saleel kulkarni share special photo of national awards with mother SAKAL
मनोरंजन

Saleel Kulkarni: "बालवाडीत शाळेतला रुमाल ते आज..!", राष्ट्रीय पुरस्कार स्वीकारताना सलील कुलकर्णींनी शेअर केला खास क्षण

सलील कुलकर्णींनी राष्ट्रीय पुरस्कार स्वीकारताना आईचा खास फोटो शेअर केलाय

Devendra Jadhav

Saleel Kulkarni Share Mother News: सलील कुलकर्णी हे मराठी मनोरंजन विश्वातील सुप्रसिद्ध गायक - संगीतकार. सलील कुलकर्णींनी आजवर अनेक गाणी गाऊन आणि गाण्यांना चाली देऊन जाणकार रसिक प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केलं.

सलील कुलकर्णींना काहीच दिवसांपुर्वी राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. यावेळी सलील कुलकर्णींनी त्यांच्या आईचा खास क्षण शेअर केलाय.

(saleel kulkarni share special photo of national awards with mother)

आईने सलील कुलकर्णीसाठी केली ही खास गोष्ट

सलील कुलकर्णींनी सोशल मीडियावर एक फोटो शेअर केलाय. यात त्यांची आई त्यांच्या कोटाला राष्ट्रीय पुरस्काराचा बॅच लावताना दिसतेय.

हा फोटो शेअर करुन सलील कुलकर्णी लिहीतात, "बालवाडीत शाळेत जाताना तिने माझ्या शर्टाला pin up केलेला रूमाल ते ... राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्याला लावलेला हा विशेष batch …
सगळं अगदी तसंच आहे ... तिच्या डोळंयातलं कौतुक आणि माझं तिला “ आई ..हे करून दे ना “ हे सांगणं"

सलील कुलकर्णींच्या या फोटोवर त्यांच्या चाहत्यांनी कमेंट केल्या आहेत. (Latest Marathi News)

सलील कुलकर्णींच्या सिनेमाला राष्ट्रीय पुरस्कार

सलील कुलकर्णी यांना ६९ व्या राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात सन्मानित करण्यात आले. राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात सर्वोत्कृष्ट मराठी सिनेमा या वर्गवारीत सलील कुलकर्णी दिग्दर्शित एकदा काय झालं सिनेमाला पुरस्कार मिळाला.

या सिनेमात सुमीत राघवन, उर्मिला कोठारे, पुष्कर श्रोत्री, मोहन आगाशे, सुहास जोशी या मराठी कलाकारांनी अभिनय केलाय. या सिनेमासाठी डॉ. सलील कुलकर्णींना राष्ट्रीय पुरस्कार मिळाला

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Live News : पंतप्रधान मोदींनी चेन्नईमध्ये विकासकामांची पायाभरणी केली

Solapur Temperature: ‘चित्रा’च्या पहिल्याच दिवशी पारा ३८ अंशांवर, नक्षत्र बदलले मात्र परिस्थिती बदलेना; रब्बीच्या पेरण्या खोळंबल्या, ६१ वर्षांचा विक्रम मोडणार?

Yuvraj Singh on Dhoni: ‘तो माझा जवळचा मित्र नव्हता…’ युवराज सिंगने सांगितली माहीसोबतच्या नात्याची Inside Story;माहीने करिअरच्या शेवटी...

सुरुची अडारकर-पियुष रानडे यांच्या घरी लक्ष्मीचं आगमन! सोशल मीडियावर पोस्ट करत म्हणाले, 'आमच्या टीममध्ये आता नवा मेंबर’

Someshwar Sugar Factory Election: सोमेश्वर कारखाना निवडणूक: पहिल्या दोन तासांत साडेबारा टक्के मतदान, सुनेत्रा पवारांचा विश्वास

SCROLL FOR NEXT