'Salar' is coming to compete with 'Dunky'! Prabhas made a big announcement in diwali 2023  SAKAL
मनोरंजन

Salaar: 'डंकी'ला टक्कर द्यायला येतोय 'सलार'! नवीन पोस्टर लॉंच करत प्रभासने केली मोठी घोषणा

शाहरुख खानला टक्कर द्यायला प्रभास सज्ज! दिवाळीत केली ही मोठी घोषणा

Devendra Jadhav

Salaar New Poster Launch and Big Announcemet: बाहूबली स्टार प्रभास काही महिन्यांपुर्वी आदिपुरुष सिनेमाच्या माध्यमातुन प्रभु श्रीरामाच्या भुमिकेतुन भेटीला आला. आदिपुरुष बॉक्स ऑफीसवर दणकुन आपटला.

आता प्रभासचं करिअर रुळावर आणण्यासाठी सध्या त्याचे सर्व चाहते त्याच्या आगामी सिनेमाची वाट पाहत आहेत तो म्हणजे सलार. प्रभासने आज दिवाळीनिमित्त सलारविषयी मोठी घोषणा केलीय.

प्रभासचा सलारचा टीझर यादिवशी येणार भेटीला

प्रभासने काही वेळापुर्वीच सोशल मीडियावर त्याच्या सलार संबंधी मोठी अपडेट शेअर केली. सलार पुढच्या महिन्यात डिसेंबर महिन्यात भेटीला येतोय. सलार रिलीज व्हायला अवघे दोन महिने बाकी असताना सिनेमाचा टीझर, ट्रेलर काहीच समोर आला नाही म्हणुन प्रभासचे फॅन्स सोशल मिडियावर चर्चा करत होते.

अखेर आज दिवाळीनिमित्त प्रभासने चाहत्यांना गिफ्ट दिलंय. १ डिसेंबरला ७ वाजून १९ मिनिटांनी सलारचा ट्रेलर भेटीला येणार आहे. त्यामुळे प्रभासचे चाहते एकदम खुश झाले आहेत.

सलार पार्ट १ मधील ते सीन्स देखील हॉलीवूडच्या चित्रपटांशी बरोबरी करणारे आहेत असे म्हटले जात आहे. KGF फेम प्रशांत नील यांनी सलारचे दिग्दर्शन केले असून त्यांनी हा चित्रपट इंटरनॅशनल लेव्हल स्टाईलमध्ये करण्याचा पुरेपूर प्रयत्न केला आहे. त्यामुळे त्याची चर्चा अधिक आहे.

सलारच्या टीमनं यासाठी पुरेपूर प्रयत्न केला आहे. मेकर्सनं प्रेक्षकांना हा चित्रपट कसा भावेल याकडे लक्ष दिले आहे. याविषयी प्रॉडक्शनमधील एकानं दिलेल्या माहितीनुसार, सलारमधील एक सीन शूट करण्यासाठी ७५० हून अधिक वाहनांचा वापर केला गेला आहे.

प्रभासचा सलार पार्ट १ सीजफायर हा येत्या २२ डिसेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. त्यात प्रभास बरोबरच सुकुमारन, श्रृती हासन, जगपती बाबू यांच्या प्रमुख भूमिका असणार आहेत. हा चित्रपट प्रभासच्या करिअरमधील महत्वाचा चित्रपट ठरणार आहे असे अनेक समीक्षकांचे म्हणणे आहे. याशिवाय हा सिनेमा शाहरुख खानच्या डंकीशी स्पर्धा करणार हे उघड आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Commercial LPG Price Hike : निवडणुका संपताच सामान्यांना झटका! एलपीजी सिलिंडरच्या दरात तब्बल १ हजारांची वाढ, काय आहे तुमच्या शहरातील ताजा दर?

Tasty Millet Breakfast Idea: रव्याचा उपमा खाऊन कंटाळा आला असेल तर आता ट्राय करा हेल्दी आणि टेस्टी ज्वार उपमा; सोपी आहे रेसिपी

Pune: क्लोरीन गळतीमुळे २२ जण अस्वस्थ; बिबवेवाडीतील घटना; अग्निशामक दलाच्या सतर्कतेने मोठा अनर्थ टळला

महाराष्ट्रात सोलापूर नंबर १! साखर, केळी, डाळिंब, द्राक्ष अन्‌ टेक्सटाइल उद्योगाचा जागतिक दबदबा; दुष्काळी जिल्ह्याची शेतीतून समृद्धीकडे झेप, वाचा...

मोठी बातमी! गृहनिर्माण सोसायटीतील मोकळ्या जागेवर सभासदांचाच हक्क; उच्च न्यायालयाचा बिल्डरला दणका; सभासदांना ‘या’ कार्यालयाकडे करावा लागेल अर्ज, वाचा...

SCROLL FOR NEXT