salman khan and Kamaal R Khan start twitter war
salman khan and Kamaal R Khan start twitter war 
मनोरंजन

'तु फक्त वेळ आणि जागा सांग एकटा येतो, तुझ्या चमच्यांना घाबरत नाही'

सकाळ ऑनलाईन टीम

मुंबई - बॉलीवूडमध्ये सहसा कोणी भाईजान सलमान खानशी पंगा घेत नाही. तो घेतलाच तर त्याचे भविष्यात काय तोटे होतील याची त्या आरोप करणा-याला माहिती असते. मात्र त्याला काही अपवाद आहेत. भोजपूरी अभिनेता कमाल आर खान न घाबरता सलमानवर टीका करताना दिसत आहे. या दोघांमधील वाद आता सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. यात कमालने थेट भाईजानला मैदानात उतरण्याचे आव्हान दिले आहे. दरवेळी धमक्या देऊन घाबरवणा-या सलमानने आता वेळ आणि जागा सांगावी आपण यायला तयार आहोत. या शब्दांत केआरकेने त्याला दम दिला आहे.

केआरके त्याच्या अभिनयामुळे नव्हे तर त्याने केलेल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे जास्त चर्चेत असतो. यामागेही त्याने केलेल्या विधानांमुळे तो अडचणीत आला होता. तरीही त्याच्याकडून बॉलीवूडमधल्या काही कलाकारांना डिवचणे सुरुच असते. आता तर त्याने बॉलीवूडचा दबंग अभिनेता सलमानलाच लक्ष्य केले आहे.  यापूर्वी त्याने ‘लक्ष्मी बॉम्ब’ चित्रपटाच्या निमित्ताने अक्षय कुमारवर निशाणा साधला होता. “देवी लक्ष्मी धन आणि सौभाग्यचं प्रतिक आहे. अक्षय कुमारने देवी लक्ष्मीचा अपमान केला आहे. त्यामुळे त्याला धडा शिकवण्यासाठी प्रेक्षकांनी ‘लक्ष्मी बॉम्ब’ चित्रपटावर बहिष्कार टाकावा. म्हणावं हा कॅनडा नाही भारत देश आहे. इथे देवी-देवतांची पुजा केली जाते. त्यांची चेष्ठा करत नाही.” अशा आशयाचं ट्विट करुन त्याने ‘लक्ष्मी बॉम्ब’ चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी केली होती.

सलमानला दिलेल्या आव्हानात तो म्हणतो,  “भाईजान सलमान खान राहुल, डॉली, पंजाबी यांसारख्या तुझ्या चमच्यांना माझ्या मागे लावून तुला नेमकं काय साध्य करायचं आहे? यात तू तुझा वेळ वाया घालवतोयस. हिंमत असेल तर वेळ आणि जागा सांग मी एकटा येतो तिथे. काय करायचं ते कर मी तुला घाबरत नाही. मी फक्त सत्य बोलतो आणि मी बोलतच राहीन. तू माझा खरा आवाज शांत करू शकत नाहीस” अशा आशयाचं ट्विट करुन केआरकेने सलमानला आव्हान दिलं आहे. त्याचं हे ट्विट सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. त्याला दोघांच्या चाहत्यांकडून कमेंट मिळत आहेत. विशेष म्हणजे त्यांच्या या सोशल मीडिया वॉरमध्ये चाहत्यांची करमणूक होत आहे. 

अभिनेता कमाल आर. खान  वादग्रस्त वक्तव्यांमुळे सर्वांना परिचित आहे. तो नेहमीच विविध क्षेत्रातील सेलिब्रिटींवर टीका करतो. यावेळी त्याने बॉलिवूडचा भाईजान सलमान खानवर निशाणा साधला आहे.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Modi: 'प्रज्वल रेवण्णांचे व्हिडिओ आताचे नाहीत'; पंतप्रधान मोदींनी पहिल्यांदाच केलं थेट भाष्य

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात.. शरद पवार, अमित शाहांनी बजावला मतदानाचा हक्क

Share Market Today: शेअर बाजारात आजही घसरण होणार का? काय आहे तज्ज्ञांचा अंदाज

Sabudana Paratha Recipe : नाश्त्याला झटपट बनवा चविष्ट साबुदाणा पराठा, पोषणासोबतच मिळेल भरपूर ऊर्जा, वाचा सोपी रेसिपी

Election Ink: इतिहास निवडणूक शाईचा; जाणून घ्या कुठे अन् कशी तयार होते मतदारांच्या बोटाला लागणारी शाई

SCROLL FOR NEXT