salman khan Sakal
मनोरंजन

Salman Khan: सलमान खान वयाच्या 57 वा वर्षी ही दिसतो यंग आणि फीट, फोटो पाहून व्हाल थक्क

बाॅलिवूड अभिनेता सलमान खान हा गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे. त्याच्या आगामी चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहताना दिसत आहेत.

Aishwarya Musale

बॉलीवूडचा सुपरस्टार सलमान खान हा फिटनेस फ्रीक स्टार्सपैकी एक आहे. वयाच्या ५७ व्या वर्षीही त्याने आपली बॉडी जबरदस्त सांभाळली आहे. आजही जेव्हा तो चित्रपटांमध्ये शर्ट काढतो तेव्हा थिएटरमध्ये लोकांना शिट्टी वाजवायला भाग पाडले जाते. आता सलमान खानने जिममधील त्याच्या लेटेस्ट फोटोची झलक दाखवली आहे, ज्यामध्ये तो त्याच्या बॉडीला फ्लॉंट करताना दिसत आहे.

सलमान खानने इन्स्टाग्राम हँडलवर त्याचा नवा फोटो पोस्ट केला आहे, ज्यामध्ये तो जिममध्ये दिसत आहे. फोटोमध्ये सलमान खानने डोक्यावर पांढऱ्या रंगाचा रूमाल ठेवला आहे. तो काळ्या रंगाचा टी-शर्ट आणि मॅचिंग शॉर्ट्स घातलेला दिसत आहे. सलमान कॅमेऱ्यासमोर त्याच्या थाई मसल्स फ्लॉंट करताना दिसत आहे. या फोटोवर चाहते तीव्र प्रतिक्रिया देत आहेत आणि त्याला बॉलिवूडचा किंग म्हणत आहेत.

हा फोटो शेअर करताना अभिनेत्याने चाहत्यांना 'किसी का भाई किसी की जान'ची रिलीज डेट सांगितली आहे. 'किसी का भाई किसी की जान 21 एप्रिलला चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होईल', असे हॅशटॅग कॅप्शनसह त्याने लिहिले. याआधी सलमान खानने चित्रपटाची एक मोशन पोस्ट शेअर केली होती, ज्यामध्ये तो हातात चाकू धरलेला दिसत होता. या पोस्टसह, अभिनेत्याने सांगितले की चित्रपटाचा ट्रेलर 10 एप्रिल रोजी प्रदर्शित होणार आहे.

वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, शेवटच्या वेळी सलमान खानने शाहरुख खानच्या पठाण चित्रपटात कॅमिओ केला होता. या चित्रपटातील किंग खानसोबतचे त्याचे अॅक्शन सीन्स खूप आवडले होते. 'किसी का भाई किसी की जान' नंतर सलमान खान 'टायगर 3' मध्ये दिसणार आहे जो यशराज फिल्म्सच्या स्पाय युनिव्हर्समधला चौथा चित्रपट आहे. हा सिनेमा यावर्षी 10 नोव्हेंबरला रिलीज होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chandrashekhar Bawankule : मुख्यमंत्री फडणवीस केंद्रीय मंत्री तर बावनकुळे मुख्यमंत्री? स्वत: मंत्री बावनकुळेंनींच दिलं स्पष्टीकरण

NGO साठी सुवर्णसंधी! HCL Foundation देणार 24 कोटी रुपयांचे अनुदान; अर्ज प्रक्रिया सुरू, पाहा सविस्तर

Horoscope : उद्या बनतोय दुर्मिळ दशकीर्ती योग! 'या' 5 राशी होणार मालमाल; करिअर-व्यवसायात भरभराट, आरोग्याची मोठी समस्या होणार दूर

शाहरुखने खरेदी केलं दिल्लीतील 'ते' घर, जिथं किंग खानने गौरीसोबत अनुभवला स्ट्रगल काळ, कोट्यवधींमध्ये झाली डील

Latest Marathi News Update : फिरोज शेख यांचे मेहुणे अन्वर खाजा बाऊददीन यांनी आरोप फेटाळले

SCROLL FOR NEXT