Salman Khan News: esakal
मनोरंजन

Salman Khan: 'प्रेम' पुन्हा येतोय, आठ वर्षानंतर 'भाईजान'ची सूरज बडजात्यांसोबत हातमिळवणी?

सलमान आणि सूरज बडजात्या यांच्या आगामी प्रोजेक्टची चर्चा रंगली आहे.

युगंधर ताजणे

Salman Khan News: बॉलीवूडचा भाईजान सलमान खान हा पुन्हा एकदा लाईमलाईटमध्ये (Salman Khan New Movie) आल्याचे दिसून आले आहे. ज्यांनी सलमानचा मैंने प्यार किया, हम साथ साथ है, प्रेम रतन धन पायो सारखे चित्रपट पाहिले आहेत त्यांना सूरज बडजात्या कोण हे वेगळं सांगावं लागणार नाही. सलमानचं त्यातील प्रेम नावाचं कॅरेक्टर चाहत्यांच्या मनात घर करुन गेलं होतं.

आता सलमान पुन्हा एकदा सूरज बडजात्या यांच्या आगामी प्रोजेक्टमध्ये (Salman Khan Latest News) दिसणार असल्याच्या चर्चेंना उधाण आल्याचे दिसून आले आहे. सलमाननं त्याच्या आतापर्यंतच्या बॉलीवूड प्रवासात अनेक कलाकारांसोबत काम केलं आहे. मात्र त्याच्या बडजात्या यांच्यासोबतची केमिस्ट्री काही वेगळीच होती. त्यांच्या चित्रपटातील भूमिका चाहत्यांना कमालीच्या आवडल्या होत्या.

सलमान आणि सूरज बडजात्या यांच्या जोडीला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद ( Salman Khan Again Work With Sooraj Barjatya) मिळाला. त्या जोडीनं प्रेक्षकांना जिंकून घेतले होते. सलमानची जी पहिली फिल्म होती मैंने प्यार किया त्याची निमिर्ती आणि दिग्दर्शन सूरज बडजात्या (Salman Khan & Sooraj Barjatya) यांनी केली होती. त्या चित्रपटानं सलमानच्या रुपानं बॉलीवूडला मोठा स्टार मिळाला होता. आता हे दोघे आठ वर्षानंतर पुन्हा एकत्र दिसणार आहे.

बॉलीवूमधील सर्वाधिक यशस्वी जोडी म्हणून नेहमीच सलमान खान आणि सूरज बडजात्या यांच्याकडे पाहिले गेले आहे. त्यांच्या कमबॅकनंतर आता चाहत्यांना त्यांच्या आगामी प्रोजेक्टचे वेध लागले आहेत. त्या दोघांची ही एकत्रित ही पाचवी फिल्म असणार आहे. त्यांचा शेवटचा चित्रपट प्रेम रतन धन पायो हा होता. जो २०१५ मध्ये प्रदर्शित झाला होता.

प्रेम की शादी असे त्या प्रोजेक्टचे नाव असून अद्याप त्याबाबत अधिकृतपणे कोणतीही माहिती समोर आलेली नाही. मात्र त्यात सलमान दिसणार असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. हा चित्रपट फ्लोअरवर येण्यापूर्वीच त्यावरुन काही वेगळ्या गोष्टी घडल्याचीही चर्चा आहे. त्यात सलमानची एंट्री होणार हीच त्याच्या चाहत्यांसाठी समाधानाची आणि आनंदाची गोष्ट असल्याचे सांगण्यात येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thalapathy Vijay Support AIADMK : तामिळनाडूत महाराष्ट्रासारखी फूट! आण्णा द्रमुकचे दोन भाग; थलपती विजयला थेट पाठिंबा

Pune Grand Tour: ‘पुणे ग्रँड टूर’चे रस्तेही खराब; १६५ कोटींचे काम खोदाईमुळे वाया, नियमांचे उल्लंघन, काम पूर्ण होऊनही दुरुस्ती नाही!

'नॉर्मल डिलिव्हरीसाठी प्रयत्न केले, पण…' ‘कमळी’ फेम अभिनेत्रीने सांगितला बाळंतपणाचा अनुभव, म्हणाली... 'त्या क्षणी खूप रडले…'

PM मोदींनी केलेल्या अचानक घोषणे बद्दल काय आहे शरद पवारांचे मत? केली मोठी भविष्यवाणी

Raj Thackeray criticism narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आवाहनावर राज ठाकरे भडकले 'भुर्दंड जनतेला का ?'

SCROLL FOR NEXT