Salman Khan, Shamita Shetty Google
मनोरंजन

''लानत है तुमपर शमिता'' सलमान भडकला...

अभिजित बिचुकलेवरील वादावरनं 'बिग बॉस १५' च्या सेटवरचं वातावरण पेटलं

प्रणाली मोरे

'बिग बॉस १५' च्या सध्याच्या सिझनला फार प्रतिसाद मिळत नसल्यामुळे बाहेरून अनेक जण व्ही.आय.पी गेस्ट म्हणून आता शो मध्ये आणले आहेत. त्यामध्ये अभिजित बिचुकले,रश्मी देसाई,देबोलिना भट्टाचारी तसंच राखी सावंत आणि तिचा नवरा असे पाच व्ही.आय.पी गेस्ट आले आहेत. पण त्यानंतर 'पाहुणे आले आणि आग लावण्यास निमित्त ठरले' असंच आता जो-तो म्हणत आहे. कारण रोज बिग बॉसच्या घरात नवनवीन वाद होण्यासाठी कारणं मिळत आहेत. त्यात शमिता शेट्टी 'खाजवून खरूज' काढण्याच्या आपल्या स्वभावानं या वादांना आणखी सुरूंग लावण्याचं काम करताना दिसतेय. ब-याचदा शेट्टी खानदानाच्या या मुलीच्या गर्वाचा पाराच यामागचं कारण ठरताना दिसतोय. पण तिचा हा गर्वाचा पारा सलमान पुढे टिकणार कुठे म्हणा. शेवटी तिला सलमानच्या रागाचा सामना करावा लागलाच.

जेव्हा शमिता स्पर्धक म्हणून 'बिग बॉस १५' मध्ये आली तेव्हा सर्वांना वाटलं होतं की सलमान आणि शमिताची मोठी बहीण शिल्पा शेट्टी यांच्यात घट्ट मैत्री आहे. दोन्ही कुटुंबात घरच्यासारखे संबंध आहेत. तेव्हा सलमान शमिताला कधी 'छडी लागे छमछम,विद्या येई घमघम' असे धडे देणार नाही. म्हणजे अजूनपर्यंत तरी असंच काहीसं सुरू होतं. छोटा-मोठा राग सोडला तर शमिताला सलमानच्या 'दबंग' स्टाईल रागाचा सामना करावा लागला नव्हता. पण बिग बॉसच्या घरात असं काही घडलं की शेवटी शमितालाही सलमाननं आपल्या रागानं चाप घातलाच. एका स्पेशल एपिसोडमध्ये रविना टंडन आली होती. तिनं स्पर्धकांना एक प्रश्न विचारला की,'तुमच्या घरात गुन्हेगार कोण आहे? आणि या प्रश्नाचं रश्मी देसाईने 'अभिजित बिचुकले' असं नाव घेऊन उत्तर दिलं. आणि तिथूनचं पुढचा सगळा वादग्रस्त सीन घडला. पुढील व्हिडीओत हा सीन पाहू शकाल.

रश्मी देसाई म्हणाली की, ''अभिजित बिचुकलेने शमिता शेट्टीला दोनदा 'पैर की जुती' म्हणून संबोधलं. त्यांनी तिचा अशाप्रकारे अनादर केल्यामुळे मला ते गुन्हेगार वाटतात''. तर शमिताही म्हणाली की,''अभिजितने मला पैर की जुती म्हणून संबोधत खूप हीन दर्जाचा शब्द वापरला''. पण हे ऐकल्यावर मात्र अभिजित बिचुकले चिडला आणि त्याने, ''खड्ड्यात जाऊ दे शो,इथे अशी खोटी माणसं राहणार असतील तर,मी चाललो''. अभिजित बिचुकलेला शांत करण्याचा प्रयत्न करूनही तो ऐकायला तयार नव्हता. तेव्हा मग सलमाननं मध्यस्ती केली.

सलमान सगळ्यांवर जोरात ओरडला आणि त्याने सगळ्यांना शांत बसण्यास सांगितले. पण तेव्हा शमिता एकदम तुच्छ हावभाव चेह-यावर आणून म्हणाली, ''तो का आलाय या शोमध्ये''. पण हे ऐकून मात्र सलमान शमितावर भयंकर चिडला. तो म्हणाला, ''तुला नाव घेऊन बोलता येत नाही तर आवाज चढवून बोलू नकोस. तु म्हणतेस तसं हिन दर्जाचं तो तुला काहीही बोललेला नाही. लानत आहे तुझ्यावर शमिता''. आता सलमानाचा पारा पाहून शमिताच काय अख्खं बिग बॉसचं घर थंड पडलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PBKS vs RCB: वेंकटेश अय्यरची तुफानी फटकेबाजी, विराट कोहलीचंही विक्रमी अर्धशतक; बंगळुरूने पंजाबसमोर ठेवलं भलं मोठं लक्ष्य

Pune Crime : उरुळी कांचनमध्ये पतीकडून पत्नीच्या गुप्तांगावर ॲसिड हल्ला; १५ दिवस घरात कैद

Pune Crime: पुणे-सोलापूर महामार्गावर मांगूर माशांची मोठी तस्करी उघड; उरुळीकांचन पोलिसांची कारवाई, पिकअप जप्त

Dried Fish Rush: पावसाळ्यापूर्वी सुक्या मासळीची धावपळ; रायगडात भाव स्थिर, खवय्यांची खरेदीला गर्दी

१०० च्या जागी ५०० तर ४०० च्या २०००... ATM मध्ये मोठी बिघाड, पैसे काढण्यासाठी लोकांची झुंबड!

SCROLL FOR NEXT