Salman Khan
Salman Khan Sakal
मनोरंजन

Salman Khan: जीवे मारण्याच्या धमकीवर सलमान पहिल्यांदाच बोलला, दिलं स्वॅगमध्ये उत्तर

Aishwarya Musale

बॉलीवूडचा सुपरस्टार सलमान खानने बुधवारी पत्रकार परिषदेत हजेरी लावली. यादरम्यान, त्याला मिळणाऱ्या जीवे मारण्याच्या धमक्यांबाबत प्रश्न विचारण्यात आले. मात्र, त्याने थेट उत्तर दिले नाही, पण असे काही बोलले की, त्याच्या चाहत्यांना धक्का बसेल.

पत्रकार परिषदेदरम्यान सलमान खानला विचारण्यात आले की, तुम्ही सगळ्या देशाचे भाईजान आहात, मग आता मिळणाऱ्या धमकीकडे कसे पाहता, या प्रश्नाच्या उत्तरात सलमान म्हणाला, त्यावर सलमान खानने उत्तर देताना म्हटले की, मी सगळ्यांचा भाई नाही, काहींचा 'भाई' आहे..तर कोणाचा तरी 'जान' आहे. असे उत्तर देत सलमान खानने धमकीवर थेट उत्तर देणे टाळले.

एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीदरम्यान गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईने सलमान खानला जीवे मारण्याची उघडपणे धमकी दिल्याची माहिती आहे. आमच्या भागात सलमान खानने हरण मारल्याचे लॉरेन्सने म्हटले होते. त्याला आमच्या बिकानेरच्या मंदिरात जाऊन माफी मागावी लागेल. जर त्याने माफी मागितली नाही तर मी त्याला योग्य उत्तर देईन. मी सध्या गुंड नाही, पण सलमान खानला मारल्यावर गुंडा बनेन, असेही लॉरेन्स म्हणाला.

वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, सलमान खान लवकरच किसी का भाई किसी की जान या चित्रपटात दिसणार आहे. हा चित्रपट 21 एप्रिल 2023 रोजी ईदच्या मुहूर्तावर चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. याशिवाय सलमान खानकडे 'किक 2', 'टायगर 3' सारखे चित्रपट आहेत जे एकापाठोपाठ एक चित्रपटगृहात दाखल होतील.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Porsche Accident: पुण्यात दोघांना चिरडणाऱ्या अल्पवयीन मुलाचे वडिल पोलिसांच्या ताब्यात; संभाजीनगरमधून केले अटक

Mumbai Election: सोमवारी ठाकरे गटाच्या पोलिंग एजेंटचा टॉयलेटमध्ये मृत्यू, तर निवडणूक अधिकाऱ्याचा हार्ट अटॅकने मृत्यू

Yoga Tips : थकवा अन् अशक्तपणापासून आराम मिळवण्यासाठी दररोज करा 'ही' योगासने, जाणून घ्या सरावाची पद्धत

Kalyani Nagar Accident : पुणेकरांच्या तीव्र प्रतिक्रिया...फक्त सामान्य नागरिकांनाच कायदे लागू आहेत का?

Latest Marathi News Live Update: 300 ग्रामपंचायतींच्या प्रशासक नियुक्तीला स्थगिती

SCROLL FOR NEXT