Salman Khan Sakal
मनोरंजन

Salman Khan: मुलींनी सेटवर कसे कपडे घालायचे या नियमावर सलमान खानने सोडले मौन, म्हणाला- 'महिलांचं शरीर जितकं...'

आता महिलांच्या कपड्यांवर खु्द्द सलमान खान याने मोठं वक्तव्य केलं आहे. ज्यामुळे सर्वत्र चर्चांना उधाण आलं आहे.

Aishwarya Musale

बॉलीवूडच्या दबंग म्हणजेच सलमान खानचा मल्टीस्टारर चित्रपट 'किसी का भाई किसी की जान'मधून डेब्यू करणाऱ्या पलक तिवारीने काही काळापूर्वी एक वक्तव्य केले होते, ज्याची बरीच चर्चा झाली होती. पलकने खुलासा केला होता की, सलमान खानच्या चित्रपटाच्या सेटवर मुलींना डीप नेकलाइन घालण्यावर बंदी आहे. या वक्तव्यामुळे सलमान खानही वादात सापडला आहे. आता सल्लू मियाँने यावर मौन तोडले आहे.

पलक तिवारीने सलमान खानबद्दलच्या तिच्या विधानावर नंतर माघार घेतली असली तरी, सलमान खानच्या ताज्या मुलाखतीवरून असा अंदाज लावला जाऊ शकतो की भाईजानला डीप नेकलाइन कपडे घातलेल्या मुली आवडत नाहीत. एका वृत्तवाहिनीशी संवाद साधताना सलमान खान म्हणाला, “मला वाटते की महिलांचे शरीर खूप मौल्यवान असते. महिलांचं शरीर जितकं झाकलेलं तितकंच योग्य आहे…’

सलमान खानला जेव्हा विचारण्यात आले की, 'प्यार किया तो डरना क्या' चित्रपटातील 'ओ ओ जाने जाना' गाण्यात तो शर्टलेस दिसला होता. यावर अभिनेता म्हणाला, “त्यावेळी मी स्विमिंग ट्रंकमध्ये होतो आणि तेव्हा गोष्टी वेगळ्या होत्या आणि आजकालचे वातावरण थोडे वेगळे आहे. हे पोरांचे प्रकरण आहे. मुलं ज्याप्रमाणे मुलींकडे पाहतात… आपल्या बहिणी, पत्नी, आणि आईसाठी बिलकूल योग्य नाही…’

21 एप्रिल 2023 रोजी रिलीज झालेला सलमान खानचा चित्रपट 'किसी का भाई किसी की जान' बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत आहे. सुरुवातीच्या आठवड्यात चित्रपटाचे कलेक्शन चांगले होते, पण आता कमाई खूपच घसरली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Buldhana : चिखला गावात शिवरायांच्या अश्वारुढ पुतळ्याची स्थापना, शिवभक्तांनी शनिवारी रात्री बसवला पुतळा; पाहा VIDEO

T20 WC : फायनल सोडा, पाकिस्तानचे उपांत्य फेरीत पोहोचणे अवघड झाले; न्यूझीलंडविरुद्धची लढत रद्द झाल्याने गणित बिघडले

'बॉलीवूड पूर्णपणे सोडायचे नव्हते पण...' प्रियांकाने सांगितलं बॉडिवूड सोडण्याचं खरं कारण, म्हणाली...

Santosh Deshmukh Case: खटल्यातील विलंबामुळे सरकारी पक्षाला तंबी; संतोष देशमुख हत्या प्रकरणात न्यायालयात सुनावणी

Solapur Dhule Highway Accident: चार दिवसांपूर्वी साखरपुडा, परीक्षेसाठी लातूरला निघाले अन् काळाने गाठले

SCROLL FOR NEXT