अडसूळ

Rinku Rajguru : मराठी चित्रपटसृष्टीमध्ये आपल्या अभिनयानं कमी वेळेत लोकप्रिय झालेली अभिनेत्री म्हणून रिंकु राजगुरुचं (rinku rajguru) नाव घेता येईल. प्रसिद्ध मराठी चित्रपट दिग्दर्शक नागराज मंजुळे दिग्दर्शित 'सैराट' (sairat) या चित्रपटामध्ये रिंकुनं भूमिका केली होती. तिचा तो पहिला चित्रपट. त्यानंतर तिनं मागे वळून पाहिलं नाही. सध्याच्या घडीला मराठी अभिनेत्रींमध्ये ती आघाडीची अभिनेत्री आहे. वेबसीरिज असो वा चित्रपट रिंकुनं दमदारपणे आपल्या अभिनयानं प्रेक्षकांना जिंकून घेतलं आहे. नुकत्याच येऊन गेलेल्या झुंड (jhund) आणि 'आठवा रंग प्रेमाचा' या चित्रपटांतून रिंकूने आपल्या अभिनयाची जादू दाखवली. रिंकु नुकतीच झी मराठी वरील 'बस बाई बस' या कार्यक्रमात सहभागी झाली होती. यावेळी तिनं सैराट चित्रपटातील एक भन्नाट किस्सा सांगितला. (actress rinku rajguru participate in bus bai bus show on zee marathi host by subodh bhave)

गेली काही दिवस सुबोध भावेच्या 'बस बाई बस' या कार्यक्रमाची भलतीच चर्चा आहे. झी मराठी वाहिनीवरील 'बस बाई बस' या नव्या मालिकेत महिला कलाकार, राजकारणी सहभागी होतात यावेळी त्यांना इतर महिलांच्या मनातले प्रश्न विचारले जात आहेत. अशी भन्नाट संकल्पना असणाऱ्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुबोध भावे (subodh bhave) करत आहे. या कार्यक्रमात आजवर अनेक दिग्गजांनी हजेरी लावली आहे. सैराट फेम अभिनेत्री रिंकू राजगुरू हिने नुकतीच या कार्यक्रमात हजेरी लावली. यावेळी तिने सैराट चित्रपटात तिला विहिरीत कशा पद्धतीने ढकलण्यात आले हा किस्सा सांगितला.

सैराट चित्रपटात आर्ची म्हणजेच रिंकू विहिरीत उडी मारतानाचा सीन आहे. हा सीन प्रचंड गाजला. म्हणून 'तुम्ही अशी विहिरीत उडी मारली की सगळ्या पोरींना तुमचं कौतुक वाटलं. तुम्हाला आधीच पोहता येत होत की तुम्ही तेव्हा शिकलात?' असा पप्रश्न रिंकूला या कार्यक्रमात विचारण्यात आला. त्यावर रिंकू म्हणाली, 'मला आधीपासूनच पोहायला येत होतं. मला माझ्या बाबांनी उन्हाळ्याच्या सुट्ट्यामध्ये पोहायला शिकवलं होतं. त्याचा उपयोग मला सैराटसाठी झाली. पण उडी मी पहिल्यांदाच मारली होती. तेव्हा मला फार भिती वाटली होती'.

रिंकू पुढे म्हणाली, 'शुटच्या वेळी मी खूप घाबरलेली होते. मला उंचावरून उडी मारायला खूप भिती वाटत होती. मी त्यांना शुटींगच्या वेळी म्हणत होते की, मी नाही करत हा शॉर्ट, आपण काहीतरी पर्याय शोधू, पण त्यांनी मला म्हणाले, 'मारते की देऊ ढलकलून'.. मग मी थोडा वेळा घेऊन तो सीन केला.  आधी कधीच मी विहीरीत उडी मारलेली नव्हती.  पण पहिल्या 2 टेकमध्ये मी सीन कम्प्लिट केला होता.  पहिल्या वेळी चेहऱ्यावर खूप टेन्शन होतं दुसऱ्या वेळी सीन पूर्ण केला'. असा अनुभव तिने सांगितला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Audio Clip: उद्घाटनाच्या कार्यक्रमाला 70 हजार रुपये; हॉटेल भाग्यश्रीच्या मालकाचा रेट फिक्स! ऑडिओ क्लिप व्हायरल

हृदयद्रावक! ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या संघातील फुटबॉलपटू Diogo Jota चा कार अपघातात मृत्यू, १० दिवसांपूर्वीच झालं होतं लग्न

Thackeray Rally: मुंबईत ५ जुलैला ठाकरे बंधूंची संयुक्त रॅली, तयारीसाठी बैठकांचा सपाटा, पण अजून पोलिसांची परवानगी नाही

Nashik Police Transfers : नाशिक पोलिस उपायुक्तांच्या बदल्या; नवीन नियुक्तीला उशीर का?

‘गुलाबी साडी’ फेम संजू राठोडची मराठी गाणी बॉलिवूडमध्ये झळकणार....

SCROLL FOR NEXT