मनोरंजन

Sakal Sanman Puraskar 2024: आयुष्मानचा 'स्टार ऑफ द डेकेड' पुरस्कारानं गौरव; पोस्ट शेअर करत म्हणाला, "मी आभारी आहे!"

Ayushmann Khurrana: सकाळ सन्मान पुरस्कार (Sakal Sanman Puraskar) सोहळ्यात आयुष्मानला 'स्टार ऑफ द डेकेड' या पुरस्कारानं गौरवण्यात आलं आहे.

सकाळ डिजिटल टीम

Ayushmann Khurrana: अभिनेता आयुष्मान खुराना (Ayushmann Khurrana) हा त्याच्या अभिनयानं नेहमीच त्याच्या अभिनयानं प्रेक्षकांची मनं जिंकतो. आयुष्माननं अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केलंय. तसेच त्याला अनेक पुरस्कारांनी देखील गौरवण्यात आलं. नुकत्याच पार पडलेल्या सकाळ सन्मान पुरस्कार (Sakal Sanman Puraskar) सोहळ्यात आयुष्मानला 'स्टार ऑफ द डेकेड' (Star of the Decade Award) या पुरस्कारानं गौरवण्यात आलं आहे. हा पुरस्कार मिळाल्यानंतर आयुष्माननं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन सकाळ मीडियाचे आभार मानले आहेत.

आयुष्माननं शेअर केला फोटो

आयुष्यमाननं इन्स्टाग्रामवर नुकताच एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये आयुष्यमानच्या हातात ट्रॉफी दिसत आहे. या फोटोला आयुष्माननं कॅप्शन दिलं, "सकाळ मीडिया मी आभारी आहे!'स्टार ऑफ द डेकेड' पुरस्कार मिळाला" आयुष्माननं शेअर केलेल्या फोटोवर नेटकऱ्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

आयुष्मानचे चित्रपट

आयुष्माननं 2012 मध्ये रिलीज झालेल्या विकी डोनर या चित्रपटामधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. त्यानंतर आयुष्माननं बरेली की बर्फी, शुभ मंगल सावधान, बधाई हो या चित्रपटांमध्ये काम केलं. 2018 मध्ये रिलीज झालेल्या त्याच्या अंधाधुन या चित्रपटाला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली. या चित्रपटातील आयुष्मानच्या अभिनयाचं अनेकांनी कौतुक केलं. तसेच या चित्रपटामुळे आयुष्मानला विशेष लोकप्रियता मिळाली. गेल्या वर्षी आयुष्मानचा ड्रीम गर्ल-2 हा चित्रपट रिलीज झाला. या चित्रपटाला देखील प्रेक्षकांची पसंती मिळाली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

INDW vs AUSW Live: भारतीय संघाचे T20 World Cup मधून पॅकअप! ऑस्ट्रेलियाचा दणदणीत विजय अन् दक्षिण आफ्रिका उपांत्य फेरीत... हरमनप्रीत कौरच्या संघाला अपयश

IND vs IRE 2nd T20I : आयर्लंडने इतिहास रचला! भारतीय संघाला ट्वेंटी-२० मालिकेत नमवले, श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाची लाजीरवाणी सुरुवात

पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवर वाढला मृत्यूचा धोका! टोल टाळण्यासाठी 'नो-एंट्री'तून वाहनांची सर्रास एंट्री; नियमांना हरताळ

Latest Marathi News Update : राज्यासह देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

Vidarbha Rain Alert : विदर्भासाठी दिलासादायक बातमी! पावसाचा जोर वाढणार, ११ जिल्हे यलो अलर्टवर

SCROLL FOR NEXT