Salman Khan 
मनोरंजन

'अंतिम'च्या पोस्टरला दुग्धाभिषेक; भडकलेला सलमान म्हणाला, "इथे लोकांना.."

सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत सलमानची चाहत्यांना विनंती

स्वाती वेमूल

अभिनेता सलमान खानचा Salman Khan 'अंतिम : द फायनल ट्रुथ' Antim हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला असून त्याला बॉक्स ऑफिसवर चांगला प्रतिसाद मिळतोय. सलमानचे चाहते त्याच्या चित्रपटाच्या प्रदर्शनाचा जल्लोष करत आहेत. मात्र जल्लोषाची चाहत्यांची पद्धत 'भाईजान'ला अजिबात आवडलेली नाही. काही चाहत्यांनी सलमानच्या 'अंतिम'मधील पोस्टरवर दुग्धाभिषेक केला. हा व्हिडीओ पाहून संतापलेल्या सलमानने चाहत्यांना मोलाचा सल्ला दिला. त्याने खुद्द हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असं न करण्याचं आवाहन केलं आहे.

'इथे अनेक लोकांना प्यायला पाणीसुद्धा मिळत नाही आणि तुम्ही अशाप्रकारे दुधाची नासधूस करत आहात. मी माझ्या सर्व चाहत्यांना विनंती करतो की ज्या गरीब मुलांना दूध प्यायला मिळत नाही, त्यांना तुम्ही हे दूध द्या', असं सलमानने लिहिलं. शनिवारी सलमानच्या काही चाहत्यांनी थिएटरमध्ये फटाके फोडले होते. त्यालाही सलमानने तीव्र विरोध केला. 'ऑडिटोरिअममध्ये फटाके फोडू नका, त्यामुळे मोठी दुर्घटना होऊ शकते. तुमच्या आणि इतरांच्याही जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. मी सर्व थिएटर मालकांना विनंती करतो की सिनेमा हॉलमध्ये फटाके नेणाऱ्यांना परवानगी देऊ नये. एण्ट्री करण्याआधीच त्यांची नीट तपासणी करून घ्यावी. चित्रपटाचा पुरेपूर आनंद घ्या, पण अशा गोष्टी अजिबात करू नका', अशी विनंती त्याने चाहत्यांना केली.

अंतिम हा महेश मांजरेकर दिग्दर्शित चित्रपट शुक्रवारी प्रदर्शित झाला असून पहिल्याच दिवशी या चित्रपटाने साडेचार कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. शनिवारी ही कमाई साडेपाच कोटींपर्यंत पोहोचली. या चित्रपटात सलमान खानचा मेहुणा आयुष शर्मा हा खलनायकी भूमिकेत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT