salman khan angry on paparazzi on his brother sohail khan birthday party video viral SAKAL
मनोरंजन

Salman Khan: "दूर व्हा सगळे!" भावाच्या वाढदिवसाला सलमान रागाने लालबुंद, काय झालं नेमकं? व्हिडीओ व्हायरल

सलमान खान पापाराझींवर चांगलाच भडकला. असं काय झालं? जाणून घ्या

Devendra Jadhav

Salman Khan Angry Video News:

आज सलमान खानचा भाऊ सोहेल खानचा वाढदिवस. सोहेल खान भाईजानप्रमाणे सिनेमात चमक दाखवू शकला नसला तरीही तो सेलिब्रिटी क्रिकेट आणि इतर माध्यमात चांगला सक्रीय असतो. आज सोहेल खानच्या वाढदिवसाला असं काय घडलं की सलमान खान पापाराझींवर भडकला. या घटनेचा व्हिडीओ सुद्धा व्हायरल झालाय. जाणून घ्या.

सलमान खान पापाराझींवर भडकला

झालं असं की, सोहेल खानच्या बर्थडे पार्टीनंतर सलमान खान त्याच्या आई-वडिलांसोबत निघताना दिसला. अनेक फोटोग्राफर फोटो घेण्यासाठी त्याच्या कारजवळ आले. आणि एकच गोंधळ उडाला

यावर सलमान चांगलाच संतापला. सलमानने कारमध्ये बसण्यापूर्वी पापाराझींना मागे हटण्यास सांगितले. यानंतर अभिनेता रागाने पापाराझीकडे पाहत त्याच्या कारमध्ये बसला. (Salman Khan lashed out at the paparazzi)

सोहेल खानची बर्थडे पार्टी

19 डिसेंबरला रात्री सोहेल खानसाठी बर्थडे पार्टी आयोजित करण्यात आली होती. यात जवळचे कुटुंबिय सहभागी होते. सलमान व्यतिरिक्त संपूर्ण खान कुटुंब देखील या सोहळ्याला उपस्थित होते.

ज्यात सलीम खान, हेलन, सलमा खान, अर्पिता खान, आयुष शर्मा, अलविरा खान, अतुल अग्निहोत्री आणि त्यांची मुलगी अलिझेह अग्निहोत्री आणि जवळचे मित्र उपस्थित होते. (Sohail Khan's birthday party)

सलमान खानचं वर्कफ्रंट

सलमान खानच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर या वर्षी भाईजान किसी का भाई किसी की जान सिनेमात झळकला. हा सिनेमा फ्लॉप ठरला. तर जानेवारीत रिलीज झालेल्या पठाण सिनेमात सलमान खानने शाहरुखसोबत कॅमिओ केला. त्याची खुप चर्चा झाली. तर याचवर्षी दिवाळीत रिलीज झालेल्या टायगर 3 सिनेमा मात्र सुपरहिट झाला. या सिनेमात शाहरुखने कॅमिओ केला होता. (Salman Khan's workfront)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raigad : समुद्रात बोट बुडाली! बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, थरारक व्हिडीओ व्हायरल, अनेकजण बुडाले

Maharashtra Latest News Update: हिंजवडी परिसरातील आयटी कंपनीतील 82 कोटी रुपयांच्या डेटाची चोरी

Beed : सरकारी वकिलानं कोर्टातच संपवलं आयुष्य, सत्काराच्या शालने घेतला गळफास; बीडमध्ये खळबळ

संसदेच्या पावसाळी अधिवेशनात १४ विधेयकं मांडली, १२ मंजूर; चर्चेच्या वेळेत अन् प्रश्नोत्तरात कामकाज नापास

'हा' प्रसिद्ध राजकीय नेता अभिनेत्रीला करायचा अश्लिल मॅसेज, म्हणायचा..'हॉटेलवर चल' अभिनेत्रीने केला धक्कादायक अनुभव शेअर

SCROLL FOR NEXT