मनोरंजन

'सैराट'चा परश्या आता सैनिकाच्या भूमिकेत; वेब सीरिज लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

स्वाती वेमूल

मुंबई: 'सैराट' या चित्रपटात परश्याची भूमिका साकारून सबंध महाराष्ट्राला याड लावणारा अभिनेता आकाश ठोसर आता '१९६२ : द वॉर इन द हिल्स' या वेब सीरिजमध्ये प्रमुख भूमिका साकारणार आहे. महेश मांजरेकर दिग्दर्शित या सीरिजमध्ये अक्षय देओल आणि सुमीत व्यास यांच्यासह इतर प्रतिष्ठित कलाकारदेखील आहेत. या हॉटस्टार स्पेशल सीरिजची कथा वास्तविक घटनांवर आधारित आहे. भारत आणि चीनदरम्यान झालेल्या युद्धाची पार्श्वभूमीसुद्धा यामध्ये दाखवण्यात येणार आहे. 

या सीरिजमध्ये आकाश भारतीय जवानाची भूमिका साकारणार आहे. याविषयी तो म्हणाला, "ही वेब सीरिज म्हणजे माझ्यासाठी एक स्वप्नवत प्रोजेक्ट आहे. सैन्यात दाखल होण्याचं माझं लहानपणापासूनचं स्वप्न होतं. त्यासाठी मी दोन वेळा परीक्षासुद्धा दिली होती. पोलीस दलातही काम करण्यासाठी मी प्रयत्न केला होता. पण अभिनयाचा योगायोग आयुष्यात आल्याने सैन्यदल केवळ स्वप्नच राहिलं. मी जर अभिनेता झालो नसतो तर निश्चितच देशाच्या संरक्षणासाठी कार्यरत असतो."

 "करिअरमध्ये पहिल्यांदाच मला एका सैनिकाची भूमिका साकारण्याची संधी मिळाली आहे. आनंद आणि अभिमानाने माझा ऊर भरून आला आहे. त्यांचा पोशाख परिधान करण्याचा क्षण माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे", अशा शब्दांत त्याने भावना व्यक्त केल्या. सीरिजमध्ये आकाश हा किशन नामक जवानाची भूमिका साकारत आहे.

'१९६२: द वॉर इन द हिल्‍स' ही वेब सीरिज येत्या २६ फेब्रुवारी रोजी डिस्ने प्लस हॉटस्टारवर प्रदर्शित होत आहे.

-----------------------------------

(संपादन- पूजा विचारे)

sairat fame akash thosar to play an important role in 1962 the war in the hills web series

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan Cricket : पाकिस्तानात शाहिद आफ्रिदीच्या नावावरून पसरलीय अफवा; नेमकं काय घडलं?

कोकणात मध्यरात्री बाप्पाची ‘चोरी’ होते? दारात गणपती ठेवून फटाके फोडण्यामागचं कारण ऐकून व्हाल भावूक!

श्रीविद्या अन् सीमंतमच्या विधी! सामंथाला ओटीभरणीत चाळणीने अंघोळ का घातली? काय आहे परंपरा? Video

Markandeya Parvat Yatra Ban : मार्कंडेय गडावर ऋषीपंचमी यात्रेला यंदाही 'ब्रेक'; भाविकांना केवळ पहिल्या पायरीपर्यंतच प्रवेश, प्रशासनाचा निष्काळजीपणा?

PhonePe Transaction : ‘फोन पे’ व्यवहार अन् कापडाच्या तुकड्याने उघडला पाच लाखांच्या चोरीचा सुगावा!, कोल्हापुरातील घटना

SCROLL FOR NEXT