On Eid 2020 Salman Khan will give surprise to fan 
मनोरंजन

सलमान-आलियाच्या 'इन्शा अल्लाह'चा प्रदर्शन मुहूर्त हुकला

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : सलमान खानच्या आगामी चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहत असतात. दरवर्षी ईदेच्या निमित्ताने भाईजानचा चित्रपट हा चाहत्यांच्या भेटीला येतो. अशीच एक खास भेट घेऊन सलमानचा 'इन्शा अल्लाह' हा चित्रपट 2020 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. मात्र प्रेक्षकांना या चित्रपटासाठी अधिक वाट पहावी लागणार आहे. या सिनेमात सलमान सोबत आलिया भट दिसणार आहे

आलिया आणि सलमानची जोडी पहिल्यांदाच एकत्र दिसणार आहे. 
या जोडीला प्रथमच पडद्यावर पाहण्यासाठी प्रेक्षक नक्कीच उत्सुक असतील. पण, 'इन्शा अल्लाह' सिनेमाची रिलीज होण्याची तारीख ठरलेल्या तारखेच्या पुढे ढकलण्यात आली आहे. मात्र चाहत्यांनी निराश होण्याची गरज नाही. कारण,ट्विटरच्या माध्यमातून या विषयीची माहिती देताना सलमानने सांगितलं की, " संजय लीला भन्साळीसोबतच्या चित्रपटाची तारीख पुढे करण्यात येत आहे. तरी, 2020 च्या ईदला भेटूच, इंशा अल्लाह. "

आता मात्र तुम्ही विचार करत असाल की, 'इंशा अल्लाह'च्या रीलीजची तारीख पुढे गेली आहे तर, मग भाईजान नक्की कोणता चित्रपट घेऊन येत आहे. याविषयीची कोणतीही बातमी अद्याप समोर आलेली नाही. नवीन चित्रपटाविषयीची माहिती अधिकृतपणे सांगण्यात आलेली नाही. एकुणच काय तर, ईदला सलमान प्रेक्षकांना सरप्राईज देणार आहे. 

2020 च्या डिसेंबरमध्ये भाईजानचा 'दबंग-3' प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सलमान सध्या याच चित्रपटाचं शुटींग करत आहे. इन्शा अल्लाहसाठी रोहित शेट्टीने त्याचा आगामी सिनेमा 'सूर्यवंशी' सिनेमाची तारीख बदलली होती. मात्र ईदेला येणारा 'इंन्शा अल्लाह'  रिलीज होणार नाही तर, नक्की कोणता नवा चित्रपट सलमान घेऊन येणार आहे याची चर्चा सर्वत्र आहे. काही सुत्रांच्या माहितीनुसार दबंग-3 च्या शुंटिंगनंतर सलमान 'इंशा अल्लाह'ची शुटींग चालू करणार आहे.  त्यामुळे 'इन्शा' अल्लाहची रिलीज डेट पुढे गेली असली तरी, ईदला सलमानचा कोणता चित्रपट भेटीला येणार याची उत्सुकता सर्वांनाच आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Traffic Challan Recovery: थकबाकी असलेला ट्रॅफिक दंड आता वीज बिलातून वसूल होणार? सर्वोच्च न्यायालयाची सरकारांना महत्त्वाची सूचना

Dharashiv Kirtankar Fight : 'माझी सुपारी का घेतली?'; धाराशिवमध्ये दोन महाराज आपापसात भिडले, थेट हाणामारीनंतर बाल वारकऱ्यांना घेऊन महामार्गावर केलं आंदोलन

IMD Weather Alert : हवामान खात्याचा मोठा इशारा! 28 राज्यांत जोरदार पावसाची शक्यता; ताशी 60 ते 70 किमी वेगाने वाहणार वारे, महाराष्ट्रात स्थिती काय?

Latest Marathi News Live Update: पुणे जिल्हा दूध संघाकडून शेतकऱ्यांना १ रुपयाचा दूधदर फरक

Pune Traffic: अंगारकी संकष्टीत दगडूशेठ गणपती दर्शनासाठी गर्दी; पुणे मध्यवर्ती भागातील वाहतुकीत तात्पुरते बदल

SCROLL FOR NEXT