Salman Khan revels about Tiger 3 trailer says this will be something  esakal
मनोरंजन

Tiger 3 Ind Vs Pak 2023 : भारत-पाकिस्तान मॅचच्या वेळी 'टायगर' ची डरकाळी! सलमान चाहत्यांना देणार खास गिफ्ट

बॉलीवूडचा भाईजान सलमान खान हा त्याच्या आगामी टायगर ३ मुळे चर्चेत आला आहे.

युगंधर ताजणे

Salman Khan revels about Tiger 3 trailer says this will be something : बॉलीवूडचा भाईजान सलमान खान हा त्याच्या आगामी टायगर ३ मुळे चर्चेत आला आहे. हा चित्रपट दिवाळीत प्रदर्शित होणार असल्याचे सांगण्यात आले आहे. यशराजच्यावतीनं टायगर ३ ची घोषणा करण्यात आली होती. त्यात आता एक मोठं सरप्राईज भाईजाननं दिलं आहे.

येत्या १६ ऑक्टोबर रोजी टायगर ३ चा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. त्याची प्रचंड उत्सुकता चाहत्यांना आहे. यापूर्वी प्रदर्शित झालेल्या टीझरला प्रेक्षकांनी, चाहत्यांनी डोक्यावर घेतले होते. यासगळ्यात पुन्हा एकदा टायगर ३ हा चर्चेचा विषय ठरतो आहे. भारत आणि पाकिस्ताच्या मॅचच्या दरम्यान या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यासाठी खास व्हिडिओ शुट देखील केलं जाणार आहे.

Also Read - माणसं मशीन्सशी संवाद करतील आणि ही आश्चर्याची गोष्ट नसेल..

सलमाननं म्हटले आहे की, चाहत्यांनी आतापर्यत एक था टायगर, टायगर जिंदा है सारख्या चित्रपटांना मोठा प्रतिसाद दिला होता. आता वेळ आहे ती टायगर ३ ची. हा चित्रपट चाहत्यांसाठी खास सरप्राईजचा विषय ठरणार आहे. यापूर्वी टायगर ३ च्या टीमनं अॅक्शन सीन्सही शेयर केले होते. त्यावरुन हा चित्रपट किती प्रभावी ठरणार आहे याची कल्पना येईल.

मनीष शर्मा यांनी दिग्दर्शित केलेल्या टायगर ३ च्या ट्रेलरची सोशल मीडियावर जोरदार क्रेझ आहे. यंदाच्या वर्षी प्रदर्शित झालेल्या पठाण आणि जवान या शाहरुखच्या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर प्रचंड कमाई केल्याचे दिसून आले आहे. यातच सलमानच्या या चित्रपटाची तुलना शाहरुखच्या चित्रपटांसोबत होऊ लागली आहे. त्यामुळे कुणाची सरशी होणार हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

सलमाननं या चित्रपटामध्ये अविनाश सिंग राठोडची भूमिका केली आहे. त्यात त्याच्या मनात अजूनही आपल्या देशानं आपल्याला स्विकारले नसल्याची खंत त्यानं व्यक्त केली आहे. त्याचा तो संवाद चांगलाच लोकप्रिय झाला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Adityanath Mobile Number: अधिकारी काम करत नाहीत? CM योगींकडे करा थेट तक्रार! मुख्यमंत्री आदित्यनाथ यांचा मोबाईल नंबर

Harbhajan Singh : रोहित शर्माला ODI कर्णधारपदावरून हटवल्याने हरभजन सिंग खवळला, शुभमन गिलबाबत म्हणाला...

Marathi Movie : तरूणाईला प्रेमाचा जादुई अनुभव देणारं ‘ये ना पुन्हा’ गाणं प्रदर्शित!

Ajit Agarkar: रोहित शर्मासाठी परतीचा प्रवास सुरू? कर्णधारपदावरून दूर करण्याची माहिती दिली होती,आगरकर

Kolhapur Bhishi Scam : विश्वासू मित्र म्हणून भिशी भरायला दिली, अन् ४० महिलांना पती, पत्नीने २५ लाखांना गंडवलं...; कोल्हापुरातील घटना

SCROLL FOR NEXT