Salaar Twitter Review: Esakal
मनोरंजन

Salaar Twitter Review: 'कोणता नशा केलास भावा?' सालार काही केल्या पटेना! नेटकऱ्यांनी घेतली प्रभासची शाळा..

Vaishali Patil

Salaar Twitter Review: बाहूबली स्टार प्रभास गेल्या अनेक दिवसांपासून त्याचा आगामी सिनेमा सालारमुळे तो चर्चेत होता. बऱ्याच दिवसांपासून या चित्रपटाची हवा आहे. हे वर्ष प्रभाससाठी काही खास गेलं नाही. काही महिन्यांपुर्वी आदिपुरुष सिनेमाच्या माध्यमातुन प्रभु श्रीरामाच्या भुमिकेतुन प्रभास प्रेक्षकांच्या भेटीला आला मात्र हा आदिपुरुष बॉक्स ऑफीसवर दणकुन आपटला.

त्या आधीही प्रभासचा राधे श्याम सिनेमाही फ्लॉप झाला होता. म्हणुन प्रभासच्या चाहत्यांना त्याच्या आगामी सालार या चित्रपटापासून खुप अपेक्षा आहे. प्रेक्षकांना सालारच्या ट्रेलरची प्रतिक्षा लागली होती. त्यात काल संध्याकाळी या चित्रपटाचा ट्रेलर रिलिज झाला.

प्रशांत नील दिग्दर्शित 'सालार पार्ट 1: सीझफायर' या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज आल्यानंतर सोशल मिडियावर फक्त याच चित्रपटाची चर्चा आहे. या चित्रपटात 1000 वर्षांपूर्वी खानसार जंगलातील भयानक डाकूंची कहानी दाखवण्यात येणार आहे. यासोबतच दोन मित्रांमधील कथाही प्रेक्षकांना पहायला मिळणार आहे. काही तासातच सालारचा ट्रेलर सोशल मिडियावर व्हायरल झाला.

प्रशांत नीलच्या 'सालार पार्ट 1: सीझफायर' या चित्रपटाचा ट्रेलर 3 मिनिटे 47 सेकंदांचा आहे. ज्यात पृथ्वीराज सुकुमारन आणि प्रभास महत्त्वाच्या भूमिकेत आहेत तर जगपती आणि श्रुती हासनही ट्रेलरमध्ये दिसत आहे.

आता 'सालार'चा ट्रेलर समोर आल्यानंतर नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. काहींनी याला उत्कृष्ट म्हटलं तर काहींनी याला क्रिंज म्हटलं.

'सालार'चा ट्रेलर पाहिल्यानंतर एका यूजरने सालारला क्रिंज म्हटले आहे. तर ट्रेलरच्या शेवटी प्रभास इंग्रजीत बोलतो तो संवाद अनेकांना आवडलेला नाही.

तर अनेकांनी प्रभासच्या डायलॉग डिलिव्हरीची ही खिल्ली उडवली आहे. एकाने लिहिले - असं वाटतंय तुम्ही नशेत आहात आणि कोणीतरी तुम्हाला लगेच डबिंग करायला सांगितले आहे. अनेकांनी या चित्रपटाला अपेक्षापेक्षा जास्त वाईट म्हटलं आहे. तर चित्रपटावरही मीम्स देखील व्हायरल होत आहे. तर दुसरीकडे या चित्रपटात श्रुती हासनच्या भूमिकेचीही चर्चा झाली आहे.

तर दुसरीकडे या चित्रपटाचा ट्रेलर पाहिल्यानंतर चांगल्या प्रतिक्रिया देखील आहेत. 'बॉक्स ऑफिसवर 22 डिसेंबरला बॉस येणार आहे.' असं एकाने लिहिले आहे.

तर दुसर्‍या यूजरने लिहिले 'याला म्हणतात धमाका.. हा एक स्फोटक ट्रेलर आहे. चित्रपट 1000 कोटी रुपयांपेक्षा कमी कमावणार नाही.'

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Crime News : महिलेच्या नावाने इंस्टाग्राम अकाउंट काढलं अन् नको ते व्हिडिओ टाकले... मुंबईत नेमक काय घडलं?

Helicopter News : नादच पुरा केला ! कोल्हापूरच्या पठ्ठ्याने हेलिकॉप्टर विकत घेतलं, सांगलीत सासऱ्याला दाखवायला गेल्यावर जावयाचं केलं असं स्वागत...

कफ सिरपमध्ये ब्रेक ऑइलचं विषारी केमिकल, किडनी निकामी होऊन १४ मुलांचा मृत्यू; औषधावर घातली बंदी

Latest Marathi News Live Update: भरदिवसा व्यावसायिकाच्या गाडीची डिकी तोडून 2.85 लाख लंपास

Kolhapur Cricket : कोल्हापुरच्या पोरी महाराष्ट्राच्या क्रिकेट संघाच करणार नेतृत्व, टी-२० च्या कर्णधारपदी अनुजा पाटील

SCROLL FOR NEXT