salman shera 
मनोरंजन

निसर्गाचा मनमुराद आनंद लुटतोय सलमान खान, शेराने केला मालकाचा व्हिडिओ शेअर

दिपालीराणे-म्हात्रे, प्रतिनिधी

मुंबई- सलमान खान लॉकडाऊन सुरु झाल्यापासून त्याच्या पनवेल येथील फार्म हाऊसवर आहे. पहिल्यांदाच सलमानने फार्महाऊसवर एवढा वेळ घालवला आहे. लॉकडाऊनमध्ये सलमान सोशल मिडियावर चांगलाच ऍक्टीव्ह दिसून आला. त्याच्या चाहत्यांसाठी तो फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असतो. नुकताच सलमानचा बॉडीगार्ड शेराने एक व्हिडिओ शेअर केला आहे जो चाहत्यांच्या पसंतीस पडत आहे. 

सलमान खानचा बॉडीगार्ड शेराने शुक्रवारी त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये शेरा सलमान खानसोबत निसर्गाच्या वातावरणाचा आनंद घेत आहे. हा व्हिडिओ शेअर करताना शेराने लिहिलंय, मी लिजंटला फॉलो करत आहे. माझा मालक सलमान खान.

हा व्हिडिओ सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये सलमान खान पावसात भिजलेला दिसतोय. तसंच त्याच्याासोबत आणखी काही जण आहे जे त्याच्या फार्महाऊसवरील रस्यांवर पावसाच्या वातावरणाचा मनमुराद आनंद घेताना दिसत आहेत. 

सिनेमांच्या बाबतीत सांगायचं झालं तर सलमानचा 'राधे- युअर मोस्ट वॉन्टेड भाई' हा सिनेमा या वर्षी ईदला रिलीज होणार होता. मात्र कोरोना व्हायरच्या संकटामुळे हा सिनेमा पुढे ढकलला आहे. या सिनेमात दिशा पटानी, जॅकी श्रॉफ, रणदीप हुडा हे देखील मुख्य भूमिकेत आहेत. 

काही दिवसांपूर्वी सलमान खान त्याच्या 'राधे' या सिनेमाचं शूटींग पुन्हा सुरु करणार असल्याची माहिती मिळत होती. या माहितीनुसार सलमान पुढच्या महिन्यात म्हणजेच ऑगस्टमध्ये त्याच्या या सिनेमाचं शूट सुरु करण्याच्या प्लानिंगमध्ये आहे. मुंबईत एका स्टुडिओमध्ये संपूर्ण सिनेमाचं शूट पूर्ण करण्याचा विचार सलमान, प्रभुदेवा आणि अतुल अग्निहोत्री करत आहेत. कमीत कमी माणसांमध्ये शूटींग करण्याचा त्यांचा विचार आहे.  

 salman khan enjoys nature beauty and shera shares his video  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND VS AFG 3RD T20I: अभिषेक शर्माने इतिहास रचला; ट्वेंटी-२०तील सर्वात वेगवान शतक!मोडला रोहित शर्माचा विक्रम, विराटशी बरोबरी

Pune Ganeshotsav Traffic : पुण्यात गणेशोत्सवानिमित्त वाहतुकीत मोठा बदल; 18 ते 25 सप्टेंबरदरम्यान 'हे' प्रमुख रस्ते राहणार बंद, जाणून घ्या महत्त्वाचे पर्यायी मार्ग

Gangapur Sugar Mill: गंगापूर सहकारी साखर कारखाना कर्जमुक्त करण्याचा निर्धार; जय हिंदने गाळप केलेल्या ऊसाचे बिल १५ दिवसांत देण्याचे आश्वासन

Social Media Ban : मुलांचं मानसिक आरोग्य धोक्यात? 13 वर्षांखालील मुलांना सोशल मीडियावर बंदी; किशोरवयीनांसाठीही कडक नियम, EU Kids Act मध्ये काय आहे?

Latest Marathi News Update : वाघूळखेडा शिवारात शेतात काम करणाऱ्या मजुरांवर कोसळली वीज; दुर्घटनेत तीन महिलांचा जागीच मृत्यू

SCROLL FOR NEXT