Salman Khan, Salim Khan Esakal
मनोरंजन

Salman Khan Birthday: पडद्यावर सलमानचा सज्जनपणा पाहून वडीलांनी काढलेली इज्जत..म्हणालेले,'तू एकदम..'

2003 साली 'बागबान' मधली सलमानची भूमिका वडीलांना मुळीच आवडली नव्हती

सकाळ डिजिटल टीम

Salman Khan Birthday: आज भाईजान सलमान खानचा वाढदिवस. सुपरस्टार सलमान खानच्या कौटुंबिक सिनेमांमध्ये त्याचं नाव नेहमीच प्रेम हे असतं. आतापर्यंत अशा कितीतरी सिनेमात सलमान या नावावं बिग स्क्रीनवर दिसला आहे. मग भले तो 'मैने प्यार किया' सिनेमा असो की 'हम आपके है कौन'.

सलमानची ही प्रेम व्यक्तिरेखा नेहमीच दुसऱ्यांचा आदर करणारी आणि दयाळू व्यक्तिची राहिली आहे. एवढंच नाही तर अमिताभ बच्चन आणि हेमा मालिनी यांच्या 'बागबान' सिनेमातही तो प्रेम बनून समोर आला होता. बघूया याच सिनेमातला एक किस्सा सलमानच्या वाढदिवसानिमित्ताने... (Salim Khan did not like salman khans work in baghbaan he said..)

'बागबान' एक असा सिनेमा आहे ज्याला ९० च्या दशकात जवळपास सगळ्या प्रेक्षकांनी पाहिला आहे. या सिनेमात सलमाननं कॅमियो साकारला होता. त्यानं अमिताभ आणि हेमा मालिनी यांच्या दत्तक घेतलेल्या मुलाची भूमिका साकारली होती. या सिनेमात त्याचं नाव प्रेम होतं.

एकीकडे जिथे सर्वांना सलमानची ही भूमिका पसंतीस उतरली होती तिथे दुसरीकडे त्याचे स्वतःचे वडील सलीम खान यांना मात्र त्याची ही भूमिका मुळीच आवडली नव्हती.

सलमानला हे प्रेम नाव दिलं ते सूरज बडजात्यानं. सलमान त्यांच्या प्रत्येक सिनेमात प्रेम बनून दिसला होता. जेव्हा रवी चोप्रा यांच्या २००३ साली रिलीज झालेल्या 'बागबान' सिनेमात सलमाननं तोच साधेपणा..सज्जनपणा भूमिकेत आणायचा प्रयत्न केला तेव्हा सलीम खान यांचे म्हणणे होते की तो एका सज्जन माणसासारखा दिसण्याऐवजी एका अंध व्यक्ती प्रमाणे दिसत आहे.

सलमाननं एका मुलाखतीत याविषयी सांगताना म्हटलं होतं की,''मला 'बागबान'च्या वेळेस एक अडचण आली होती,जिथे माझ्या वडीलांनी सिनेमा पाहून विचारलं की,'तु आंधळा का दिसतोय?'..मला काही कळलं नाही अन् मी विचारलं,'आंधळा?'

सलीम खान यांचे म्हणणे होते की सलमान पडद्यावर जो चांगुलपणा आणि माणुसकी हे सगळं दाखवायचा प्रयत्न करत आहे,खरतंर तो आपल्या आयुष्यात असा मुळीच नाहीय. भले लोकांना त्याची व्यक्तिरेखा पसंत पडली होती पण मनातून त्याला माहित होतं त्यानं जे केलंय त्यात तो मुळीच यशस्वी झालेला नाही. वडीलांची कमेंट त्याला त्याची सतत जाणीव करून देत होती.

सलमानचे वडील सलीम खान यांच्या म्हणण्यानुसार,सलमान 'बागबान' सिनेमात एका चांगल्या व्यक्तीप्रमाणे दिसत नाही उलट खोटा वाटतोय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT