35YearsOfSalmanKhanReign Esakal
मनोरंजन

35YearsOfSalmanKhan: भाईजानला इंडस्ट्रीत 35 वर्ष पुर्ण! चाहत्यांना दिलं भन्नाट सरप्राईज..व्हिडिओ व्हायरल

Vaishali Patil

35YearsOfSalmanKhanReign: बॉलिवूडचा दबंग म्हणजेच सलमान खान. त्याची काही वेगळी ओळख सांगायची गरज नाही. त्याचे जगभरात लाखो चाहते आहेत. त्याचे चाहते त्याला भाईजान म्हणतात.

सलमानने त्याच्या अभिनयाने असो किंवा त्याच्या कामाने बॉलिवूडवर वर्षानुवर्षे राज्य केले आहे. सलमानने आता इंडस्ट्रीत 35 वर्षे पूर्ण केली आहेत.

त्याने या 35 वर्षात अनेक चित्रपटात काम केले आहे. त्याच्या अनेक भुमिकाही प्रेक्षकांच्या मनात घर करुन बसल्या आहेत.

सलमानच्या चाहत्यांनी त्याच्यावर प्रेमाचा वर्षाव करत त्याला शुभेच्छाही दिल्या आहेत. यासोबतच हा सलमानने देखील हा क्षण चाहत्यांसोबत साजरा केला आहे.

त्याने त्याच्या इंस्टाग्रामवर एक रील पोस्ट केली आहे. यात त्याने त्याच्या काही सुपरहिट चित्रपटांचे सीन शेयर केले आहेत. कालपासूनच सलमानसाठी चाहत्यांनी X वर #35YearsOfSalmanKhanReign हा ट्रेंड सुरू केला होता.

सलमानबरोबरच त्याच्या प्रोडक्शन हाऊस सलमान खान फिल्म्सने देखील या प्रसंगी त्याच्या चित्रपटांमधील एक कॅरोसल व्हिडिओ सोशल मीडियावर शेयर केला. आता हा व्हिडिओ सोशल मीडियारवर व्हायरल झाला आहे.

या व्हिडिओत सलमानच्या मैने प्यार किया, हम दिल दे चुके सनम, वॉन्टेड, टायगर जिंदा है, रेस 3, बॉडीगार्ड, दबंग, सुलतान, भारत यासारख्या सुपरहिट चित्रपटांमधील काही संवाद आणि सीन्स आहेत.. रील शेअर करताना सलमानने लिहिले की, ' 35 वर्षे हे 35 दिवसांरखे गेले.तुमच्या प्रेमाबद्दल धन्यवाद.'

ऑगस्ट 1988 मध्ये सलमान खान याने बीवी हो तो ऐसी या चित्रपटातून सहाय्यक भूमिकेतून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. तेव्हापासून सलमान त्याच्या चाहत्यांचे मनोरंजन करत आहे. सलमान खानची पहिली कमाई 100 रुपयांपेक्षा कमी होती. त्यानंतर सलमानच्या करियरमध्ये अनेक चढउतार आले. त्याने अनेक सिनेमात भुमिका केल्या. बऱ्याचदा तो वादातही अडकला आहे.

सलमान शेवटचा 'किसी का भाई किसी की जान' या चित्रपटात दिसला होता. तर टायगर 3 या चित्रपटाची चाहते वाट पाहत आहेत. हा चित्रपट यावर्षी रिलिज होईल. शाहरुख खान टायगर 3 मध्ये कॅमिओ करेल तर कतरिना कैफ आणि इमरान हाश्मी अॅक्शन मोडमध्ये दिसणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Explainer: फडणवीस आणि शिंदेंची उद्धव ठाकरेंवर टीका; पण राज ठाकरेंसाठी 'मवाळ भूमिका', नेमकं समीकरण काय? वाचा सोप्या शब्दात

IND vs ENG 2nd Test: २६९, १००* ! शुभमन गिलचे शतक अन् ५४ वर्षांपूर्वीचा विक्रम उद्ध्वस्त; एकाही भारतीयाला नव्हता जमला हा पराक्रम

SBI Bank Manager Viral Video : ''तुला iPhone देईन, शारीरिक संबंध ठेव..’’ म्हणत, महिला कर्मचारीशी घृणास्पद कृत्य करणाऱ्या SBI व्यवस्थापकाचा भांडोफोड!

Yavatmal News: लाखो विद्यार्थ्यांचा खडतर प्रवास! शिक्षणासाठी खेड्यातून ‘अप-डाऊन’, सवलतीच्या पासचा दिलासा पण...

Pune Crime : ४० दिवसांच्या मुलीची साडेतीन लाखांत विक्री; आई-वडिलांसह सहा जणांना अटक

SCROLL FOR NEXT