Salman Khan Chooses Katrina Kaif Over Jacqueline Fernandez As A Better Dancer| Esakal
मनोरंजन

'जॅकलिनच्या तुलनेत कतरिनाच...'; सलमान खानला आली मिसेस कौशलची आठवण

विक्रांत रोनाच्या पत्रकार परिषदेत सलमान खान,रितेश देशमुख,जेनेलिया देशमुख असे बॉलीवूडचे बडे सेलिब्रिटी देखील उपस्थित होते.

प्रणाली मोरे

किच्चा सुदीपच्या 'विक्रांत रोना'(Vikrant Rona) सिनेमाची पत्रकार परिषद नुकतीच मुंबईत पार पडली. खरंतर हा कन्नड सिनेमा आहे पण हिंदी भाषेतही हा रिलीज होणार असल्यानं खूप आधीपासून याची मुंबईतही हवा करण्यात आली आहे. त्यात सलमान खान(Salman Khan) या सिनेमाचा प्रेझेंटर असल्यानं या सिनेमाशी बॉलीवूडचं कनेक्शन असल्यासारखं देखील आहे. या सिनेमाच्या नुकत्याच झालेल्या पत्रकार परिषदेत सलमान खान, रितेश देशमुख,जेनेलिया देशमुख अशी बडी बॉलीवूडची मंडळी हजर होती, याचवेळी प्रश्नोत्तराच्या दरम्यान सलमान खानने अचानक कतरिनाचं(Katrina Kaif) नाव घेतलं अन् लगोलग चर्चेला सुरुवात झाली. यादरम्यानचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. पण हा व्हिडीओ पाहून सलमान-कतरिनाचे चाहते मात्र भलतेच खूश आहेत. चला,जाणून घेऊया नेमकं पत्रकार परिषदेत असं काय बोलला सलमान कतरिना विषयी.(Salman Khan Chooses Katrina Kaif Over Jacqueline Fernandez As A Better Dancer)

Salman Khan Chooses Katrina Kaif Over Jacqueline Fernandez As A Better Dancer

या पत्रकार परिषदे दरम्यान रितेश देशमुख म्हणाला की,त्याने जॅकलिनच्या पहिल्या सिनेमात तिच्यासोबत काम केले आहे. तेव्हा जॅकलिनला बॉलीवूड डान्स बिलकुल यायचा नाही. पण याचवेळी त्याने जॅकलिनची प्रशंसा करताना म्हटलं की,पण आता जॅकलिन खूप काही शिकली आहे,कारण ती मेहनती आहे,आज ती एक उत्तम डान्सर आहे.

रितेश आणि जॅकलिन दरम्यान यावर बातचीत होतच होती की सलमान खाननं या संवादात सहभाग घेत गाडी थेट कतरिनाच्या दिशेने वळवली. तो म्हणाला,जर जॅकलिन खूप चांगली डान्सर आहे,मेहनती आहे तर कतरीना देखील काही कमी नाही. ती देखील मेहनत घेऊन खूप काही शिकली आहे. आता इथे जॅकलिनवर बोललं जात असताना सलमामनला मध्येच कतरिना आठवल्याने याची चर्चा मात्र चारही दिशांना रंगलेली आहे.

याच पत्रकार परिषदेत सलमाननं आठवण काढली लंडन ड्रीम्स सिनेमाची. त्यानं सुरुवातीला जॅकलिनला याच सिनेमातून बॉलीवूड पदार्पणाचा सल्ला दिला होता. पण जॅकलीनने त्याचे न ऐकता अल्लादीनची निवड केली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India-China News: भारत अन् चीनमधील ‘LAC’वरील मोठा वाद मिटणार!

Maharashtra Hospitals : पाच हजार रुग्णालयांना ‘कारणे दाखवा’ नोटीस; तीस दिवसांनंतर परवाना होणार निलंबित

Pune Flood : पुणे शहरात पुरामुळे पंधराशे नागरिकांना हलविले; मुळामुठा नदीत ८५ हजार क्यूसेस पाणी सोडले

Indian Railways Special Trains: मोठी बातमी! दिवाळी-छठ दरम्यान रेल्वे तब्बल १२ हजारांहून अधिक विशेष गाड्या चालवणार

ICC ODI Rankings: केशव महाराज झाला नंबर वन बॉलर! पण बुमराहचं नाव झालं गायब? चर्चेला उधाण

SCROLL FOR NEXT