Salman-Aishwarya video Esakal
मनोरंजन

Salman-Aishwarya video: काय सांगता..! तब्बल २० वर्षांनी सलमानने ऐश्वर्यासोबत दिली एकत्र पोझ? व्हिडिओ व्हायरल...

आराध्याचा सलमान खान आणि ऐश्वर्या राय बच्चनसोबतचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये पापाराझी सलमान आणि ऐश्वर्याला पोज देण्यास सांगत आहेत.

Vaishali Patil

प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या पत्नी नीता अंबानी यांनी सुरु केलेल्या कल्चरल सेंटरची अजूनही मनोरंजन विश्वात चर्चा सुरु आहे.

कल्चरल सेंटरच्या उद्घाटनाला केवळ देशातीलच नव्हे तर जगभरातील कलाकारांची जत्रा भरली होती. यावेळी रणवीर सिंग, दीपिका पदुकोण, आलिया भट्ट, सलमान खान, शाहरुख खान असे अनेक बॉलिवूड स्टार्स दिसले.

हा सोहळा खुपच गाजला. मग त्यात प्रियंका आणि रणबीर सोबतच शाहरुखचा डान्स असो किंवा वरुण धवनचा गीगीसोबतच चा व्हायरल डान्सवरुन वाद. मात्र याच कार्यक्रमात आणखी एका गोष्टीची बरिच चर्चा रंगली.

ती म्हणजे बॉलिवूडचा भाईजान आणि ऐश्वर्या राय बच्चन यांची. त्यादोघांचे बरेच व्हिडिओ आणि फोटोही व्हायरल झाले.

आता याच प्रसंगाचा एक व्हिडिओ सध्या खूप चर्चेत आहे, जो पाहून सलमान आणि ऐश्वर्याचे चाहते आश्चर्यचकित झाले आहेत.

ज्यांना सलमान खान आणि ऐश्वर्या राय यांची जोडी पुन्हा एकत्र पाहण्याची इच्छा होती असे चाहते तर खुपच आंनदी झाले आहेत.

वास्तविक या व्हिडीओमध्ये ऐश्वर्या राय बच्चन आणि सलमान खान एकत्र पोज देत आहेत आणि आराध्या बच्चन सुद्धा दिसत आहे.

20 वर्षांनंतर एकत्र दिसलेल्या दोघांच्या या व्हिडिओ सध्या तुफान व्हायरल झाला असून चाह्त्यांना या व्हिडिओ मागचं सत्य जाणुन घेण्याची उत्सुकता आहे.

सलमान आणि ऐश्वर्याच्या या व्हिडिओमध्ये बॅकग्राउंडमध्ये 'मैने प्यार किया' चित्रपटाचे गाणे वाजत असून तिघेही कॅमेऱ्यासमोर हावभाव देवुन पोज देताना दिसत आहेत. समोरचा कॅमेरामनही त्याला पोज देण्यास सांगत आहे.

मात्र सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये काहीही तथ्य नाही. हा व्हिडीओ एक प्रँक व्हिडिओ आहे, ज्याने दोघांचे वेगवेगळे व्हिडीओ एडिट करून एकत्र केले आहेत आणि ते अगदी खरे दिसत आहेत. आश्चर्य व्यक्त करताना, अनेकांनी म्हटले आहे की हा व्हिडिओ अगदी खराचं दिसतोय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'वारीत कोणी विशेष अजेंडा चालवण्यासाठी येत असतील, तर ते आम्ही खपवून घेणार नाही'; CM फडणवीसांचा कोणाला इशारा?

Ashadhi Ekadashi : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विठ्ठलाची शासकीय महापूजा संपन्न; पंढरपुरात 20 लाखाहून अधिक भाविक दाखल

Ashadhi Ekadashi : विठ्ठलाच्या पूजेचा मान मिळालेले उगले दाम्पत्य कोण आहे? मुख्यमंत्र्यांसोबत मिळाला शासकीय महापूजेचा मान

Ashadhi Ekadashi : 'ज्ञानोबा माऊली'च्या गजरात CM देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर; पारंपरिक वेशात घेतला सहभाग

Ashadhi Ekadashi 2025 Live Updates : 'महाराष्ट्र चालवण्याची विठुरायाने शक्ती द्यावी', मुख्यमंत्री फडणवीसांनी पांडुरंगाला घातले साकडे

SCROLL FOR NEXT