Salaar VS Dunki Box Office Collection:  Esakal
मनोरंजन

Salaar VS Dunki Box Office Collection: सालारानं 'डंकी'ला एका झटक्यात उडवलं! दोन्ही चित्रपटांनी किती कोटींची केली कमाई?

डंकी' आणि 'सालार'ने किती कोटींची कमाई केली?

Vaishali Patil

Salaar VS Dunki Box Office Collection: गेल्या काही दिवासांपासून सोशल मिडियावर फक्त प्रभास स्टारर सालार चित्रपटाची चर्चा आहे. प्रभासचे चाहते या चित्रपटाची आतुरतेने प्रतिक्षा करत होते. 'साहो', 'राधे श्याम' आणि 'आदिपुरुष' फ्लॉप झाल्यानंतर प्रभासच्या सालारकडून चाहत्यांना खुपच अपेक्षा होत्या. आता सालारचं कलेक्शन पाहता या चित्रपटानं चाहत्यांच्या अपेक्षा पुर्ण केल्याचे चित्र दिसत आहे.

केवळ टॉलिवूड अन् बॉलिवूडचं नाय तर जगभरात 'सालार' चित्रपटाची जबरदस्त क्रेझ आहे. 'सालार'ने रिलीज होताच बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. सालारने पहिल्या दिवशी भारतीय बॉक्स ऑफिसवर 95 कोटींची कमाई केली तर दुसऱ्या दिवशी 55 कोटी रुपयांची कमाई केली आहे.

Sacknilk च्या सुरुवातीच्या ट्रेंड रिपोर्टनुसार, 'सालार' ने रिलीजच्या तिसर्‍या दिवशी म्हणजे रविवारी 61.00 कोटी रुपये कमाई केली आहे. या आकडेवारीसोबतच 'सालार'चे तीन दिवसांचे एकूण कलेक्शन 208.05 कोटी रुपये आहे. तर जगभरात या कमाईचा आकडा 400 कोटीच्या पार गेला आहे.

तर दुसरीकडे शाहरुख खानच्या डंकीने देखील चित्रपटगृहात एंट्री केली. मात्र डंकी शाहरुखच्या आधीच्या रिलिज जवान आणि पठाणचा रेकॉर्ड मोडू शकला नाही. कारण यावेळी डंकीची स्पर्धा होती ती प्रभास स्टारर 'सालार'सोबत. तर आता 'डंकी'ने रिलीजच्या चौथ्या दिवशी म्हणजे रविवारी किती कोटींचे कलेक्शन केले यावरही नजर टाकूया...

'डंकी'च्या कलेक्शनबद्दल बोलायचे झाले तर, रिलीजच्या पहिल्या दिवशी चित्रपटाने 29.2 कोटी, दुसऱ्या दिवशी 20.12 कोटी आणि तिसऱ्या दिवशी 25.61 कोटी रुपयांची कमाई केली होती.

तर रिलिजच्या चौथ्या दिवशी म्हणजेच रविवारी Sacknilk च्या सुरुवातीच्या ट्रेंड रिपोर्टनुसार, 'डंकी' ने 31.50 कोटी रुपयांची कमाई केली. यासह चित्रपटाची एकूण कमाई आता 106.43 कोटी झाली आहे. त्यामुळे आता बॉक्स ऑफिसवरील कमाईत सालारनं डंकीला खुपच मागे टाकले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Cup 2025: भारताविरुद्ध पाकिस्तानने टॉस जिंकला, प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल; हस्तांदोलन झालं की नाही?

पूरग्रस्तांसाठी ५ रुपये मागितले तर..., शेतकऱ्यांकडून वसुलीच्या टीकेवर मुख्यमंत्री फडणवीस कडाडले; कारखान्यांना इशारा

Latest Marathi News Live Update: छत्रपती संभाजीनगर ते जळगाव महामार्गावर अर्धा तास रस्ता रोको आंदोलन

Raju Shetty: राज्य सरकार दलाली करतंय का: राजू शेट्टी

महावितरणचा दरवाढीचा शॉक! वीज होणार महाग, प्रति युनिट 'इतके' पैसे द्यावे लागणार जास्त

SCROLL FOR NEXT