salman khan's Eid 2020 Release To Be Titled ‘Radhe’? 
मनोरंजन

पुढच्या ईदला सलमान दिसणार 'या' चित्रपटात!

वृत्तसंस्था

मुंबई : बॉलिवूडचा 'भाईजान' म्हणजे सलमान खान सध्या 'दंबंग 3' च्या शुटिंगमध्ये व्यस्त आहे. नुकताच त्याने संजय लीला भन्साळी यांचा 'इन्शा अल्लाह' करण्यास नकार दिला आहे. त्यामुळे ईदेला भाईजान कोणता चित्रपट घेऊन येणार याकडे सर्वांच लक्ष लागून होतं. आता मात्र त्याचाही खुलासा झाला आहे. पुढील वर्षी ईदच्या निमित्तानेही तो एक हिंदी चित्रपट घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. 'राधे' असं या चित्रपटाचं नाव असल्याचेही सध्या बोलले जात आहे. सुप्रसिद्ध कोरियोग्राफर प्रभु देवाही या चित्रपटाचा महत्त्वपूर्ण भाग असणार आहे. हा एक अॅक्शन- थ्रिलर चित्रपट असणार आहे. 

दबंगच शुटिंग पूर्ण झाल्यावर सलमान  'राधे' चं शुटिंग चालू करणार आहे. अतुल अग्निहोत्री याचे निर्माते आहेत. एकुणच काय सलमानच्या चाहत्यांना पुढच्या वर्षी भाईजानच्या दोन चित्रपटांची मेजवानी मिळणार आहे. याच महिन्यामध्ये सलमान 'बिग बॉस ' च्या 13 व्या सिझनमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 

याशिवाय एका कोरियन चित्रपटाच्या हिंदी रिमेकमध्ये सलमान एका पोलिस ऑफिसरची भूमिका साकारणार आहे. मात्र या चित्रपटाच्या नावाविषयी कोणतीही माहिती अद्याप समोर आलेली नाही.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

साहिल मोबाईल वापरून करत होता कॉपी, परीक्षेवेळचा CCTV VIDEO आला समोर

Mohol News : मोहोळ तालुक्यातील मंदिरातील वाढत्या चोऱ्या संदर्भात पोलीस सतर्क; व्यवस्थापक पुजारी व ट्रस्टी यांच्या तातडीच्या बैठकीचे आयोजन, अकरा सूचनांचे पालन करण्याची सूचना

Mangalwedha News : मनरेगा योजनेतील रोजगार सेवकासाठी नव्याने काढलेल्या शासन निर्णयावरून राज्यभरात संताप

IIT Bombay Student Death : आयआयटी बॉम्बे बाहेर 'जस्टिस फॉर साहिल' आंदोलन; प्रकाश आंबेडकरांचे पुत्र सुजात यांच्या नेतृत्वाखाली जोरदार निदर्शने, प्रशासनाला दिला कडक इशारा

IAS मेधा रूपम यांना दिलासा, हायकोर्टाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाकडून स्थगिती

SCROLL FOR NEXT