Salman Khan announce his sk27 gym new branch opening in inodre sakal
मनोरंजन

Salman Khan: इंदौरकरांच्या फिटनेसची सलमानला काळजी.. ट्विट करत म्हणाला..

भाईजानकडून इंदौरकरांसाठी खास भेट, केली नव्या जीमची तारीख जाहीर..

नीलेश अडसूळ

पन्नाशीतही एखाद्या विशीतल्या तरुणासारखा दिसणारा अभिनेता सलमान खान आपल्या फिटनेस बाबत खूपच काळजी घेतो. त्याची जीम करण्याची पद्धत, डायट याविषयी तो अनेकदा बोलला आहे. पण तो स्वतःची जितकी काळजी घेतो तितकीच इतरांच्या तब्येतीचीही घेतो, लोकांना एक उत्तम जीम मिळावी यासाठी त्याने स्वतःची जीम देखील सुरू केली आहे. याच जीमची नवी ब्रांच आता इंदौर मध्ये सुरू होणार आहे. नुकतेच सलमान खानने एक ट्विट करत ही आनंदाची बातमी दिली.

(Salman Khan announce his sk27 gym new branch opening in inodre)

सलमान खानचा 'sk27' हा जीम ब्रॅंड चांगलाच परिचित आहे. हा सलमानचा एक व्यवसायही म्हणता येईल. या जीमचे मुंबईसह देशभरातील अनेक मोठ्या शहरात ब्रांचेस आहेत. आता मध्य प्रदेशातील इंदूर मध्येही नवी ब्रांच सुरू करण्यात येणार आहे.

सलमानने आपल्या सोशल मीडियावर पोस्ट केली आहे त्यामध्ये सलमान लिहिले 'sk-27 जीम सोबत सुरू करा तुमचा फिटनेस प्रवास'. सलमान खान या नव्या जीमचं जबरदस्त मार्केटिंग करत आहे. १ जानेवारीला या जीमची ओपनिंग झाली असून सलमानचा नवा व्यवसाय चांगलाच वाढीला लागत आहे. सलमान खान लवकरच शाहरूख खानच्या पठाण चित्रपटात दिसणार आहे, शिवाय 'किसी का भाई किसी की जान', ' बजरंगी भाईजान-२' ,'किक-२ ' मध्ये दिसणार आहे.

सलमान खानच्या फिटनेसचे आणि बॉडीचे वेड अनेक तरुणांना आहे.सलमान खान याच्या चित्रपटात जो पर्यंत शर्ट काढून बॉडी दाखवत नाही तोपर्यंत त्यांचे चाहते खुश‌ होत नाही. सलमान खानच्या बॉडीचे मुली नाही तर मुलं देखील चाहते आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Doval: आपली मंदिरे लुटली, आपण गप्प पाहत राहिलो… आता इतिहासाचा ‘बदला’ घ्यायची वेळ; अजित डोवाल यांचा थेट इशारा

Woman Police Case : रक्षकच बनले भक्षक! महिला पोलिस कॉन्स्टेबलवर 8 वर्षे सामूहिक बलात्कार; पोलिस अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांवर गंभीर आरोप

Latest Marathi News Live Update : रस्ता सुरक्षा अंतर्गत वाहतूक नियम मोडणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई मोहीम

महाराष्ट्रात MOFA आणि RERA चे वेगळे नियम; सरकारचा बांधकाम क्षेत्राला दिलासा, नवे नियम काय?

Chhatrapati Sambhajinagar Election : महापालिकेचे चौथे इलेक्शनही पाण्यावर! महापालिकेवर वाढले कर्ज; नागरिकांवर वाढीव पाणीपट्टीचे संकट

SCROLL FOR NEXT