Salman Khan bollywood Actor trolled singer esakal
मनोरंजन

Abhijeet Bhattacharya : 'सलमान तर माझ्या रागालाही पात्र नाही'! भाईजानवर प्रसिद्ध गायकाची सणसणीत टीका

बॉलीवूडचा भाईजान सलमान खान हा त्याच्या हटके स्टाईल आणि स्वॅगसाठी ओळखला जाणारा सेलिब्रेटी आहे.

युगंधर ताजणे

Salman Khan bollywood Actor trolled singer : बॉलीवूडचा भाईजान सलमान खान हा त्याच्या हटके स्टाईल आणि स्वॅगसाठी ओळखला जाणारा सेलिब्रेटी आहे. त्याच्या टायगर ३ या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर मोठी कमाई केली होती. आता सलमान आणि शाहरुख खान हे दोन्ही सेलिब्रेटी एकाच चित्रपटातून दिसणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.

सलमान हा नेहमीच त्याच्या वेगवेगळ्या कारणांसाठी ओळखला गेलेला अभिनेत आहे. सलमानवर टीका करणाऱ्यांची काही कमी नाही. काही दिवसांपूर्वी सलमानवर बॉलीवूडचा अभिनेता कमाल राशिद खाननं केलेली कमेंट चर्चेत आली होती. त्याच्या दोन्ही चित्रपटांवर केआऱकेनं टीका केली होती. त्यामुळे चिडलेल्या सलमाननं केआरकेच्या विरोधात कोर्टात धावही घेतली होती.

आता प्रसिद्ध गायक अभिजित भट्टाचार्य यांनी सलमानच्या विरोधात सणसणीत प्रतिक्रिया दिली आहे. यापूर्वी अभिजित यांनी शाहरुखच्या विरोधात देखील प्रतिक्रिया दिली होती. त्यामुळे ते चर्चेत आले होते. किंग खान हा नेहमीच लोकांचा वापर करुन घेतो आणि त्याच्या यशाच्या मार्गातील अडथळे दूर करतो. असे त्यांनी म्हटले होते. त्यानंतर आता त्यांनी पुन्हा एकदा सलमानवर केलेली टीका हा चर्चेचा विषय आहे.

अभिजित गेल्या काही दिवसांपासून वेगवेगळ्या मुलाखती दिल्या आहेत. शाहरुखला दिलेल्या त्या मुलाखतीतून त्यांनी शाहरुखच्या चाहत्यांचा राग ओढावून घेतला होता. तो तर सगळयात मोठा राष्ट्रभक्त आहे. आता सलमानवरुन त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अभिजितचे म्हणणे आहे की, सलमान पाकिस्तानी कलाकारांना त्याच्या चित्रपटात काम देतो. असं करुन तो पाकिस्तानच्या प्रती आपण किती प्रामाणिक आहोत हे त्यानं दाखवून दिलं आहे.

या सगळ्या कारणामुळे आपण सलमानला आपल्या रागाच्या देखील पात्र समजत नाही. एका युट्युब चॅनेलला दिलेल्या त्या मुलाखतीनं वेगळ्याच चर्चेला सुरुवात झाली आहे. सलमान खाननं सोबतच्या त्या मुद्यांवर अभिजित यांनी भाष्य केलं आहे. त्याला जेवढं काही मिळालं आहे ते सगळं त्याच्याच पुण्याईमुळे आहे. त्याला जर वाटत असेल की तो देव झाला आहे तर तसं नाही तो काही देव नाही.

२०१५ मध्ये जेव्हा सलमानचा हिट अँड रन मधील प्रकरण समोर आले होते तेव्हा अभिजितनं एक ट्विट केलं होतं. त्यात त्यानं रस्त्यावर झोपलेल्या माणसांवर आगपाखड केली होती. ती माणसं रस्त्यावर का झोपली होती. सलमानवर एवढी नाराजी असताना देखील असं का बोलला होता. त्यावरही त्यांनी बाजू मांडली होती.

मी काही सलमानच्या बाजूनं बोललो नव्हतो. माझ्या बोलण्याची पद्धत वेगळी होती. ती तुम्हाला कळली नाही. ते उपरोधिक बोलणे होते. त्यामुळे अनेकांचा त्यावरुन गैरसमज झाल्याची प्रतिक्रिया अभिजित यांनी दिली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Rain Red Alert : मुंबईला पावसाचा तडाखा! कांदिवली, मालाडमध्ये ढगफुटीसदृश पाऊस; हवामान खात्याकडून 'रेड अलर्ट' जारी, पुढील 3 तास महत्त्वाचे

Maharashtra Government Decision : मोठा निर्णय! राज्यातील २९ जिल्ह्यांत नवीन अप्पर जिल्हाधिकारी, तहसीलदार कार्यालये होणार; सामान्यांचा वेळ, पैसा, त्रास वाचणार

Latest Marathi News Live Update : भर पावसात वाहतूक कोंडीने पुणेकर हैराण

Chhatrapati Sambhajinagar: अनेक मंत्र्यांशी संबंध, अन्न व नागरी पुरवठा विभागात नोकरी लावतो; तरुणाला २१ लाखांना गंडा

Mumbai Rain: पहिल्याच पावसाने मुंबईची पोलखोल! वर्दळ नसल्याने मोठी दुर्घटना टळली; नेमकं कुठे आणि काय घडलं?

SCROLL FOR NEXT