Salman Khan esakal
मनोरंजन

Salman Khan : 'तू चुकूनही सलमानसोबत लग्नाचा विचार करु नकोस!' जुहीच्या कुटूंबियांचा का होता विरोध?

सोशल मीडियावर अजुनही तो व्हिडिओ व्हायरल होतो आहे त्यामध्ये सलमान असे म्हणतो आहे की त्यानं जुहीच्या वडिलांकडे तिच्यासोबत लग्नासाठी विचारणा केली होती.

सकाळ डिजिटल टीम

Juhi Chawla On Salman Khan : इतक्या वर्षांनी देखील बॉलीवूडचा भाईजान सलमान खान आणि प्रसिद्ध अभिनेत्री जुही चावला यांच्या लग्नाची गोष्ट व्हायरल होताना दिसते आहे. सोशल मीडियावर त्यावरुन वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे. सलमानची एक जुनी मुलाखत व्हायरल होत असून त्यात त्यानं जुही आणि तिच्या कुटूंबियांच्या मनात आपल्याविषयी असलेली अढी याविषयी सांगितलं आहे.

सोशल मीडियावर अजुनही तो व्हिडिओ व्हायरल होतो आहे त्यामध्ये सलमान असे म्हणतो आहे की त्यानं जुहीच्या वडिलांकडे तिच्यासोबत लग्नासाठी विचारणा केली होती. मात्र जुहीच्या वडिलांनी त्याला नकार दिला. त्यांनी सलमानची ती मागणी रिजेक्ट केली होती. ९० च्या दशकांतील त्या व्हायरल झालेल्या त्या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. मी त्यांच्या लेखी तितकासा कार्यक्षम आणि प्रभावी नव्हतो. त्यामुळे त्यांनी मला नकार दिला. अशी सलमानची प्रतिक्रिया होती.

Also Read - सामान्यांचा पैसा सुरक्षित ठेवण्यासाठीच Virtual Currency करकक्षेत

सध्या सोशल मीडियावर न्युज १८ ची एक मुलाखत व्हायरल झाली आहे. त्यात जुहीला त्या व्हायरल झालेल्या एका व्हिडिओविषयी विचारण्यात आले होते. त्यात तिनं म्हटले होते की, माझ्या करिअरला तेव्हा नुकतीच सुरुवात झाली होती आणि तेव्हा सलमान खान हा आता इतका लोकप्रिय नव्हता. माझ्याकडे फिल्म आली होती. आणि त्यामध्ये तो लीड रोलमध्ये होता. मी त्याला तेव्हा फारसं ओळखत नव्हती. फक्त सलमान खानच नाहीतर आमीरला देखील मी ओळखत नव्हते. बॉलीवूडमध्ये कुणीही फारसं ओळखीचं नव्हतं. त्यामुळे बोलण्याचा प्रश्नच नव्हता.

जुही पुढे म्हणाली, सलमान मला जेव्हा जेव्हा भेटतो तेव्हा ती गोष्ट सांगायला विसरत नाही. ती म्हणजे मी तुला लग्नासाठी मागणी घातली होती. तू माझ्यासोबत कधीही चित्रपट केला नाहीस. मला एक गोष्ट माहिती आहे. ती म्हणजे भलेही आम्ही एकमेकांसोबत कधीही काम केले नसेल, पण आम्ही बरेच स्टेज शो एकत्रित केले आहेत. दीवाना मस्तानामध्ये त्याचा कॅमिओ होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Eliminator : राजस्थान रॉयल्सचा Qualifier 2 मध्ये 'थाटात' प्रवेश; सनरायझर्स हैदराबादचे पॅकअप! गुजरात टायन्सशी सामना

SRH vs RR Eliminator IPL 2026: शतकाचा विचार डोक्यात सुरू होता का? वैभव सूर्यवंशीची वादळी खेळीनंतर मजेशीर मुलाखत... Video

Pune Water Crisis : आचारसंहितेतून सूट मिळताच स्थायी समिती आक्रमक; पाणीटंचाई, दूषित पाणीपुरवठा व नालेसफाईवर अधिकाऱ्यांना जाब

Pune Crime: कात्रजमध्ये दोन गावठी पिस्तुलांसह तरुण अटक; भारती विद्यापीठ पोलिसांची कारवाई

YCMOU Summer Exams: यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या उन्हाळी परीक्षांना अमरावतीत एआय निगराणीची साथ

SCROLL FOR NEXT