Salman Khan 'Tadap Tadap ke' Song sung by Singer KK  Google
मनोरंजन

KK च्या 'तडप तडप' गाण्याला ऐकून काय म्हणालेला सलमान? संगीतकारही घाबरलेला...

सलमान खाननं सोशल मीडियावर 'केके' ची आठवण शेअर करत भावूक पोस्ट केली आहे.

प्रणाली मोरे

कोलकाता मधील नाजरुल मंचावर बॉलीवूडचा प्रसिद्ध गायक, 'व्हॉइस ऑफ लव्ह' कृष्णकुमार कुन्नथ उर्फ केके(KK) यानं आपलं अखेरचं गाणं गायलं, तेव्हा आपल्या आवाजानं केके नं उपस्थितांना दंग करुन सोडलं. रोमॅंटिक आवाजाचा बादशहा केकेनं आपल्या शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या आवाजानं उपस्थितांना आनंद दिला. संपूर्ण सिने-इंडस्ट्रीत मग अगदी बॉलीवूडचं नाही तर मराठी-दाक्षिणात्य सिने-इंडस्ट्रीतही केकेच्या जाण्यानं हळहळ व्यक्त केली जात आहे. बॉलीवूडचा दबंग खान सलमान खानने देखील केके साठी एक भावूक पोस्ट शेअर केली आहे. सलमान खानच्या अनेक सिनेमांतून केके चा आवाजा चांगलाच रसिकांना दंग करून गेला होता. आणि हेच कारण आहे की सलमान खानच्या(Salman Khan) पोस्टमध्येही(Post) केके च्या जाण्यानं झालेलं दुःख स्पष्ट जाणवत आहे.

सलमान खान फिल्मच्या अधिकृत ट्वीटर अकाऊंटवर 'व्हॉइस ऑफ लव्ह' केके चा फोटो शेअर करीत लिहिलं आहे की,''हा भावनांनी भारलेला आवाज ज्यानं आम्हाला प्रेम करायला शिकवलं,तो आता आपल्यात राहिला नाही. केकेनं सलमान खानच्या सुपरहिट 'हम दिल दे चुके सनम' सिनेमातील 'तडप,तडप'(Tadap,Tadap Song) गाण्याला आवाज दिला होता. जे गाणं तेव्हा तर सुपर-डुपर हिट ठरलं होतंच, पण आताही त्याची लोकप्रियता कायम आहे.

सलमान खानसाठी केकेनं 'एक था टायगर' मध्ये 'लापता' ,'बजरंगी भाईजान' चं 'तू जो मिला', 'रेडी' सिनेमात 'हमको प्यार हुआ', तर 'हर दिल जो प्यार करेगा' मध्ये 'साहिबा,साहिबा' अशी अनेक गाणी गायली आहेत.

१९९९ मध्ये प्रदर्शित झालेल्या संजय लीला भन्साळींच्या 'हम दिल दे चुके सनम' सिनेमात सगळीच गाणी खूप सुंदर होती,आणि त्या सगळ्याच गाण्यांना चांगला प्रतिसादही मिळाला होता. पण 'तडप तडप' के हे गाणं मात्र सर्वात अधिक हिट नंबर म्हणून गाजलं . या गाण्याला केके नं गायलं होतं. आणि इस्माइल दरबारनं हे गाणं संगीतबद्ध केलं होतं. या गाण्यासंदर्भातला एक प्रसिद्ध किस्सा देखील आहे. जो आज आम्ही केकेच्या आठवणीत शेअर करीत आहोत.

एकदा 'हम दिल दे चुके सनम' सिनेमाच्या सेटवर हे गाणं लागलं होतं. आणि तेव्हा सलमान खाननं ते ऐकलं. जसं या गाण्याचा आवाज आणि त्यातली 'तडप' म्हणजे दुःखाच्या वेदना सलमाननं ऐकल्या,अनुभवल्या त्यानं लगेच विचारलं की हे गाणं कुणी गायलं आहे. हे ऐकल्यावर ईस्माईल दरबार थोडे दचकले,त्यांना वाटलं बहुधा सलमानला गाणं आवडलं नसावं. पण झालं उलटचं. सलमाननं तेव्हा तोंडभरून या गाण्याचं कौतूक ईस्माइल दरबारकडे केलं होतं. आणि म्हटलं होतं हे गाणं जेव्हा रिलीज होईल तेव्हा लोकांना रडवेल. खूप छान गाणं झालं आहे. आणि बघा,तसंच झालं देखील. जेव्हा हे गाणं रिलीज झालं तेव्हा खरंच अनेकांचे डोळे पाण्याने डबडबले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup 2025: पाकिस्तान UAE ला पराभूत करत 'सुपर फोर'मध्ये! भारताविरुद्ध पुन्हा होणार सामना, पण कधी अन् केव्हा? जाणून घ्या

Athletics Championship 2025: नीरज चोप्रा विरुद्ध अर्शद नदीम लढत होणार! जाणून घ्या कुठे अन् किती वाजता पाहाता येणार फायनल

PAK vs UAE: पाकिस्तानी विकेटकिपरच्या थ्रोमुळे अंपायरला मोठी दुखापत, मैदानंच सोडावं लागलं; जाणून घ्या नेमकं काय घडलं

Meenatai Thackeray statue case Update: मोठी बातमी! मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर रंग फेकणाऱ्यास २४ तासांच्या आत अटक; गुन्हाही केला कबूल

Disha Patani’s house firing incident: दिशा पटानीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या दोन शूटर्सचा अखेर गाझियाबादमध्ये खात्मा!

SCROLL FOR NEXT